आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशीफळ : जाणून घ्या, नोकरी, पैसा, बिझनेस, लव्ह-लाइफसाठी कसा राहील हा आठवडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबरचा हा आठवडा काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी त्रासदायक राहील. या आठवड्यात चंद्र कन्या राशीपासून वृश्चिक राशीपर्यंत जाईल. या आठवड्याच्या सुरुवातील चंद्रावर शनीची वक्रदृष्टी राहील आणि आठवड्याच्या शेवटी राहुमुळे चंद्र पीडित राहील. या व्यतिरिक्त सप्ताहाच्या मध्ये गुरु आणि चंद्र एकाच राशीत असल्यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग जुळून येत आहे. अशाप्रकारे ग्रहांची शुभ-अशुभ स्थिती असल्यामुळे काही राशींसाठी शुभ तरी काहीसांठी अशुभ ठरू शकतो हा आठवडा.


मेष 
राशिस्वामी मंगळ उच्च आहे. यामुळे वैचारिक द्वंद्व संपुष्टात येईल तसेच मंगळाची दृष्टी राशीवर असल्यामुळे जमिनीच्या कामांना गती येईल. कुटुंबात वैचारिक मतभेद कमी होऊन समाजात सन्मानही मिळू शकेल. अज्ञात भीती सतावू शकते. मात्र, चंद्र अनुकूल असल्यामुळे कोणत्याही कार्यात अडथळा येणार नाही.

 
व्यवसाय व नोकरी : गुंतवणूक करताना सावध राहा. व्यापार विस्तार टाळा. 
शिक्षण : आधुनिक सुविधा प्राप्त होतील व प्रकल्पावरही खर्च शक्य. 
आरोग्य : पाय दुखू शकतात. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी 
प्रेम : प्रेम प्रस्तावात निराशा होऊ शकते. वैवाहिक जीवनात समाधान राहील. 
व्रत : मंगळवारी मसूर डाळीचे सेवन करा. 


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकासांठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...