Todays Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, 12 पैकी या 7 राशीचे लोक जॉब आणि बिझनेसमध्ये राहतील लकी, वाचा तुमच्यासाठी कसा राहील दिवस

दिव्य मराठी

Aug 07,2019 12:05:00 AM IST

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार
बुधवार 7 ऑगस्ट रोजी स्वाती नक्षत्र असल्यामुळे शुभ नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : चंदेरी | अंक : १ भागिदरी व्यवसायात मतभेद संभवतात. मर्यादेबाहेर आर्थिक धाडस नको. मंगलकार्या विषयी बोलणी यशस्वी होतील. वैवाहीक जिवनांत शांती राहील.वृषभ : शुभ रंग : शुभ रंग : राखाडी | अंक : ३ महत्वाची कामे दुपारपर्यंत उरकून घ्या, नंतर दिवस तितकासा अनुकूल नाही. जोडीदाराचेे मूड सांभाळताना नाकी नऊ येतील. आज कमीच बोललेले बरे राहील.मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : २ व्यवसाय वृध्दीसाठी अवश्यक भांडवलाची सोय होईल. पूर्वीच्या मेहनतीची फळे दृष्टीक्षेपात येतील.विरोधकांवर तुमचा वचक राहील. स्वप्नपूर्तीचा दिवस.कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ आज दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण राहील. मस्त दिवस.सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४ कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशा पदरी पडेल. महत्वाच्या कामानिमित्त पायपीट होण्याची शक्यता आहे. आज आईशी वादविवाद संभवतात.कन्या : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६ आर्थिक अडचणींवर योग्य तोडगा सापडेल. आज दुपरनंतर काही थकलेली येणी वसूल होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या कतृत्वास वाव देणारा दिवस.तूळ : शुभ रंग : आकाशी | अंक : ८ पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७ आज कार्यक्षेत्रात विरोधकांशीही मिळते जुळते घेऊनच कामे करावी लागणार आहेत. आपल्या भावी योजना स्पर्धकांना कळणार नाहीत याची काळजी घेतलेली बरी.धनू : शुभ रंग : निळा| अंक : ९ एखाद्या नव्या कामाचा शुभारंभ आज दिवसाच्या पूर्वार्धातच करा. काही नवे हितसंबंध जोडले जातील. दुपारनंतर उद्भवणाऱ्या अनपेक्षित खर्चाची तरतूद ठेवा.मकर: शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७ नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुम्ही जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : ८ नोकरीत वरीष्ठांना खूष करण्यासाठी काही न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतील. तत्वांना मुरड घालून न आवडणारी कामेही करावी लागणार आहेत.मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : २ तुमच्यातील सुप्त गुणांस वाव देणारा दिवस आहे. वाणीत गोडवा ठेवलात तर आज अनेक क्लीष्ट कामे सोपी होतील. झेपेल तेवढीच दगदग करा.
X