Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

साप्ताहिक राशीफळ : 12 पैकी 7 राशींसाठी भाग्योदयाचा काळ, 5 राशीच्या लोकांनी राहावे सावध 

रिलिजन डेस्क | Update - Feb 12, 2019, 12:01 AM IST

13 फेब्रुवारीला सूर्य बदलत आहे राशी, चंद्र 3 वेळेस बदलणार राशी, वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात अचानक होऊ शकतो धनलाभ,

 • Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

  या आठवड्यात बुधवार 13 फेब्रुवारीला सूर्य राशी परिवर्तन करेल. हा ग्रह मकर राशीतून कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र 10 फेब्रुवारीला मेष राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 12 तारखेला वृषभमध्ये आणि 14 तारखेला मिथुन राशीमध्ये जाईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सूर्य आणि चंद्रा स्थितीनुसार तुमच्यासाठी हा आठवडा म्हणजे 10 ते 16 फेब्रुवारीपर्यंतचा काळ कसा राहील...


  मेष
  अडचणींतून बाहेर पडण्याचा प्रयत्न अपयशी ठरू शकतो. बाराव्या चंद्रामुळेही आर्थिक अडचणी वाढू शकतात. उत्साह कमी होईल. योजनांना यश मिळणार नाही.सोमवारनंतर स्थितीत सुधारणा होईल. यशाचे मार्ग मोकळे होतील. विचारात स्थैर्य येईल. धनाची आवक वाढेल.


  व्यवसाय : सजावट साहित्य, तांदळात लाभ. स्त्रियांना नोकरीत बढती मिळेल.
  शिक्षण: शैक्षणिक कामे करावी लागू शकतात. शिक्षणात अडथळे येतील.
  आरोग्य: सतर्क राहा. आरोग्यासाठी हा काळजीचा काळ आहे.
  प्रेम : साथीदाराच्या वर्तनाने दुखावले जाल. वैवाहिक जीवनात तणाव.
  व्रत : शिवलिंगावर जल आणि अक्षता अर्पण करा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

 • Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

  वृषभ 
  गुरूच्या दृष्टीमुळे अचानक लाभाचे योग आहेत. पाहुण्यांचे आगमन होईल. प्रतिष्ठित लोकांशी भेट होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून येत असलेल्या अडचणी संपतील.नवी कामे मिळतील. आठवड्याच्या मध्यात किरकोळ आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 


  व्यवसाय: सिमेंट, लोखंड विक्रेत्यांना लाभ. नोकरीत बढतीचे योग आहेत. 
  शिक्षण : महत्त्वाच्या विषयांत पकड निर्माण करण्यात यश मिळेल. 
  आरोग्य: आठवड्याच्या मध्यात आरोग्य समस्या उद्भवू शकतात. 
  प्रेम : प्रेमसंबंध मधुर. जोडीदाराकडून आनंदाचे क्षण वाट्याला येतील. 
  व्रत : स्वत:च्या आणि इतर मुलांना गोड खाऊ घाला. 

 • Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

  मिथुन 
  शुक्र-शनीच्या पूर्ण दृष्टीमुळे निराशा निर्माण होऊ शकते. एखाद्या प्रेरकाची गरज भासेल. नेहमीची कामे करण्याकडे कल राहू शकतो. बुधवारी आणि गुरुवारी संघर्षाची स्थिती असेल. सरकारी कामांतही विलंब होईल. शुक्रवारपासून काळ अनुकूल राहील. लाभवाढीसह अपत्यापासून सुख मिळेल. 


  व्यवसाय: कागद, टायर, हॉटेल व्यावसायिकांसाठी तणावाचा काळ. 
  शिक्षण: शिक्षणात अडचणी येतील. मित्रांची मदत घ्यावी लागू शकते. 
  आरोग्य: आठवडाअखेर आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. 
  प्रेम : प्रेमसंबंध कायम राखणे कठीण होईल. दांपत्य जीवन आनंदी असेल. 
  व्रत : गायत्री मंत्राचा जप करा आणि गहू दान करा. 

 • Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

  कर्क 
  राहूचे गोचर. सूर्य-मंगळ आणि गुरूच्या दृष्टीमुळे मानसिक अडचणी संपतील. लक्ष्यावर दृष्टी ठेवण्यात यश मिळेल. योजना फळास येतील. गुरुवारपर्यंत एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. समाजात सन्मान वाढेल. अपत्याकडूनही सुखप्राप्ती होईल.आर्थिक स्थितीही चांगली होईल. 


  व्यवसाय: कृषी आणि जमिनीशी संबंधितांना लाभ. कार्यस्थळी तणाव. 
  शिक्षण: विमानचालक, व्यवस्थापन, बँकिंगच्या विद्यार्थ्यांना यश. 
  आरोग्य: पोटाशी संबंधित तक्रारी होऊ शकतात. आहाराकडे लक्ष द्या. 
  प्रेम : प्रेमसंबंधांत परिपूर्णता राहील.वैवाहिक जीवनात तणाव संपेल. 
  व्रत : ऊँ नम: शिवाय या मंत्राचा एक माळ जप करा. 

 • Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

  सिंह 
  बुधाची दृष्टी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस पैशांची उणीव भासू शकते. वादांचा सामनाही करावा लागू शकतो. मंगळवारी संध्याकाळपासून स्थितीवर नियंत्रण राहील. बुधवारपर्यंत राशिस्वामी सूर्याची दृष्टी प्राप्त होईल. हा काळ चिंता आणि अज्ञात भीती कमी होण्याचा असू शकतो. 


  व्यवसाय । यशासाठी संघर्ष आणि नोकरातील तणावाचे योग संपतील. 
  शिक्षण: नवे प्रकल्प मिळतील. शिक्षकांचा विश्वास जिंकण्यात यश. 
  आरोग्य: नसा, हाडांत वेदना होऊ शकतात. अति व्यग्रतेमुळे थकवा. 
  प्रेम : जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमप्रस्ताव टाळा. 
  व्रत : हनुमंताला बेसनाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा.

 • Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

  कन्या 
  चंद्राच्या सातव्या पूर्ण दृष्टीमुळे उत्पन्नाच्या स्रोतांत वाढ होईल. धनप्राप्ती सोपी होईल. न्यायालयीन वादात यश मिळण्याचे मार्ग मिळतील. विस्कळीत कामे सुरळीत करण्यात यश मिळेल. प्रवास फायदेशीर ठरतील. एखादे विशेष काम झाल्याने कुटुंबात आनंद निर्माण होईल. 


  व्यवसाय: मेडिकल, फॅशन, सिनेमा, औषधांशी संबंधित लोकांना फायदा. 
  शिक्षण: स्पर्धा परीक्षांत स्थिती चांगली राहील. वरिष्ठांशी तणावाची शक्यता. 
  आरोग्य: खोकला, सर्दी आणि कानदुखीसह हातात वेदना शक्य. 
  प्रेम : प्रेमप्रकरणाबाबत अज्ञात भीती. काही रहस्ये उघड होऊ शकतात. 
  व्रत : सूर्याला दूधमिश्रित पाणी अर्पण करा. 

 • Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

  तूळ 
  वर्तमानातील कामाव्यतिरिक्त एखादे नवे काम मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक व व्यावसायिक प्रकरणात जबाबदाऱ्या वाढतील व जास्त व्यग्र राहाल. द्वितीय गुरू व सप्तम मंगळ असल्याने सरकारी कामांत यश मिळेल तसेच अडथळे समाप्त होतील. आर्थिक प्रकरण संपूर्ण आठवडाभर चांगले राहील. 


  व्यवसाय: बँकिंग, कागद व रंगाचे काम करणाऱ्यांसाठी लाभदायक. 
  शिक्षण : उच्च शिक्षणासाठी प्रवास होईल.स्पर्धा परीक्षेचा निकाल अनुकूल. 
  आरोग्य: त्वचा ,सर्दी-पडसे, पुरळ, फोड होऊ शकतात. 
  प्रेम : जोडीदाराशी तणाव तसेच पती/पत्नीसोबत फिरण्याची संधी मिळेल. 
  व्रत : दुर्गा मातेसमोर तुपाचा दिवा लावा. 

 • Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

  वृश्चिक 
  गुरूचे गोचर व मंगळाची अष्टम दृष्टी असल्यामुळे प्रभावात वाढ होईल व शासकीय कामांत यश मिळेल. संपर्काचा फायदा मिळेल व धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. चंद्राची स्थिती आर्थिक प्रकरणे बळकट ठरवेल. प्रवास यशस्वी होतील. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. 


  व्यवसाय : रसायन, खते तसेच चर्माेद्योगातील व्यावसायिकांना लाभ. 
  शिक्षण : प्रकल्प पूर्ण होतील व आनंददायक निकाल हाती येईल. 
  आरोग्य: आरोग्य उत्तम राहील व जुने रोगे बरे होण्यास मदत मिळेल. 
  प्रेम : प्रेम जीवनात यश व दांपत्य जीवन सुखी राहील. 
  व्रत : श्रीशंकर-पार्वतीचे दर्शन घ्या, पूजा करा. 

 • Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

  धनू 
  काळ अनुकूल आहे. राशीत काही विशेष योग तयार झाले आहेत. यामुळे यशप्राप्ती होऊन दीर्घकालीन लाभ मिळू शकेल. आठवड्याच्या सुरुवातीस काहीशी निराशा राहील. मात्र, त्यानंतरच्या कामात गती येईल. प्रतिष्ठेत वाढ होईल व आठवड्यात धनलाभ होण्याचाही योग आहे. 


  व्यवसाय: सीए, शिक्षक, लेखक, अभिनय क्षेत्रातील लोकांना लाभ. 
  शिक्षण: उत्कृष्ट कामगिरी राहील.उच्चशिक्षितांसाठी अडचणी शक्य. 
  आरोग्य: प्रकृती चांगली राहील.केवळ कामाचा थकवा जाणवेल. 
  प्रेम : प्रेमसंबंधांत तणाव राहू शकतो.पती/ पत्नीचे सहकार्य मिळेल. 
  व्रत : श्री विष्णूचे दर्शन घेऊन पूजा करा. 

 • Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

  मकर 
  राशिस्वामी शनी कायम असल्यामुळे सक्रियता कमी असेल. प्रत्येक कामात विलंब होण्याची शक्यता आहे. पैसे व घरासंबंधी प्रकरणात तेजी येईल व आवश्यक प्रवासाचा योग आहे. गुरुवारी आवश्यक धनलाभाचा योग आहे. शनिवारी कुटुंबासोबत फिरायला जाण्याची संधी मिळेल. 


  व्यवसाय: आर्किटेक्ट, कन्सल्टिंग व फॅशनचे काम करणाऱ्यांसाठी फायदा. 
  शिक्षण : अभ्यासातून लक्ष विचलित होईल. अभ्यासात सातत्य ठेवा. 
  स्वास्थ्य : त्वचा व डोळ्यांसंबंधी आजार होऊ शकतात. 
  प्रेम : पती/ पत्नीची साथ मिळेल व प्रेमात आत्मीयता राहील. 
  व्रत : गणपतीचे दर्शन घ्या तसेच पूजा करा. 

 • Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

  कुंभ 
  राशिस्वामी शनीची पूर्ण दृष्टी, सूर्य द्वादशस्थानी असल्यामुळे राशीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ठरवलेल्या कामांत बदल करावा लागू शकतो. आळस भरल्यामुळे कामात मन न रमण्याची समस्या राहू शकते. नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याची योजना मागे घ्या आणि धैर्यपूर्वक काम करत राहा. 


  व्यवसाय : गुंतवणुकीतून अल्प लाभ मिळेल. दीर्घ गुुंतवणूक टाळा. 
  शिक्षण :स्पर्धेत तुमची बाजू वरचढ ठरण्याची शक्यता आहे. 
  आरोग्य: आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्य समस्या संपुष्टात येतील. 
  प्रेम : जोडीदाराच्या वागणुकीत सकारात्मक बदल होईल. 
  व्रत : कार्तिकेयासमोर मंगळवारी दिवा लावा. 

 • Weekly Horoscope 10 to 16 February 2019 in Marathi

  मीन 
  चंद्राचे गोचर व गुरूची पंचम पूर्ण दृष्टी आता राशीवर आहे. पैशाअडक्याच्या प्रकरणांत यश मिळेल व अन्य विविध कामे एकाच वेळी करण्याची संधी मिळेल. राजकारण्यांना यश मिळण्याचा योग आहे. दुसऱ्यांची मदत करावी लागू शकते. आठवड्यात खर्चही जास्त होऊ शकतो. 


  व्यवसाय: किराणा, स्टेशनरी, कपडे, शेतीसंबंधी व्यवसाय करणाऱ्यांना लाभ. 
  शिक्षण : अभ्यासात सुधारणा होईल.नवे काम मिळेल, प्रवास शक्य आहे. 
  आरोग्य: संततीच्या आरोग्याची चिंता राहील. अपचनाची तक्रार होऊ शकते. 
  प्रेम : प्रेमसंबंधात सामान्य स्थिती राहील. दंापत्य जीवनात सुख राहील. 
  व्रत : श्रीराधा-कृष्णाचे दर्शन घ्या. 

Trending