आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशिभविष्य : जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील विजयादशमीचा आठवडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

15 ते 21 ऑक्टोबरचा हा आठवडा बहुतांश राशीच्या लोकांसाठी चांगला ठरू शकतो. गुरू मित्र मंगळाच्या राशीत व मंगळ उच्च असल्याने काही राशीच्या लोकांना व्यापार-व्यवसायांत प्रगती होईल. सोन्या-चांदीचे भाव वाढू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. या आठवड्यात गुरुवार 18 ऑक्टोबरला विजयादशमी (दसरा) आहे. या शुभ योगाचाही अनेकांना फायदा होऊ शकतो. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा.


मेष 
राशी स्वामी मंगळाच्या दृष्टीमुळे प्रारंभी खर्च व तणावासह समस्याही जास्त असतील. मात्र, मंगळवारी संध्याकाळपासून वेळेत सुधारणा हाेईल. तसेच उत्पन्न वाढेल व सहकार्याची प्राप्ती होईल. गुरुवारी कामांचे प्रमाण अधिक असेल. शुक्रवारी व शनिवारी अचानक धनप्राप्तीचा योग अाहे. याशिवाय जमिनीपासून लाभ व कायद्याच्या प्रकरणांत यश मिळेल. 


नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय बरा व नाेकरीत नव्या जागी जावे लागू शकते. 
शिक्षण : विनाकारण त्रास हाेईल. तसेच शिक्षकवर्ग नाराज होऊ शकताे. 
अाराेग्य: अॅलर्जी, उष्णता, गळादुखी व सर्दीचा त्रास हाेऊ शकताे. 
प्रेम : वैवाहिक प्रस्ताव येतील. तसेच जाेडीदाराकडून सहकार्य मिळेल. 
व्रत : श्री दुर्गामातेसमाेर तुपाचा दिवा लावा. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसा राहील हा आठवडा....

बातम्या आणखी आहेत...