आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

बुधवार 4 मार्च रोजी मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर पाच राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

  • मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ३

आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल.गृहीणींनी झकाली मूठ झकालीच ठेवणे गरजेचे आहे. वाहतूकीचे नियम तोडल्यास दंड चुकणार नाही.

  • वृषभ: शुभ रंग : नारिंगी | अंक : ४

राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. भाग्योदयाकडे वाटचाल होईल. विरोधकांचा विरोध गोड बोलूनच थोपवून धरता येईल.

  • मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २

मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळच जास्त होईल. हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह आवरायला हवा. विरोधकांना कमजोर समजू नका.

  • कर्क : शुभ रंग : केशरी | अंक : ३

पैसा येण्याइतकेच पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे आहे. कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येईल. सतर्क रहा. 

  • सिंह : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ४

योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक मनाजोगती असेल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मित्रमंडळींत  मोठेपणा मिळेल.

  • कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८

अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. मित्रांच्या फार नादी लागूच नका.

  • तूळ : शुभ रंग : भगवा | अंक : ८

कार्यक्षेत्रात आज    महत्वपूर्ण   निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे.  

  • वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : १

भागिदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता असणे गरजेचे. वाहन सुरक्षित चालवा.

  • धनू : शुभ रंग : निळा | अंक : ७

आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारीक देवाणघेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. वैवाहीक जिवनांत सुसंवाद राहील. छान दिवस.

  • मकर : शुभ रंग : मोतिया | अंक : ९

आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील.काही कामे आज नि:स्वार्थीपणे कराल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की.

  • कुंभ : शुभ रंग : केशरी | अंक : ५

नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.आज कामावर दांडी मारून थोडं करमणूकीस प्राधन्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे. 

  • मीन : शुभ रंग :सोनेरी| अंक : ६

सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबियांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी तुमच्या हातून होईल. एखाद्या घरगुती समारंभात हजेरी लावाल.

बातम्या आणखी आहेत...