Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Weekly Horoscope 13 to 19 may in marathi

साप्ताहिक राशिफळ : 13 ते 19 दरम्यान ग्रह-ताऱ्यांची स्थिती राहील खास, 12 पैकी या 8 राशीच्या लोकांना होऊ शकतो विशेष लाभ

रिलिजन डेस्क | Update - May 14, 2019, 12:05 AM IST

जाणून घ्या, तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे हा आठवडा

 • Weekly Horoscope 13 to 19 may in marathi

  या आठवड्यात चंद्र सिंहपासून वृश्चिक राशीपर्यंत जाईल. यामुळे चंद्रावर मंगळ आणि गुरुची दृष्टी राहील. गजकेसरी नावाचा राजयोग आणि महालक्ष्मी योग जुळून येईल. या 2 शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहारामध्ये फायदा होण्याचे योग आहेत. नोकरी आणि बिझनेसमध्ये पुढे जाण्याची संधी आहे. अपूर्ण कामे पूर्ण होतील. लव्हलाईफ आणि आरोग्यासाठी काळ चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र फळ देणारा राहील.


  मेष
  चंद्र चतुर्थ हाेण्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक अडचणी जाणवतील. साेमवारी संध्याकाळपासून परिस्थितीत सुधारणा हाेईल आणि वाद-विवादांपासून मूक्ती मिळेल. बुधवारी एखादे माेठे काम हाेईल. सध्याच्या संपत्तीत वाढ हाेण्याबराेबरच अन्य सुविधा मिळतील.


  व्यवसाय : अडकलेल्या धनाची प्राप्ती. नवीन उद्याेगातील अडचणी दूर हाेतील.
  शिक्षण : खेळात चांगली कामगिरी हाेईल. चित्रकलेत प्रगती हाेईल.आरोग्य: मन अशांंत राहील. पाेटाचा जुना विकार त्रास देईल.
  प्रेम : विवाहात अडचणी निर्माण हाेण्याची शक्यता आहे.
  व्रत : महादेवाला थंड पाणी अर्पण करा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

 • Weekly Horoscope 13 to 19 may in marathi

  तूळ 
  स्वत:च्या कार्यक्षमतेला उभारी मिळेल. दुसऱ्यांकडून मागितलेली मदत फलद्रूप हाेऊन सहकार्य मिळेल. तुमच्या विविध अडचणी दूर हाेण्याबराेबरच तुमचा मान-सन्मान वाढेल. धार्मिक सहलींची संधी आहे. गुरुवारी लहान धनलाभाचा याेग आहे. कायद्याच्या प्रकरणांमध्ये तुम्हाला वश मिळेल. 


  व्यवसाय : व्यवसायात बदल करण्याचा विचार कराल. नाेकरीत जबाबदारी वाढेल. 
  शिक्षण : पाेहण्यामध्ये लाभ मिळेल. मनाेरंजनात वेळ व्यतीत हाेईल. 
  आरोग्य : वाहनांपासून सावध रहा. डााेळे, डाेके दु:खीची शक्यता. 
  प्रेम : जुन्या तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी जाेडीदाराची मदत मिळेल. 
  व्रत : महाकालीचे ध्यान केल्यानंतरच घर साेडा. 

 • Weekly Horoscope 13 to 19 may in marathi

  मकर 
  मंगळ आणि चंद्राची पूर्ण दृष्टी लाभदायक स्थितीत कायम राहंील. साेमवार- मंगळवार साेडून उर्वरित दिवसात आर्थिक लाभ मिळण्याच्यादृष्टीने मार्गक्रमणा सुरू हाेईल. प्रभावशाली व्यक्तींची साथ मिळून याेग्य निर्णय घ्याल. परदेश यात्रेच्या इच्छेत यश मिळेल. 


  व्यवसाय : वनवीन याेजना बनवाल. उद्याेगांना लाभ मिळेल. 
  शिक्षण : अभिनय, चित्रकला, कलाकुसर, भाषेचा अभ्यास करणाऱ्यांना लाभ मिळेल. 
  आरोग्य : मधुमेहीसाठी आराेग्य लाभदायक. अन्य राेग सामान्य राहतील 
  प्रेम : जाेडीदाराला आनंदी ठेवण्यात यश मिळेल. आकर्षण वाढेल. 
  व्रत : महालक्ष्मीची पूजा करा. 

 • Weekly Horoscope 13 to 19 may in marathi

  मीन 
  गुरुची पंचमदृष्टी या राशीवर असल्याने प्रभाव वाढेल आणि चांगले बाैध्दिक काम हाेऊ शकेल. चंद्राच्या स्थितीमुळे आर्थिक प्रकरणात अडचणी येणार नाहीत. न्यायालयीन बाजु भक्कम राहील. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. दुसऱ्यांची मदत करावी लागेल. 


  व्यवसाय : नाेकरीत कामगिरी सुधारेल. कृषि, उद्यान काम करणाऱ्यांना लाभ 
  शिक्षण : स्वत:चे मूल्यांकन करा, श्रेष‌्ठत्व सिध्द हाेईल. 
  आरोग्य : हात, पाेेट दु:खीची भिती, लाेखंडापासून नुकसानाची भिती. 
  प्रेम : जाेडीदाारामुळे संतुष्ट रहाल. प्रेमात यश मिळेल. 
  व्रत : हनुमानासमाेर तेलाचा दिवा लावावा. 

 • Weekly Horoscope 13 to 19 may in marathi

  कन्या 
  शनि राशीवर मंगळाची दृष्टी आहे. चंद्र एकादश राहणार असल्याने लाभदायक ठरेल. आठवड्यात मंगळवारी आणि बुधवारी आर्थिक अडचण भासू शकते. नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे. वर्चस्व वाढेल. खासगी व्यापामुळे कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. यात्रा- सहलीचे याेग संभवतात. 


  व्यवसाय : कामाचा भार वाढेल. व्यवसायासाठी नवीन व्यक्ती मिळतील. 
  शिक्षण : अनुभवी व्यक्तींची भेट हाेईल, खेळाबराेबर अभ्यासात श्रेष्ठता राहिल. 
  आरोग्य : रक्तदाब, साखरेचा त्रास हाेईल. धुळीत जाणे टाळा. 
  प्रेम : आठवणींमध्ये वेळ जाईल. मित्र- मैत्रिणींच्या भेटी हाेतील. 
  व्रत : लक्ष्मी- नारायणाला सुगंधित फुले अर्पण करा. 

 • Weekly Horoscope 13 to 19 may in marathi

  कर्क 
  चंद्राचा गाेचर आणि गुरुची दृष्टी तुम्हाला अद‌्भूत यश मिळवून देईल. चांगल्या संधी प्राप्त हाेतील. मंगळवारी आणि बुधवारी जास्त काही मिळवण्याच्या संधी गमवू शकता. गुरुवारी सकाळी चांगली बातमी एेकायला मिळू शकते. तुमच्या दूरच्या एखाद्या नातेवाईकाला शारिरीक कष्ट हाेऊ शकतात. 


  व्यवसाय : व्यापारात नवीन पर्याय मिळतील. नोकरीत बदलाची शक्यता. 
  शिक्षण : गायन, वादन, चित्रकलेबराेबर भाषा शिकण्याचा प्रयत्न करा. 
  आरोग्य : त्वचा विकारांचा त्रास, पाय दुखी हाेऊ शकते. 
  प्रेम : जाेडीदाराचे विचार दु:खी करतील. मनधरणी करावी लागेल. 
  व्रत : पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करा. 

 • Weekly Horoscope 13 to 19 may in marathi

  वृषभ 
  संपत्तीमध्ये वाढ हाेण्याचा याेग आहे परंतु साेमवारी, मंगळवारी चिंता अधिक राहतील. बुधवारपासून वेळ तुम्हाला अनुकूल असेल. चमत्काराच्या रुपाने तुमचे एखादे आवडते कार्य संपन्न हाेईल. लक्ष्य साध्य हाेण्याची शक्यता.असून वादविवादात जिंकाल. सुख- सुविधांच्या माध्यमातून आठवडा पूर्ती हाेईल. 


  व्यवसाय : नाेकरीमध्ये बदल शक्य. व्यवसायात लाभाची गणिते बनतील. 
  शिक्षण : कला आणि पाेहण्याच्या क्षेत्रात प्रयत्न केल्यास लाभ मिळेल . 
  आरोग्य : उन्हात त्वचा दाह हाेण्याची, गरमीचा त्रास हंाेऊ शकताे. 
  प्रेम : जोडीदाराच्या विरहामुळे बेचैनी वाढेल. विवाहाचे प्रस्ताव येतील. 
  व्रत : श्रीकृष्णाला खरबूज अर्पण करा. 

 • Weekly Horoscope 13 to 19 may in marathi

  सिंह 
  द्वादश चंद्र हाेण्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला अडचणी निर्माण हाेण्याची शक्यता आहे. मंगळवारनंतर परिस्थितीत सुधारणा हाेईल. अनेक कार्यरत सहभागी झाल्याने आनंद मिळेल. बिघडलेल्या कामांच्या स्थितीत सुधारणा हाेईल. आठवड्यात स्थितीत आणखी चांगली सुधारणा हाेईल. प्रतिष्ठा वाढीला लागेल. 


  व्यवसाय : व्यापारात तेजी येईल कर्जातून सुटकेसाठी उपाय मिळतील. 
  शिक्षण : प्रत्येक क्षेत्रात विराेधकांना नमाेहरम करण्यात सक्षम व्हाल. 
  आरोग्य : पाय जखमी,लचकण्याची भिती . दात दुखण्याची शक्यता 
  प्रेम : प्रेमसंबंधात सुधारणा हाेईल.मुलांसह आई- वडिलांकडून प्रेम मिळेल. 
  व्रत : हनुमानाच्या उजव्या बाजुला तुपाचा दिवा लावा. 

 • Weekly Horoscope 13 to 19 may in marathi

  मिथुन 
  जिथे उन्हाळा जास्त असेल अशा ठिकाणी प्रवासाची याेजना आखाल. चांगले कार्य करण्याचे मन करेल. काेणाची गाेष्ट न एेकण्याची आणि आपल्या गाेष्टीवर अडून राहण्याची प्रवृत्ती राहील. तुमच्या बाेलण्याने दुसऱ्यांचा अपमान हाेऊ शकताे. व्यवस्थेबद्दल तुम्हाला चीडही राहील. मन अस्थिर राहील. 


  व्यवसाय : नाेकरीत सहकाऱ्यांपासून सावध रहा. व्यापारात सतर्क रहा. 
  शिक्षण : चित्रकलेबराेबर वाद्यात स्वारस्य दाखवा त्यात यश मिळेल. 
  आरोग्य : शिळेअन्न खाल्याने पाेटाची तक्रार जाणवेल. उकळलेले पाणी प्या . 
  प्रेम : परस्परांबाबत आकर्षण वाढेल. वैवाहिक जीवन उत्तम राहील. 
  व्रत : महादेवाची आराधना करा. 

 • Weekly Horoscope 13 to 19 may in marathi

  कुंभ 
  शनिची पूर्णदृष्टी आणि चंद्राची अनुकूल स्थिती यामुळे गुरुवार, शुक्रवार वगळता अन्य वेळ सामान्य राहील. मंगळवारी सरकारी कामांमध्ये येणारे अडथळे संपुष्टात येतील. जमिनीशी संबंधित कामात लाभ मिळून स्थायी संपत्ती प्राप्त करण्याचा याेग आहे. 


  व्यवसाय : कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढेल. व्यापारात मर्यादीत लाभ. 
  शिक्षण : सिव्हील- इलेक्ट्रीकल अभियंता विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. 
  आरोग्य : पाय दुखी तसेच रक्तदाबाचा त्रास . पडसे हाेण्याची शक्यता 
  प्रेम : प्रेमी युगुलांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता. 
  व्रत : दुर्गा चालीसाचे वाचन करा. 

 • Weekly Horoscope 13 to 19 may in marathi

  धनू 
  अष्टमातील चंद्र आठवड्याच्या सुरुवातीलाच आर्थिक प्रकरणे कमजाेर बनवू शकताे. परंतु मंगळवारपासून त्यात सुधारणा हाेईल. नशिबाची उत्तम साथ मिळेल. मानसिक ताण कमी हाेर्सल आणि कार्यात अपेक्षित यश मिळेल. आठवड्यात अपेक्षित गाेष्टी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 


  व्यवसाय : पगारात वाढ- बढतीची शक्यता, नवीन जबाबदारी मिळेल. 
  शिक्षण : सर्व कलेत प्राविण्य मिळवून स्पर्धेत श्रेष्ठत्व सिध्द कराल. 
  आरोग्य : गुडघे, नसा दु:खण्याची शक्यता, कंबरदु:खीचीही शक्यता. 
  प्रेम : जाेडीदाराबराेबर आनंदात वेळ व्यतीत हाेऊन तणाव कमी हाेईल. 
  व्रत : श्रीराम दरबाराचे दर्शन घ्या.

Trending