Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

साप्ताहिक राशिफळ : सूर्य आणि शुक्राचा सर्व 12 राशींवर कसा राहील प्रभाव, धनलाभ होणार की नाही

रिलिजन डेस्क | Update - Apr 17, 2019, 12:02 AM IST

14 एप्रिलला सूर्य आणि 15 एप्रिलला शुक्र करत आहे राशी परिवर्तन, या आठवड्यात मेष राशीच्या लोकांचे वाढू शकतात खर्च, कर्क रा

 • saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

  एप्रिल महिन्यातील नवीन आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 14 एप्रिलला सूर्य राशी परिवर्तन करत आहे. हा ग्रह मेष राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 15 एप्रिलला शुक्र राशी परिवर्तन करेल. शुक्र कुंभमधून मीन राशीमध्ये प्रवेश करेल. या व्यतिरिक्त, 14 तारखेच्या रात्री सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी हा आठवडा म्हणजे 14 ते 20 एप्रिलपर्यंतचा काळ कसा राहील...


  मेष
  राशीचे गाेचर व्यय भावात असल्याने खर्चांत वेगाने वाढ हाेण्याची चिन्हे आहेत. तसेच चिंता वाढतील व नवीन मुद्दे साेडवण्यात माेठी ऊर्जा खर्च हाेईल. त्याचप्रमाणे ध्येयावरून लक्ष विचलित हाेऊ शकते व कामांप्रती नावड निर्माण हाेईल. याशिवाय मनात एकाच वेळी अनेक विचारांची गर्दी हाेईल व यशाचा मार्ग शाेधण्यात अनेक अडचणी येतील.


  व्यवसाय : कामाप्रती निरुत्साह राहील व इतरांच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त व्हाल.
  शिक्षण : नवीन सत्रात काहीशी बेचैनी राहील व निर्णयाप्रति शंका वाटेल.
  आरोग्य : उजव्या पायाला जखम हाेण्याची भीती. मुलांनाही त्रास शक्य.
  प्रेम: नैराश्याची स्थिती राहील व घरात अधिकाधिक माैन बाळगावेसे वाटेल.
  व्रत : श्रीरामभक्त हनुमंतासमाेर दिवा लावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींंसाठी कसा राहील हा आठवडा...

 • saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

  वृषभ 
  या आठवड्यात राशीत चंद्राचे तृतीय गाेचर असल्याने धनवृद्धी, सुख-शांती व आनंदाचे वातावरण असेल. तसेच नवीन कामे हाती घ्याल व त्यात यश मिळत राहील; परंतु अहंकारात वाढ हाेणे काहीसे नुकसानकारक ठरू शकते. यासह आठवड्याच्या मध्यात खर्चाचे प्रमाणही वाढू शकते. याशिवाय सजावटीच्या वस्तूंची खरेदी हाेण्याची शक्यता आहे. 


  व्यवसाय : कर्मचाऱ्यांना समस्या येणे शक्य. हाताखालील व्यक्तींना त्रस्तता. 
  शिक्षण : नवीन सत्राबाबत उत्साह राहून यश मिळेल व ज्ञानप्राप्तीची इच्छा हाेईल. 
  आरोग्य : तळहातामागे त्वचेचा त्रास शक्य. तसेच पाेटदुखीही त्रस्त करेल. 
  प्रेम : नवीन सहकारी शाेधावेसे वाटतील. मित्रांशी नाराजीची शक्यता. 
  व्रत : श्री हनुमंताला नारळ अर्पण करा. 

 • saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

  मिथुन 
  राशीच्या गाेचरामुळे स्थायी मालमत्तेत वाढ हाेण्याचे किंवा लाभदायक स्थिती निर्माण करण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच जुन्या कामांचे श्रेय मिळेल व विराेधकांना आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी व्हाल. याशिवाय धार्मिक कारणासाठी प्रवासाचे याेग निर्माण झाले आहेत. त्याचप्रमाणे एखादी शुभवार्ताही प्राप्त हाेईल. 


  व्यवसाय : व्यवसायात फायदा हाेईल.कामाप्रति निष्ठावान राहाल, यश मिळेल. 
  शिक्षण : शैक्षणिक कामासंदर्भात प्रवास शक्य व विषय निवडीत गाेंधळ उडेल. 
  आरोग्य : प्रकृती सामान्य राहील; परंतु वाहनांपासून समस्या निर्माण हाेऊ शकते. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीची भेट व लग्नाच्या प्रस्तावात प्रगती हाेईल. 
  व्रत : श्री हनुमंतासमाेर तुपाचा दिवा लावा. 

 • saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

  कर्क 
  कामांचे काैतुक झाल्याने उत्साह वाढेल. तथापि, नवीन कामांंची जबाबदारी मिळू शकते. ठरवलेले ध्येय वेळेवर गाठण्यास सक्षम राहाल व उपलब्ध साधनांचा याेग्य वापर करण्यात यशस्वी व्हाल. नशीब अनुकूल असल्याने अडथळ्यांपासून सुटका हाेईल. याशिवाय वादांपासून स्वत:ला दूर ठेवण्यात यश मिळेल. 
   

  व्यवसाय : व्यवसायात लाभदायक प्रवास व नाेकरीत पदाेन्नतीची शक्यता. 
  शिक्षण : प्रवेश मिळवण्यात अडथळे शक्य व पुस्तकांबद्दलही द्विधा स्थिती. 
  आरोग्य : डावी दाढ दुखण्यासह त्वचेची समस्या निर्माण हाेऊ शकते. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीसाेबत भ्रमंतीला जाण्याची संधी व भेटवस्तू मिळेल. 
  व्रत : श्री हनुमंताला लाल कापड अर्पण करा.

 • saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

  सिंह 
  बारावा चंद्र व मंगळ-शनीची दृष्टी असल्याने सर्व कामे सहजपणे पूर्ण हाेतील. तसेच समाजात मान-सन्मान मिळेल. त्याचप्रमाणे पैशांची आवक हाेत राहून संबंध लाभदायक सिद्ध हाेतील. याशिवाय बुधवारनंतर शुभवार्ता येतील व प्रतिष्ठित लाेकांच्या भेटी हाेतील. नवीन कपडेदेखील मिळण्याची शक्यता आहे. 


  व्यवसाय: समकक्षांपेक्षा चांगली कामगिरी. श्रेय न मिळाल्याने निराशा. 
  शिक्षण: अपेक्षित कामे न झाल्याने खिन्नता शक्य. अभ्यासावर लक्ष द्या. 
  आरोग्य: आजारांत सुधारणा हाेईल व मुलांच्या प्रकृतीची काळजी संपेल. 
  प्रेम : प्रेमात विरहाचे याेग येऊ शकतात. दांपत्य जीवन मात्र मधुर राहील. 
  व्रत : श्री हनुमानासमाेर संुदरकांडाचे पठण करा. 

 • saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

  कन्या 
  सूर्याची दृष्टी समाप्त हाेईल; परंतु बुधाची दृष्टी कायम राहील. तसेच चंद्राच्या स्थितीमुळे एखादा माेठा लाभ हाेण्याची चिन्हे दिसत आहेत. याशिवाय सकारात्मकता राहील व विविध प्रकारे लाभाच्या संधी मिळत राहतील. रखडलेली कामे गतिमान हाेतील व वेळ अनुकूल राहील. अज्ञात भीती संपेल आणि अनुकूल वार्ता मिळतील. 


  व्यवसाय : व्यवसायात अनेक कामे करणे शक्य. नाेकरीत दबाव राहील. 
  शिक्षण : सहकाऱ्यांसाेबत राहण्यासह चर्चा करण्याची संधी मिळेल. 
  आरोग्य : गळ्यात खवखव-खाेकला, सर्दी-कफाचा त्रास हाेऊ शकताे. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीकडून जास्त अपेक्षा नकाे. विवाह प्रस्ताव मिळतील. 
  व्रत : श्री संकटमाेचन हनुमानाष्टकाचे पठण करा. 

 • saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

  तूळ 
  बुध व गुरू चंद्राच्या त्रासदायक स्थानी असल्याने समस्या वाढतील. तसेच मार्गी लागलेली प्रकरणे पुन्हा अडकतील व अडथळ्यांचे प्रमाणही वाढेल. त्यामुळे संयम बाळगावा लागेल. तथापि, शुक्रवारी दुपारनंतर वेळ अनुकूल हाेऊन शनिवारी धनलाभ होईल. याशिवाय कामे सहजपणे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. 


  व्यवसाय : गुंतवणूक व लाेभ नकाे. नाेकरीत शांततेने काम करत राहा. 
  शिक्षण : सर्वांसाेबत मिळून-मिसळून राहा. कमी बाेलणे फायद्याचे ठरेल. 
  आरोग्य: उजव्या पायाच्या पंजाला जखम शक्य. वाहनाप्रति सावध राहा. 
  प्रेम : प्रेम व्यक्त करण्यासाठी ही वेळ याेग्य नाही. जाेडीदाराचे सहकार्य मिळेल. 
  व्रत : श्री हनुमंतासमाेर दिवा लावा व कापड अर्पण करा.

 • saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

  वृश्चिक 
  वेळ अनुकूल आहे. त्यामुळे या आठवड्यात महत्त्वाची कामे यशस्वी हाेतील व मान-सन्मान मिळेल. तथापि, क्राेधाचे प्रमाण जास्त राहू शकते. तसेच नवीन कामांप्रती नैराश्याचा भाव निर्माण हाेऊ शकताे. गुरुवार व शुक्रवार सर्वात चांगले दिवस ठरतील. शनिवारी मात्र चिंता व वादाची स्थिती निर्माण हाेईल. 


  व्यवसाय : व्यवसायात सांभाळून राहा. नाेकरीत नव्या आॅफरचा विचार नकाे. 
  शिक्षण : नवीन सत्रात उदासीनता राहू शकते. शैक्षणिक कामे हाेणार नाहीत 
  आरोग्य: मूत्रविकार, पाेटदुखीचा त्रास शक्य. खानपानाविषयी सावध राहा. 
  प्रेम : विरहयाेग संपून प्रियकर-प्रेयसीची भेट हाेईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 
  व्रत : श्री हनुमंताला गूळ-पाेळीचा नैवेद्य अर्पण करा. 

 • saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

  धनू 
  राशीचे गाेचर अत्युत्तम याेग निर्माण करत आहे. यासह नशिबाची साथ असल्याने प्रगतीची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे विदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांची इच्छा पूर्ण हाेईल किंवा तेथे राहणाऱ्यांना यश मिळेल. याशिवाय एखादा माेठा आर्थिक लाभ हाेऊ शकताे. आठवड्याच्या अखेरीस आवश्यक वस्तू खरेदी करण्यावर खर्च हाेणे शक्य. 


  व्यवसाय : व्यवसायात लाभ व नोकरीत माेठ्या पगारवाढीची शक्यता. 
  शिक्षण : शिक्षकांचे सहकार्य मिळेल व उच्च शिक्षण घेणारे यशस्वी हाेतील. 
  आरोग्य : डावा पाय दुखण्यासह जखम हाेण्याची शक्यता. डाेकेही दुखू शकते. 
  प्रेम : नातेसंबंध दृढ हाेतील. तसेच तणाव कमी हाेऊन सामंजस्य राहील. 
  व्रत : श्री हनुमंताला लाल फुलासह नैवेद्य अर्पण करा. 

 • saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

  मकर 
  हा काळ यश व सुख-शांततेचा आहे. वेळ सहजपणे जाईल व काेणत्याही प्रकारची क्राेध निर्माण करणारी घटना घडणार नाही. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहून सर्व बाजूंनी अनुकूल स्थिती असल्याचा अनुभव येईल. आर्थिक आधार मजबूत राहील व प्रत्येक वस्तू सहजपणे मिळेल. 


  व्यवसाय : व्यवसायात नेहमीपेक्षा जास्त लाभ व नोकरीत यश मिळेल. 
  शिक्षण : सहकाऱ्यांपेक्षा उत्तम कामगिरी व अभ्यासात पुढे राहाल. 
  आरोग्य: प्रकृतीत सुधारणा हाेईल व संबंधित समस्यांपासून दूर राहाल. 
  प्रेम : प्रेमात सर्व प्रकारचे सुख मिळेल व मुलांच्या संबंधात सुधारणा हाेईल. 
  व्रत : श्री हनुमंताला अष्टगंध व पान अर्पण करा. 

 • saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

  कुंभ 
  मित्र शुक्राच्या प्रभावामुळे राशीत सर्वाेत्तम स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, सर्व बाजूंनी यश व मदत मिळेल. मात्र, कामांचे प्रमाण वाढेल; परंतु त्यासाेबत प्रभावही वाढेल. आनंदाची स्थिती राहील व आर्थिक बाबतीत चांगल्या स्थितीत राहाल. आप्तस्वकीयांत समन्वय राहून कायदेविषयक प्रकरणांत यश. 


  व्यवसाय : व्यवसायात गुंतवणुकीने फायदा व नोकरीत पदाेन्नतीची शक्यता. 
  शिक्षण : वरिष्ठांकडून सन्मान मिळेल व बाैद्धिक पातळी सर्वाेच्च राहील. 
  आरोग्य : रक्तदाबाचा त्रास, अनिद्रा व त्वचेची जळजळ हाेऊ शकते. 
  प्रेम : प्रेमात माधुर्य वाढेल व जाेडीदाराच्या चिंतेमुळे सतर्क राहाल. 
  व्रत : श्री हनुमंताला बेसन पिठाचे लाडू अर्पण करा.

 • saptahik rashifal weekly horoscope 14 to 20 april in Marathi

  मीन 
  राशीचे गाेचर अकराव्या स्थानी असल्याने पैशांची आवक वाढण्याची चिन्हे आहेत. तसेच लाभदायक कामे मिळण्याची शक्यता. चंद्राची दृष्टी हा याेग अधिक मजबूत करतेेय. धार्मिक कामांप्रति आवड वाढेल आणि जमिनीपासून लाभ शक्य. प्रभाव वाढेल व शुभवार्ता येतील. 


  व्यवसाय : व्यवसाय उत्तम. नाेकरीत स्थलांतर शक्य, नवी जबाबदारी मिळेल. 
  शिक्षण : चर्चासत्रात सहभाग घ्यावा लागू शकताे. अनुदान सहज मिळेल. 
  आरोग्य: अज्ञात कारणामुळे चिंता वाटू शकते. रक्तदाब व पाेटाचा त्रास हाेईल. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीप्रति जास्त आकर्षण व कुटुंबात अनुकूल स्थिती. 
  व्रत : श्री हनुमंताला रुईच्या पानांचा हार अर्पण करा. 

Trending