आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बुधवार 5 फेब्रुवारी रोजी मृगशीर्ष नक्षत्रामध्ये दिवसाची सुरुवात होत असून वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. वाद आणि व्यर्थ खर्चाला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
अती धावपळ टाळा. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. आज जोडीदाराने दिलेले सल्लेही मोलाचे असतील.
अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल असेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उच्चशिक्षणार्थींच्या अपेक्षा वाढतील. नवीन विषयात गोडी निर्माण होईल.
आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.
व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात रहा.
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल.
नोकरीच्या ठीकाणी फक्त बिनचूक काम करण्यावर भर द्या. वरीष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. अध्यात्मिक मार्गाकडे पावले वळतील.
नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेऊ नका. काही गोडबोली माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणेच हिताचे. कामापुरतेच बोला.
आज फक्त कष्ट करीत रहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत वरीष्ठांचे समाधान अशक्य.
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. आज सभासंमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.
कर्तव्या पेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल.चंगळवादी वृत्ती राहील. आज तुम्ही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. संध्याकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.
स्थावरासंबंधीत अपूरे व्यवहार मार्गी लागतील. वास्तू व वाहन खरेदीसठी कर्जमंजूरी होईल. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. अाज म्हणाल ती पूर्व.
व्यवसायात जाहीरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्व गुंडाळून ठेवावी लागतील. आज काही अती हुषार मंडळी संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.