Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाऊन घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

रिलिजन डेस्क | Update - Jan 09, 2019, 12:00 AM IST

बुधवार राशिफळ : सिद्धी योगामध्ये दिवसाची सुरुवात या 7 राशीच्या लोकांना होऊ शकते एक्स्ट्रॉ इन्कम, सेव्हिंगही वाढेल. बिझने

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  बुधवार 9 जानेवारीला धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील....

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  मेष : व्यवसायात उत्तम आर्थिक लाभ होतील. आलेल्या सुसंधींचा सकारात्मकतेने वापर कराल. आज काही गरजू मित्रांच्या कामी याल. परोपकार कराल. शुभ रंग : मरुन | अंक : ८

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  वृषभ : आज काही मन हळवे करणारे प्रसंग घडतील. वडीलधाऱ्यांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल. अध्यात्मिक विषयात गोडी निर्माण होईल. शुभ रंग : तांबूस | अंक : ५

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  मिथुन : उद्योग धंद्यातील मंदीने नैराश्य येईल. नोकरदारांनी कामाच्या ठीकाणी सतर्कता बाळगावी. हितशत्रू आज मित्रांमधेच लपले असण्याची शक्यता आहे. शुभ रंग : क्रिम | अंक : ३

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  कर्क : कार्यक्षेत्रात प्रगतीरथ वेगवान राहील. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. आज आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय अचूक ठरतील.  शुभ रंग : निळा | अंक : ६

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  सिंह : आज अत्यंत आनंदी व उत्साही दिवस अाहे. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटल्याने दीर्घकाळ रखडलेली कामेही पूर्ण होतील. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. शुभ रंग : गुलाबी | अंक : ९ 

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  कन्या : कोणतेही महत्वाचे निर्णय भावनेच्या भरात घेऊन चालणार नाहीत. वैवाहीक जिवनांत काही लाडीक रुसवे फुगवे रहातीलच. तरुणांनी प्रेम डोळसपणे करावे. शुभ रंग : सोनेरी | अंक : ४

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  तूळ : आज तुम्ही सर्वप्रथम कर्तव्यास प्राधान्य द्याल. काही घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाल. आईच्या प्रकृतीची विचारपूस करा.  प्रिय मित्रांचा सहवास लाभणार आहे.  शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  वृश्चिक : आज कार्यक्षेत्रात अतिरीक्त जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतील. कुठलीही गोष्ट सहज साध्य होणार नसली तरी तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस आज नक्की मिळेल.  शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  धनू : आर्थिक बाजू भक्कम असल्याने मोठया खरेदीचे बेत  आखता येतील. गृहीणी आज घरसजावटीचे मनावर घेतील. मुले अभ्यासा व्यतिरीक्त सर्व काही करतील.  शुभ रंग : अबोली | अंक : २

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  मकर : कार्यक्षेत्रात अनुभवींचे सल्ले डावलू नका. आपली  मते इतरांस पटणार नाहीत. मित्र अपेक्षित सहकार्य करतील. कर्जप्रस्ताव मंजूर होतील. झटपट लाभाचा मोह टाळा. शुभ रंग : राखाडी | अंक : ३

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  कुंभ : आज मनोबल कमी असून नकारात्मक मन:स्थिती असेल. वडीलधारी मंडळी उपदेशांचे डोस पाजून बोअर करतील. आज दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल राहील.  शुभ रंग : पांढरा | अंक : ६

 • aajache rashibhavishya Wednesday 9 January 2019 Daily horoscope in marathi

  मीन : असलेला पैसा जपून वापरणे गरजेचे आहे. संध्याकाळी एखादा मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. अती स्पष्ट स्वभावामुळे काही नाती दूरावतील. कमीच बोला. शुभ रंग : राखाडी | अंक : ३ 

Trending