Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

साप्ताहिक राशीफळ : सर्व 12 राशींसाठी कसा राहील 10 ते 16 मार्चपर्यंतच काळ 

दिव्य मराठी | Update - Mar 11, 2019, 12:02 AM IST

मंगळ आणि चंद्राच्या योगाने होत आहे आठवड्याची सुरुवात, 15 मार्चला सूर्य आणि बुध करणार राशी परिवर्तन, कुंभ राशीतून एक ग्रह

 • weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

  मार्च महिन्यातील नवीन आठवड्याच्या सुरुवातीला मंगळ आणि चंद्र एकाच राशीमध्ये आहेत. या दोघांचा योग 12 मार्चपर्यंत राहील. त्यानंतर चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल. शुक्रवार 15 मार्चला सूर्य आणि बुध राशी परिवर्तन करत आहेत. सूर्य कुंभ राशीमधून मीन राशीत प्रवेश करेल. बुध सध्या वक्री असून मीनधून कुंभ राशीत प्रवेश करेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी 10 ते 16 मार्चपर्यंतचा हा आठवडा कसा राहील...


  मेष
  मंगळ-चंद्राची युती राशीत असल्याने राजयोग राहील. प्रयत्नांनी यशप्राप्ती होईल व वडिलांकडून सुखप्राप्ती होईल. यासोबत कामात व्यग्रता राहील. चहुकडून प्रशंसा होईल तसेच मालमत्तेत वाढ होण्याचा योग राहील. पुरस्कार प्राप्त होण्याची शक्यता आहे.आठवड्यात पराक्रम श्रेष्ठ राहील, शिवाय भावांचे सहकार्यही मिळणार आहे.


  व्यवसाय : व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली जाईल.
  शिक्षण: वेळ चांगली राहील. वरिष्ठ व शिक्षकांचे सहकार्य मिळेल.
  आरोग्य: अनिद्रेची समस्या होऊ शकते. तणावाची समस्या राहील.
  प्रेम : प्रेमसंबंधात उन्मादापासून दूर राहा. चर्चेने वाद सोडवा.
  व्रत : गरीब मुलांना वस्त्र दान करा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

 • weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

  वृषभ
  आठवड्याच्या सुरुवातीस आर्थिक चणचण भासू शकते. प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त प्रवास करावा लागेल. स्वत:च्या मताचा पुरस्कार करण्यासाठी हट्ट धराल. अनोळखी व्यक्तींच्या बहकाव्यात येण्यापासून दूर राहा तसेच मित्रांच्या सल्ल्याचा विचार करा.  आठवड्यात आनंदी राहण्यायोग्य स्थिती.


  व्यवसाय : गंतवणूक टाळा. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकेल.
  शिक्षण: अभ्यासासाठी वेळ मिळेल. शिक्षकांचे सहकार्य मिळेल.
  आरोग्य: त्वचेसंबंधी समस्या होऊ शकते तसेच सांधेदुखी होऊ शकते.
  प्रेम : पती/ पत्नी, प्रेयसी/प्रियकरासोबत वेळ घालवाल.
  व्रत : कालीमातेचे दर्शन करणे शुभ राहील.

 • weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

  मिथुन
  कल्पनाशक्ती जास्त राहील व कोणतेही काम अस्तित्वात आणण्यासाठी उतावीळपणा केल्यास नुकसान होऊ शकते. नियमित कामापेक्षा अन्य काम करण्याची इच्छा होईल. मात्र, त्याचा उपयोग होणार नाही. आठवड्याच्या मध्यात पैशाची अडचण कायम राहील. यानंतर स्थिती रुळावर येईल.


  व्यवसाय: गुंतवणूक टाळा, नोकरी बदलाचा विचार सोडून द्या.
  शिक्षण: खूप अभ्यास करावा लागेल.स्वत:च्या कष्टावर विश्वास ठेवा.
  आरोग्य: कीटकाच्या चावण्याची भीती, धुळीची अॅलर्जी होऊ शकते.
  प्रेम : प्रेम प्रकरणांपासून दूर राहा.जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष द्या.
  व्रत : गरिबांना चपाती दान करा.

 • weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

  कर्क
  चंद्राच्या स्थितीने मध्यम योग राहील. राशीची स्थिती संघर्षानंतर यशाचे योग तयार करत आहे.कौटुंबिक जबाबदाऱ्यांत वाढ होईल व आठवड्याच्या मध्यात जास्त काळजी घ्यावी लागेल. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आठवड्यात पैशाची चिंता राहू शकते.


  व्यवसाय: कामाच्या ठिकाणी वर्चस्व राखण्यात अडचण. गंुतवणूक टाळा. 
  शिक्षण: शिक्षक अनुकूल असतील,मित्रांसोबत बाहेर जाऊ नका.
  आरोग्य: डोळे व खांदेदुखीची समस्या होऊ शकते.
  प्रेम : प्रेमप्रस्तावांत यश मिळेल. एकटे जाणे टाळा, सतर्क राहा. 
  व्रत : लहान मुलांना मिठाई दान करा.

 • weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

  सिंह
  राशिस्वामी सूर्याचा प्रभाव राशीवर कायम आहे. डोक्यात विचारांचा गोंधळ जास्त असेल, अस्थिरता कायम राहील.एकाग्रता राखण्यात अडचण येईल तसेच संताप जास्त होऊ शकतो. कामे जास्त राहतील व असंतोषाची भावना मनात राहील.आर्थिक प्रगतीच्या प्रयत्नांना उशिराने यश मिळेल.


  व्यवसाय: बुद्धी-वाणीचे काम करणाऱ्यांसाठी चांगला वेळ आहे. 
  शिक्षण: वेळ चांगली आहे. यश व आत्मविश्वास प्राप्त होईल. 
  आरोग्य: डाव्या डोळ्यात त्रास, डोकेदुखी व तणाव राहील.
  प्रेम : प्रेमात यश मिळेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल.
  व्रत : मसूर डाळ व लाल कपड्याचे दान करा.

 • weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

  कन्या
  सुखद आश्चर्यकारक माहिती मिळू शकेल. गेल्यावेळच्या नुकसानीचे लाभात रूपांतर करण्यात यशस्वी व्हाल.  नव्या योजनाही यशस्वी होतील. भागीदार अनुकूल राहील.मित्रांकडून सहकार्य प्राप्त होईल.सरकारी कामांत अग्रणी राहाल व नशिबाचीही साथ मिळेल. सुखद प्रवासाचा योग आहे.


  व्यवसाय: व्यवसाय विस्ताराची इच्छा होत असेल तर थोडे थांबलेले बरे.
  शिक्षण: चांगला निकाल प्राप्त होईल व भीती समाप्त होईल.
  आरोग्य: अपत्याच्या आरोग्याप्रति चिंता सतावेल.
  प्रेम : जोडीदाराचे सहकार्य मिळेल, प्रेमप्रकरणांपासून दूर राहा.
  व्रत : गरिबांना मुरमुऱ्याचे दान करा.

 • weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

  तूळ
  मंगळ व चंद्राच्या पूर्ण दृष्टीमुळे स्वाभाव निर्मळ होईल तसेच धनसंचयात वेग येईल. गुप्त विद्यांकडे आकर्षित व्हाल व धार्मिक कामांत मन रमेल. कामाचा व्याप वाढेल. आठवड्यात एकाच वेळी अनेक कामे करावी लागू शकतात. आठवड्याच्या मध्यात मोठे लाभ प्राप्त होऊ शकते.


  व्यवसाय: जमीन-इमारतीतून गुंतवणूक फायदा. बदलाची शक्यता.
  शिक्षण: उच्च  शिक्षितांना फायदा व स्पर्धेत यशस्वी व्हाल. 
  आरोग्य: हाडे व सांधेदुखीची समस्या कायम  राहू शकते.
  प्रेम : वैवाहिक  संबंध बळकट राहतील. प्रेमात यश मिळेल.
  व्रत : मंगळवारी गायीला गूळ-चपातीचा गोग्रास द्या.

 • weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

  वृश्चिक
  राशिस्वामी मंगळाची दृष्टी व गुरू राशीत आहेत. सर्व बाजूने अनुकूल वातावरण राहील. कामात त्वरित यश येण्याचे योग असतील.राजकारण्यांना मोठे यश प्राप्त होऊ शकते. विरोधकही तडजोड करण्याचा प्रयत्न करतील व आर्थिक स्थिती बळकट राहील. कामात नावीन्य प्राप्त होईल. 


  व्यवसाय: नव्या व्यापाराकडे कल असेल तसेच नोकरी बदल फायद्याचा.
  शिक्षण: पात्रतेपेक्षा जास्त निकाल प्राप्त कराल.
  आरोग्य: बेशिस्त खाण्याच्या सवयीतून पोटदुखी. अपचनाची तक्रार.
  प्रेम : वैवाहिक जीवनात प्रेमात वृद्धी व प्रेमप्रसंगातील सामंजस्यात कमतरता.
  व्रत : गरिबांना तळलेले पदार्थ दान करा.

 • weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

  धनू
  शनी राशीत आहे. संलग्न काम मन नसेल व काही नवे करण्याची इच्छा होईल. वरिष्ठांकडून निराशा होईल. कष्टानंतरही श्रेय न मिळाल्याने निराशा राहील. आठवड्याच्या मध्यानंतर काही सुधारेणची शक्यता राहते तसेच आठवड्यात आवडीचे यश प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल.


  व्यवसाय: व्यापारातील लाभ मिळेल. नोकरीत शत्रूंपासून सावध राहा.
  शिक्षण: शिक्षणात नि:पक्ष राहणे हिताचे आहे. कोणत्या वादात अडकू नका. 
  आरोग्य: आठवड्यात सर्दी-पडशाची तक्रार होऊ शकते.
  प्रेम : जोडीदाराप्रति आदरभाव राहील. प्रेमात यश मिळेल. 
  व्रत : लहान मुलांना कच्चे दूध दान करा.

 • weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

  मकर
  कामातील अडथळ्यांमुळे त्रास होऊ शकतो. मात्र, स्वकष्टाने यश प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. वागणुकीत बदल होऊ शकतो. जास्त तणाव राहू शकतो, आठवड्याच्या मध्यात पैशाची वेगात प्राप्ती होण्याची शक्यता आहे. आठवड्यात उत्साह वाढेल व कामात सुधारण्याची शक्यता आहे.


  व्यवसाय: भागीदारांमध्ये  मतभेद शक्य आहेत. कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून त्रास.
  शिक्षण: परीक्षांच्या तारखा वाढण्याची शक्यता आहे.
  आरोग्य:त्वचेची अॅलर्जी होऊ शकते.वडिलांच्या आरोग्याची चिंता राहील.
  प्रेम : रागावर नियंत्रण व जोडीदारावर विश्वास ठेवणे आवश्यक.
  व्रत : मंदिरात झाडूचे दान करा.

 • weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

  कुंभ
  स्थावर मालमत्तांचे वाद वाढण्याची शक्यता राहील व तृतीय चंद्रामुळे आर्थिक स्थिती सुदृढ राहील.कुटुंबाकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. उधारीत दिलेला पैसा अडकू शकतो. आठवड्याच्या अखेरीस जास्त खर्च होऊ शकतो. कर्ज घेण्याची इच्छा असेल तर ते टाळण्याचा प्रयत्न करा.


  व्यवसाय: व्यवसायासाठी शुभ वेळ. कामाच्या  ठिकाणी वर्चस्व राहील.
  शिक्षण: अभ्यासात मन कमी रमेल. वेळेचा अपव्यय होईल.
  आरोग्य: अनियमित जेवणामुळे अपचनाची समस्या होऊ शकते.
  प्रेम : अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव प्राप्त होतील व प्रेमात भेटवस्तू मिळेल.
  व्रत : पशू-पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा.

 • weekly horoscope 10 to 16 March 2019 in Marathi

  मीन
  पराक्रम श्रेष्ठ राहील व शत्रूंवर मात देण्यात यशस्वी राहाल. आधुनिक सुख-सुविधांवर खर्च होण्याची शक्यता आहे. नशीब अनुकूल राहील व बुधवारनंतर एखादा मोठा आनंद होण्याची शक्यता आहे. द्वितीयेत चंद्र असल्याने निश्चित उत्पन्न राहील. पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.


  व्यवसाय: व्यापारासाठी कर्जाची आवश्यकता पडू शकते.
  शिक्षण: सराव परीक्षांमध्ये चांगले गुण पडू शकतात.
  आरोग्य: मनाने औषध घेऊ नका. औषध व अन्य सामग्रीने अॅलर्जी शक्य. 
  प्रेम : वैवाहिक जीवनात तणाव कमी होईल व आनंद मिळेल.
  व्रत : गायीला गूळ खाऊ घाला.

Trending