आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसाचारावर सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी; आतापर्यंत 334 एफआयआर, दंगल-अफवा पसरवणाऱ्या 34 जणांना अटक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराविषयी दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्ट बुधवारी सुनावणी करणार आहे. रविवारी रात्री राजधानीच्या अनेक भागांमध्ये तणाव पसरण्याची अफवा उडाली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई करत रोहिणीहून एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी अनेक भागांमध्ये फ्लॅग मार्च केला. चौका चौकात सुरक्षारक्षक तैनात आहेत. हिंसेत मारल्या गेलेल्यांच्या आकडा 46 झाला आहे. पोलिसांनी उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये हिंसाचारावरून आतापर्यंत 334 एफआयआर दाखल केली गेली आहे. यामध्ये 44 प्रकरणे आर्म्स एक्टची आहेत. 33 लोक आता झाले, तर 800 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली जात आहे. 

जीटीबी रुग्णालयात 38, एनएनजेपीमध्ये 3, आरएमएलमध्ये 4 आणि जेपीसी रुग्णालयात एका मृत्यूची नोंद झाली आहे. तर जखमींची संख्या 200 पेक्षा जास्त आहे. तसेच हिंसाचाराने प्रभावित भागांमध्ये नदीतून काढले गेलेले 4 मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले गेले आहे. यानंतरच स्पष्ट होईल की, हे लोक हिंसाचारामध्ये मारले गेलेले आहेत की नाही हेदेखील कळेल.  

कडक सुरक्षेदरम्यान बोर्डाच्या परीक्षा सुरु, पोलिसांनी वाटली फुले... 

सोमवारपासून सीबीएसईच्या परीक्षा पूर्व निर्धारित कार्यक्रमानुसार सुरु झाल्या आहेत. दिल्लीच्या हिंसाग्रस्त भागांतील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. येथे परीक्षा केंद्रांवर 98% उपस्थिती होती. दिल्ली हायकोर्टाच्या आदेशावरून शाळांजवळही पोलिसदल तैनात आहे. अनेक शाळांच्या बाहेर पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गुलाबाची फुलेदेखील वाटली. 

दिल्ली विधानसभेने 9 सदस्यीय कमिटी बनवली... 

हिंसाग्रस्त भागांमध्ये शांतता आणि सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी दिल्ली विधानसभेने 9 सदस्सीय कमिटी बनवली आहे. याचे अध्यक्ष्यत्व आम आदमी पार्टीचे आमदार सौरभ भारद्वाज करतील कमिटीची पहिली बैठक सोमवारच्या संध्याकाळी तीन वाजता होईल. 

काही समाजकंटक अफवा पसरवत आहेत... पोलिस 

दिल्ली पोलिसांचे पीआरओ एमएस रंधावा यांनी सांगितले, काही समाजकंटक अशा अफवाह पसरवत आहेत की, ज्यामुळे शांततेत बाधा येईल. लोकांना सूचित करण्यात येत आहे की, अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये. पूर्ण दिल्लीमध्ये कायदा व्यवस्था नियंत्रणात आहे. दिल्लीच्या नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी आम्हाला मदत करावी. आम्हाला जनकपुरी ईस्ट, जनकपुरी वेस्ट, ख्याला, हरिनगर, मदनपुर खादर यांसह अनेक भागांतून पॅनिक कॉल आलेले आहेत. पोलिस सोशल मीडियाची निगरानी करत आहे. अफवा पसरावणाऱ्यांवर कारवाई होईल. 

बातम्या आणखी आहेत...