Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

आजचे ग्रह-तारे आणि नक्षत्रामुळे जुळून येत आहे शुभ योग, 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होऊ शकतो विशेष लाभ

Sep 04,2019 12:20:00 AM IST

बुधवार 4 सप्टेंबरचे ग्रह-तारे आणि नक्षत्र ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर राशींसाठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील...


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २ आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात उभी असलेली नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवनांत सौख्य आणि समाधान राहील.वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ३ आज ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. श्वसनाचे विकार असतील तर विषेश काळजी घ्यायला हवी. आज पैज जिंकाल.मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : १ व्यावसायिक उलाढाल वाढेल. शेअर्स बाजारातील तुमचे अंदाज योग्यच ठरतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. यशदायी दिवस.कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७ बांधकाम व्यावसायिकांसाठी आज विषेश अनुकूल दिवस आहे. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. मुलांना दिलेले शब्द पाळल. गृहसौख्याचा दिवस.सिंह : शुभ रंग : सोनेरी| अंक : ६ आज काही मनाजोगत्या घटना घडतील. भावंडांतील कटूता दूर होऊन सलोखा निर्माण होईल. बेरोजगारांना रोजगार प्राप्ती होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.कन्या : शुभ रंग : भगवा| अंक : ९ जमेची बाजू जड असून नोकरी धंद्यात उत्साहाचे वातावरण राहील. आज वाणीत मृदुता असेल तर अनेक क्लीष्ट कामे सोपी होतील. वक्तृत्वास वाव मिळेल.तूळ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ८ आज तुम्ही जरा हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून न घेता आपलेच घोडे पुढे दामटवाल. तुमच्या अतीस्पष्ट बोलण्याने आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे.वृश्चिक : शुभ रंग : तांबडा | अंक : १ खर्चाचे प्रमाण अावाक्याबाहेर जाईल. दूरचे नातलग संपर्कात येतील. ज्येष्ठ मंडळींचे अध्यात्मात मन रमेल. पासपोर्ट, वीजा विषयक कामातील अडथळे दूर होतील.धनू : शुभ रंग : लाल | अंक : ३ आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून आज तुम्ही जी म्हणाल ती पूर्व करूनच दाखवाल. गृहीणी आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील. दिवस लाभाचा.मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४ आज फक्त आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. तुमच्या कामातील निष्ठेने आज तुम्हाला कुटुंबियांची नाराजी मात्र पत्करावी लागेल.कुंभ : शुभ रंग : राखाडी| अंक : २ नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक धाडस करावे. अती आक्रमकतेने निराशा पदरी पडण्याची शक्यता. संयमाची गरज आहे.मीन : शुभ रंग : निळा | अंक : ५ आज जे काही कराल ते कराल ते प्रकृतीस जपूनच करा. आज मोठया आर्थिक उलाढाली टाळलेल्याच बऱ्या. एकावर विसंबून दुसऱ्यास अश्वासने देऊ नका.
X