Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

सर्व 12 राशींसाठी कसा राहील 20 जानेवारीपर्यंतचा काळ, काय करावे आणि काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Jan 15, 2019, 12:01 AM IST

साप्ताहिक राशिभविष्य : 14 ते 20 जानेवारीपर्यंत कोणत्या लोकांना मिळू शकते भाग्याची साथ आणि कोणी राहावे सावध

 • saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

  नवीन आठवडा सोमवार 14 जानेवारीपासून सुरु झाला आहे. या आठवड्यात म्हणजे 20 जानेवारीपर्यंत गुरु-शुक्राच्या युतीचा प्रभाव राहील. गुरुवार मंगळाची दृष्टी आहे, बुध-शनी गुरूच्या राशीमध्ये स्थित आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 14 जानेवारीला संध्याकाळी सूर्य धनु राशी बदलून मकर राशीमध्ये प्रवेश करेल. यामुळे मकरसंक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाईल. येथे जाणून घ्या, ग्रहांच्या या योगामुळे हा आठवडा 12 राशींसाठी कसा राहील...


  मेष
  आज व उद्या थाेडा फार त्रास होईल. तथापि, मंगळवारी संध्याकाळपासून वेळ सर्व प्रकारे अनुकूल राहील. नशिबाची साथ असल्याने सर्व कामे समाधानकारकरीत्या पूर्ण हाेतील. प्रतिष्ठित लोकांच्या भेटी हाेतील व सहकार्यही मिळेल. जमिनीशी संंबंधित वादांवर उपाय सापडेल व अाईचे प्रेम प्राप्त होईल.


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात गती राहील व नाेकरीत प्रवासाचा योग.
  शिक्षण : तयारी चांगल्या प्रकारे हाेत राहील व चांगले परिणाम दिसतील.
  अाराेग्य : मूत्रविकार, सूज व नसांचा त्रास हाेऊ शकताे.
  प्रेम : प्रेमाचा प्रस्ताव स्वीकार होईल व जाेडीदाराकडून सुख मिळेल.
  व्रत : श्री हनुमंतासमाेर तेलाचा दिवा लावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

 • saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

  वृषभ 
  अकराव्या चंद्राचे गोचर पैशांची आवक चांगली ठेवेल; परंतु कामांचे प्रमाण जास्त राहील. तथापि, सर्व कामे वेळेवर होतील. मंगळ व बुधवारी मात्र समस्या येऊ शकतात. त्यामुळे वाहन चालवताना सावध राहा. तसेच वादही होऊ शकताे. गुरुवारपासून वेळ अनुकूल. मन अानंदी राहील. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय सामान्य व नाेकरीत तणाव संपेल. 
  शिक्षण : अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित कराल व यशही मिळेल. 
  अाराेग्य : कंबर व पाठदुखीसह हाताच्या मनगटात त्रास होईल. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीची साथ मिळेल व वैवाहिक जीवनात तणाव येईल. 
  व्रत : श्री दुर्गामातेला लाल फुले अर्पण करा. 

 • saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

  मिथुन 
  दिलासादायक काळ अाहे. त्यामुळे पैशांची चांगली अावक हाेईल व कामेही यशस्वी हाेतील; परंतु अज्ञात-भीती सतावेल. नवीन लाभदायक संबंध निर्माण हाेतील. बुधवारी प्रवासाचा योग. गुरुवारी व शुक्रवारी समस्या येतील. तसेच वाद व फसवणूकही होऊ शकताे.शुक्रवारी दिलासा. शनिवार चांगला. 

  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात सुधारणा दिसेल व नाेकरीत मन लागेल. 
  शिक्षण : अभ्यासात मन लागेल व वर्गातही सन्मान हाेईल. 
  अाराेग्य : केस गळणे व त्वचेशी संबंधित त्रास हाेऊ शकताे. 
  प्रेम : प्रेम प्रस्ताव अमान्य होईल व वैवाहिक संबंध मधुर राहतील. 
  व्रत : श्रीगणेशाला मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवा. 

 • saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

  कर्क 
  चंद्राची स्थिती पैशांची आवक चांगली ठेवेल; परंतु खर्चदेखील जास्त राहील. काम चांगल्या प्रकारे करूनही बाेलणी एेकावी लागू शकतात. तसेच कष्टाचे पूर्ण फळही मिळणार नाही. कामात अडथळे अाणणारे सक्रिय राहतील. जीवनात अपेक्षित मिळत नसल्यासारखे वाटेल. शनिवारी सांभाळून राहा. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात अपेक्षित फळ नाही. नाेकरीत अडथळे. 
  शिक्षण : शिक्षकांकडून अपेक्षित मदत नाही. अभ्यासात मन लागणार नाही. 
  अाराेग्य : त्वचा, केसगळती, ताप व सर्दीचा त्रास हाेऊ शकताे. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी वाद होईल व जाेडीदाराकडून सुख मिळेल. 
  व्रत : भगवान शंकराचा जलाभिषेक करा. 

 • saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

  सिंह 
  क्रोध व ढाेंगीपणाची स्थिती राहील. अाठव्या चंद्रामुळे पैशांची आवक कमी राहून कामेही विलंबाने हाेतील. कामेही िबघडू शकतात व वाईट स्वप्ने पडतील. मंगळवारपासून वेळेत सुधारणा. अानंद व सहकार्य मिळेल. कुटुंबातील वाद संपेल व नवीन कामांची शक्यता. शनिवार चांगला. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात जास्त त्रास व नाेकरीत कष्ट वाढतील. 
  शिक्षण : अधिक परिश्रम करावे लागतील. मागे पडण्याची भीती राहील. 
  अाराेग्य : अणुकुचीदार वस्तूमुळे जखम हाेऊ शकते. नसा अाखडतील. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीचे सहकार्य व जाेडीदाराकडून हिंमत मिळेल. 
  व्रत : सकाळी सूर्यदेवाला अर्ध्य द्या. 

 • saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

  कन्या 
  राशीवर चंद्राची दृष्टी असल्याने विचलितवृत्ती संपेल. पुढे जाण्यासाठी नवे मार्ग मिळतील व कार्यशैलीत सुधारणा होईल. मंगळ व बुधवारी वादग्रस्त प्रकरणे सुटतील व गुरुवारी नवे लाभदायक संबंध बनतील. योजना यशस्वी हाेतील व कामे करण्याकडे कल राहून त्यासाठी मदतही मिळेल. 


  नाेकरी व व्यवसाय : नाेकरीत लक्ष्यप्राप्ति व व्यवसावात तेजी येईल. 
  शिक्षण : अभ्यासाकडे कल राहील व संशाेधन करावेसे वाटेल. 
  अाराेग्य : पायाच्या पंजाला जखम हाेऊ शकते. तसेच मागील भाग दुखेल. 
  प्रेम : जाेडीदाराचे सहकार्य मिळेल व प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला जाईल. 
  व्रत : भगवान शंकराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा. 

 • saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

  तूळ 
  पराक्रम वाढून प्रतिष्ठेत सुधारणा होईल व पैशांची आवकही चांगली राहील. कार्यविस्तार होऊन विदेशात जाणाऱ्यांना यश मिळेल. कार्यस्थळी सन्मान व माेठे पद प्राप्त होऊ शकते. भावांकडून मदत मिळेल. नवीन जागी जाल. गुरु व शुक्रवारी सावध राहा. चोरीची घटना घडण्याची शक्यता अाहे. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय उत्तम व नाेकरीत जबाबदारी वाढेल. 
  शिक्षण : अभ्यासात मन लागेल व मदत मिळेल. साधने उपलब्ध होतील. 
  अाराेग्य : पाय, छाती व डाेळ्यांचा त्रास जाणवू शकताे. 
  प्रेम : प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला जाईल व वैवाहिक प्रस्ताव येतील. 
  व्रत : श्री दुर्गामातेला तुपाचे नारळ अर्पण करा. 

 • saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

  वृश्चिक 
  पाचवा चंद्र असल्याने पैशांची अावक चांगली राहील. व्यर्थच्या अडचणी संपून अाईचे प्रेम प्राप्त होईल; परंतु कामांचे प्रमाणही जास्त राहील. स्थायी मालमत्तेतून लाभ. नव्या कामांचेे प्रस्ताव मिळतील. दुरुस्तीच्या कामावर खर्च हाेण्याचीही शक्यता. चांगल्या जागी जाण्याची संधी मिळून अखेर सुखद होईल. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात सुधारणा. नाेकरीतील समस्या संपतील. 
  शिक्षण : अभ्यासात मन लागेल व इतरांकडून सहकार्यही मिळेल. 
  अाराेग्य : दात व कंबरदुखीचा त्रास हाेऊ शकताे व कीटक चावू शकताे. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी समझाेता हाेईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. 
  व्रत : भगवान शंकराला कच्चे दूध अर्पण करा. 

 • saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

  धनू 
  चाैथा चंद्र असल्याने मुलांशी वाद होऊ शकताे व पैशांची आवकही कमी राहील. एखादा आरोपही लागू शकताे. मंगळवार संध्याकाळपासून कामांत सुधारणा हाेईल. अावक अाणि प्रतिष्ठाही वाढेल. गुप्त बाबी सार्वजनिक हाेऊ शकतात. कुणाची टर उडवू नका. अाठवड्याचा अखेर थोडासा दिलासादायक. 


  नाेकरी व व्यवसाय: व्यवसायात मंद स्थिती व नाेकरीत नुकसानीची शक्यता. 
  शिक्षण : अभ्यासात मन लागणार नाही. व्यर्थ बाबींत वेळ वाया जाईल. 
  अाराेग्य : ताेंड येणे, कानदुखी व पाेटदुखीचा त्रास हाेऊ शकताे. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी वाद शक्य. वैवाहिक जीवनात अंहकाराने नुकसान. 
  व्रत : श्री दुर्गा चालिसाचे पठण करा.

 • saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

  मकर 
  तिसऱ्या चंद्रामुळे किरकाेळ सुधारणा हाेईल. चिंता जास्त राहून अनावश्यक भीती सतावेल. पैशांची आवकही कमी. नवे काम करण्याची हिंमत हाेणार नाही. मित्रांकडून असहकार्य व अकारण बोलणे बंद होऊ शकते. कर्जाशी संबंधित समस्यांची शक्यता. मंगळ व बुधवारी समस्यांचे प्रमाण जास्त. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय जेमतेम व नाेकरीत मन लागणार नाही. 
  शिक्षण : अभ्यासाासाठी वेळ काढू शकाल; परंतु मन लागणार नाही. 
  अाराेग्य : डाेकेदुखीसह पाेट, कंबर व दातदुखीचा त्रास होऊ शकताे. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीकडून उदासीनता. वैवाहिक जाेडीदाराकडून हिंमत मिळेल. 
  व्रत : श्री हनुमंतासमाेर तुपाचा दिवा लावा. 

 • saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

  कुंभ 
  दुसऱ्या चंद्राच्या दृष्टीमुळे आत्मविश्वास वाढेल व चांगली वार्ता कळेल. तसेच पैशांची आवक चांगली राहील. लवचीक व्यवहारातून नुकसान शक्य. लहान प्रवासाचा योग. गुरु व शुक्रवारी सावधगिरी बाळगावी लागेल. याशिवाय शनिवारी पैशांचा अभाव जाणवू शकताे. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात संबंधात वाढ. नाेकरीत स्थिती मजबूत. 
  शिक्षण : अभ्यास व्यवस्थित चालेल व मित्रांकडून मदत मिळेल. 
  अाराेग्य : सर्दी-खाेकला व तापाचा त्रास. पायाच्या मागील भागास जखम. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी मधुर व्यवहार व जाेडीदार अनुकूल राहील. 
  व्रत : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा. 

 • saptahik rashifal Weekly horoscope 14 To 20 January 2019 in Marathi

  मीन 
  मंगळासाेबत चंद्राचे गोचर धनयोग तयार करत अाहे. त्यामुळे सुखद कामे पूर्ण हाेऊन येणाऱ्या अडचणी संपतील व धनलाभही होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल व स्थायी मालमत्तेत वाढ करण्याचा विचार येईल. शनिवारी क्रोधाचे प्रमाण वाढू शकते. चेहऱ्यावर लाली राहील. आर्थिक नुकसानही होऊ शकताे. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात वाढ व नाेकरीत सुधारणा होईल. 
  शिक्षण : संशाेधन करण्याची व अभ्यासात जास्त गुण मिळवावेसे वाटेल. 
  अाराेग्य : कान, डाेके व पायदुखीचा त्रास जाणवेल. रक्तदाबही वाढू शकताे. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीचे सहकार्य व वैवाहिक जीवन सुखमय राहील. 
  व्रत : श्री महाकाली मातेला गाेड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. 

Trending