Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

सर्व 12 राशींसाठी कसा राहील 21 ते 27 एप्रिलपर्यंतचा काळ, कोणाला मिळणार भाग्याची साथ

रिलिजन डेस्क | Update - Apr 23, 2019, 08:07 AM IST

साप्ताहिक राशीफळ : या आठवड्यात 22 एप्रिलला गुरु करणार राशी परिवर्तन, चंद्र 3 वेळेस बदलणार राशी, मेष राशीच्या लोकांच्या प

 • Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

  या आठवड्याच्या सुरुवातील सूर्य मेष राशीमध्ये राहील. चंद्र तुळमध्ये आहे आणि 21 तारखेला दुपारी वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 23 तारखेला धनु आणि 25 तारखेला मकर राशीमध्ये प्रवेश करेल. या व्यतिरिक्त गुरु 22 एप्रिलला वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी कसा राहील हा आठवडा.


  मेष
  सूर्य उच्चीचा होऊन मेष राशीत प्रवेश केला आहे. यामुळे तुमचा प्रभाव वाढेल, आशा-आकांशा पूर्णत्वास नेईल. संतापात वाढ होण्यासोबत कामात जास्त जणाव राहील. चंद्र सप्तम स्थानी असल्यामुळे उत्पन्नाच्या स्रोतात घट येणार नाही. या आठवड्यात नवीन वाहन किंवा भौतिक सुविधांच्या वस्तू खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते.


  व्यवसाय : व्यवसाय विस्ताराची शक्यता आहे. संपर्काचा फायदा.
  शिक्षण : समस्यांचे मूळ कळेल. अभ्यासाची आवड वाढेल.
  आरोग्य : डाव्या डोळ्यात समस्या. सकाळी डोकेदुखी राहू शकते.
  प्रेम : वैराग्य भाव राहील. कुटुंबाप्रती जास्त भावूक असाल.
  व्रत : आदित्यहृदयस्तोत्राचे पठण करा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

 • Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

  वृषभ 
  सहावा चंद्र पैशाच्या कमतरतेसोबत विरोधकाच्या शक्तीची जाणीव करून देऊ शकतो. मात्र, बुधवारनंतर स्थिती सुधारेल. अनेक कामे एकाचवेळी करावे लागू शकतात. उधारीत दिलेला पैसा अडकू शकतो. सूर्य द्वादश स्थानी असल्याने विरोधक बळकट होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात वादांपासून दूर राहा, तसेच धैय राखा. 


  व्यवसाय : नाेकरी बदलाचा विचार सोडून द्या. व्यवसायात स्थिर राहा. 
  शिक्षण : अभ्यासात लक्ष विचलित होईल. ज्येष्ठांप्रती सन्मान कायम ठेवा. 
  आरोग्य : पडसे- डोळ्यांत समस्या होऊ शकतात. त्वचेची अॅलर्जी शक्य. 
  प्रेम : जोडीदाराकडून जास्त अपेक्षा केल्याने तणाव. प्रेमात निराशा. 
  व्रत : महादेवाला कच्चे दूध अर्पण करा. 

 • Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

  मिथुन 
  आठवड्यात गुरू, शनी, केतूच्या पूर्ण दृष्टीमुळे सिंहल योग निर्मित झाला आहे. आनंद तसेच उदारता राहण्याची शक्यता आहे . यश मिळेल व प्रतिष्ठित व्यक्तींची भेट होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात पैशाची चणचण भासू शकते. आठवडा पुन्हा सुरळीत सुरू राहील. कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. 


  व्यवसाय : व्यवसायात वेळ सामान्य राहील, खालच्या लोकांकडून त्रास. 
  शिक्षण : संशोधन विषयांसोबत नवे प्रयोगाकडे आकर्षित व्हाल. 
  आरोग्य : वाहनाचा वापर काळजीपूर्वक करा. नदी, विहिरींबाबत काळजी घ्या. 
  प्रेम : जोडीदाराची गरज राहील, दांपत्यासोबत चांगला वेळ घालवाल. 
  व्रत : शिव-पार्वतीचे पूजन करा.

 • Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

  कर्क 
  राशीचा स्वामी चंद्र तृतीयात आहे. पाठिंबा मिळेल, विरोधक पराभूत होतील. विचारांना मान्यता मिळेल. पैशाची कमतरता दूर होईल व वैचारिक विकासासोबत कूटनीतीत यश मिळेल. मंगळवार आणि बुधवारी त्रासानंतर धार्मिक यात्रेचा योग आहे. या आठवड्यात काैटुंबिक मित्रांसोबत राहण्याची संधी मिळेल. 


  व्यवसाय : नोकरीत बदलाची शक्यता.व्यवयास विस्तार. गुंतवणूकदार मिळेल. 
  शिक्षण : शिक्षक तसेच ज्येष्ठांसोबत ताळमेळ बसवण्यात यश मिळेल. 
  आरोग्य : छाती जळजळ, पोटदुखी, पाय-गुडघे दुखी होऊ शकते. 
  प्रेम : प्रेम प्रस्तावाला संमती मिळू शकते. विवाह प्रस्तावही मिळेल. 
  व्रत : काली मातेचे पूजन करा. 

 • Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

  सिंह 
  या आठवड्यात राशी स्वामी सूर्य उच्च आणि मित्र मंगळाची दृष्टी असल्याने योग्य लाभ प्राप्त होतील. तसेच नव्या जबाबदारी प्राप्त हाेणार आहेत. मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात महत्त्व प्राप्त होईल. या आठवड्यात आनंदाच्या बातम्यांचे प्रमाण जास्त राहील. भौतिक सुख-सुविधा प्राप्त होतील. आनंद राहील. 
   

  व्यवसाय : व्यापार, अकाउंटसंबंधी समस्या येऊ शकतात. 
  शिक्षण : प्रायोगिक शिक्षणाकडे कल, रहस्य विद्यांत आवड राहील. 
  आरोग्य : टाचदुखी. झोप जास्त येऊ शकते. आळस राहील. 
  प्रेम : संतती सुख मिळेल. नव्या जोडीदाराचा शोध पूर्ण होईल. 
  व्रत : ॐ नम: शिवाय मंत्राचा जप करा.

 • Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

  कन्या 
  राशी स्वामी बुध व शुक्राची दृष्टी राहील. चंद्र द्वितीय राहील. कामांत यश, मित्रांकडून सहकार्य मिळेल. उत्पन्नात सुधारणा होईल. कायदेविषयक प्रकरणता यश मिळेल. गुरुवार-शुक्रवार त्रास देणारे दिवस ठरू शकतात. आठवड्यात जुन्या आठवणी व खर्च जास्त राहील. शनिवार चांगला असेल. 


  व्यवसाय : गुंतवणूक टाळा, लालूच देणाऱ्या योजनांपासून दूर राहा. 
  शिक्षण : अभ्यासासाठी अतिरिक्त कष्ट घ्यावे लागतील, सहकार्य घ्यावे लागेल. 
  आरोग्य : तणाव, हात-पायात थरथर, रक्तदाब वाढू शकतो. 
  प्रेम :जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आईचे प्रेम मिळेल. 
  व्रत : हनुमानासमोर संकट मोचनचा पाठ करा. 

 • Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

  तूळ 
  तूळ- चंद्राच्या गाेचरीने राशी स्थिती काही भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मदत न मिळाल्याने अडचणी कमी हाेणार नाहीत. पूर्वीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठीचे प्रयत्न लाभदायक न ठरण्याची शक्यता. विस्तार टाळा. वादांपासून दूर रहा. उत्पन्न चांगले मिळेल. 


  व्यवसाय : व्यवसायात अस्थिरता राहील. नवीन याेजना टाळा. नाेकरीत ताण राहिल. 
  शिक्षण : तांत्रिक विद्यार्थ्यांसाठी सामान्य काळ, बाकींना संंघर्ष करावा लागेल. 
  आरोग्य : दात- कंबरदुखीची शक्यता, उच्च रक्तदाब हाेऊ शकताे. 
  प्रेम : सहकाऱ्याचे एखादे कार्य त्रासदायक ठरू शकते. दाम्पत्य जीवनात सहकायर्य 
  व्रत : दुर्गामातेला प्रसाद अर्पण करा 

 • Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

  वृश्चिक 
  द्वादश चंद्रपासून आरंभ हाेईल. सुरुवातीच्या त्रासानंतर मंगळवारपासून वेळेत सुधारणा हाेईल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल आणि धनाची आवक सुकर हाेईल. गुरुवारी चांगली बातमी मिळेल. बदल करण्याचा प्रयत्न उपयाेगी ठरणार नाही. नव्या लाभदायक याेजनांची प्राप्ती हाेईल 


  व्यवसाय : व्यापारात नव्या संधी मिळतील. नाेकरीत स्थलांतर शक्य. 
  शिक्षण : शिक्षकांची प्रशंसा हाेईल. अभ्यासाबद्दल सजग राहाल. 
  आरोग्य : पाेटाच्या तक्रारी उद‌्भवू शकतात. मूत्रमार्गात जळजळ हाेईल. 
  प्रेम : सहकाऱ्याबराेबर फिरायला जाल. वैवाहिक जीवनात थाेडी कुरबूर हाेईल. 
  व्रत : शिवलिंगावर अष्टगंध अर्पण करा 

 • Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

  धनू 
  धनू- गुरू, शनी आणि केतूचे गाेचर आणि राहूच्या दृष्टीमुळे राशीच्या आत्मविश्वासाला मजबुती मिळेल. सफलतेचे पर्व सुरू हाेईल, नव्या संधी उपलब्ध हाेतील. पुरस्कार मिळेल आणि सन्मानात वाढ हाेईल. आर्थिक स्थिती सामान्यपासून चांगली हाेईल आणि सर्व अडचणी संपतील. 


  व्यवसाय : गुंतवणूक लाभदायक, उत्कर्ष हाेईल. नाेकरीत लाभ,नवीन पद मिळण्याची शक्यता. 
  शिक्षण : लक्ष्य साध्य करण्यात यशस्वी व्हाल. चांगले परिणाम दिसतील. 
  आरोग्य : अर्धशिशी, नाकातून रक्तस्त्राव, ताेंडात छाले. 
  प्रेम : विवाहेच्छुकांना लग्नाचा प्रस्ताव मिळू शकेल. प्रेमात स्थिती नाजूक हाेईल. 
  व्रत : गणपतीला रक्त पुष्प अर्पण करा 

 • Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

  मकर 
  गुरुवार, शुक्रवारी द्वादश चंद्र उत्पन्न प्रकरणात कपात करू शकताे. परंतु नशीब भक्कम असल्याने समस्या सुटतील. नातेवाइकांबराेबर वैचारिक मतभेद शक्य. न्यायालयीन प्रकरणात थाेडासा त्रास हाेऊ शकताे. अधिकाऱ्यांबराेबर तणाव निर्माण हाेण्याची शक्यता. 


  व्यवसाय : व्यावसायिक यात्रा निराशा देइल. नाेकरीत अडचण, प्रतिष्ठेला तडा जाईल. 
  शिक्षण : अडचणींवर मात करून यश मिळेल. परिणाम तुमच्या बाजुने . 
  आरोग्य : रक्तदाब, मानदुखी, जुना विकार उद‌्भवू शकताे. जखमेची भिती 
  प्रेम : सगळ्यांचा अनादर करू नका. अपेक्षांवर नियंत्रण ठेवा 
  व्रत : सूर्याला अर्घ्य द्या 

 • Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

  कुंभ 
  नवमातील चंद्र सप्ताहाच्या अखेरीस सर्व वेळेसाठी अनुकूलता प्रदान करेल. आर्थिक स्थिती चांगली हाेईल. घरात मंगल कार्य हाेऊ शकेल. मुलांच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. कामाचा भार वाढण्याची शक्यता. 


  व्यवसाय : नाेकरीत जबाबदारी वाढेल. व्यापारात यश मिळेल. 
  शिक्षण : स्पर्धा परीक्षेत यश मिळेल, नव्या तयारीसाठी मेहनत घ्या. 
  आरोग्य :हात आणि कमरेला दुखापत हाेण्याची भीती, खांदे दुखी हाेऊ शकते. 
  प्रेम : आकर्षण कायम राहील पण स्वत:ला संभाळावे लागेल.
  व्रत : दुर्गा देवीला लाल फूल अर्पण करा 

 • Weekly horoscope 21 to 27 april 2019 in Marathi

  मीन 
  नीचेतील बुध, उच्चीमधील शुक्र राशीमध्ये आला असून ताे आत्मविश्वास कमी करेल, अज्ञात भीती निर्माण करेल. घाईघाईतील निर्णय नुकसान देऊ शकताे. नकाेशा वादात नाव आल्याने विचलित हाेऊ शकता. उत्पन्नाचे स्राेत चिंताजनक परिणाम देऊ शकतात. 


  व्यवसाय : व्यापारात लक्ष्यपूर्तीसाठी प्रयत्न करा, नाेकरीत अस्थिरता. 
  शिक्षण : अभ्यासाबद्दल अरुची, अन्य विषयांबद्दल आकर्षण राहील. 
  आरोग्य : गुडघेदुखी आणि नाकावर जखम किंवा फाेड हाेण्याची भिती 
  प्रेम : सहकाऱ्याबराेबर विरह याेगाची शक्यता, विवाहितांना सुखप्राप्ती मिळेल. 
  व्रत : शंकराला दुधाचा अभिषेक करा 

Trending