आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 6 नोव्हेंबरची सुरुवात शतभिषा नक्षत्रामध्ये होईल. दिवसभर दोन शुभ योग राहतील. दिवसाच्या सुरुवातीला वृद्धी नावाचा शुभ योग आणि सकाळी 07:50 नंतर ध्रुव नावाचा शुभ योग सुरु होईल. या योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ६
मोठे आर्थिक व्यवहार यशस्वी  होतील. मनाजोगत्या घटना घडल्याने मानसिक प्रसन्नता राहील. मित्रमंळींचे सहकार्य मोलाचे राहील. आज काही प्रलोभने आकर्षित करतील. 

वृषभ: शुभ रंग : आकाशी | अंक : १
कार्यक्षेत्रात वरीष्ठंवर तसेच सहकारी वर्गावर तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. आज भावनांच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. मित्रांना दूर ठेवा. 

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४
बेकायदेशीर कृत्यातून त्रास संभवतो. नाकासमोर चालणेच हिताचे राहील. वडीलधाऱ्यांच्या आज्ञेत रहा. नोकरीधंद्याच्या दृष्टीने दिवस अनुकूल नाही. 


कर्क :  शुभ रंग : हिरवा | अंक
: ९ 
जे चालंलंय ते बरं चालंलंय. मोहापसून दूूर रहा.प्रतिष्ठेस  जपणे  गरजेचे  आहे. वाहन  सुरक्षित  चालवा. विवाह  जुळवण्या  विषयी  बोलणी उद्यावर ढकला. 

सिंह : शुभ रंग : तांबूस | अंक : १
वैवाहीक जिवनांत आनंद द्विगुणीत करणारी घटना घडेल. नवे  स्नेहसंबंध जुळतील. नाती  जपण्यासाठी खरे बोलण्यापेक्षा गोड बोलणे हिताचे राहील.

कन्या : शुभ रंग : पांढरा | अंक : ८
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल.आज तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. मुलांकडून आज काही सुवार्ता येणार आहेत.           

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : ७
कितीही व्यस्त असलात तरी वेळात वेळ काढून  आज एखाद्या करमणूकीच्या कार्यक्रमाचा आसवाद घ्याल. आज अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल राहील. 

वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ४
परिवारात काही आनंदी घटनांनी खेळीमेळीचे वातावरण राहील. अनेक दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावणे  तुमच्या  हाती आहे. खेळाडूंनी सराव वाढवावा.      

धनू :  शुभ रंग : केशरी | अंक :
लेखन, पुस्तक प्रकाशन तसेच जाहिरातीच्या क्षेत्रात अनुकूलता राहील. साहित्यिक, कवी यांना वाचकवर्ग मिळेल. कोणतेही गैरव्यवहार मात्र टाळायला हवेत. 

मकर : शुभ रंग : मोतिया | अंक : ९
आनंदी व उत्साही दिवस. खिशात पैसा खेळता राहील.काही नवे हितसंबंध जुळतील. आज वाणीवर मात्र लगाम असणे अत्यंत गरजेचे राहील. शेजारी वाद शक्य.   

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
स्वभावातील लहरीपणास आवर घालून संयमाने वागणे गरजेचे आहे. स्पर्धकांवर मात करण्यासाठी अविश्रांत परिश्रम  अवश्यक  आहेत. जोडीदार समजूतीने घेईल.       

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
समाज हिताची कामे करणाऱ्यांना लोकप्रियता मिळेल. योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे यशाकडे तुमची वाटचाल चालू राहील. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल.