Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

सर्व 12 राशींसाठी कसा राहील 28 एप्रिल ते 4 मे पर्यंतचा काळ

रिलिजन डेस्क | Update - Apr 30, 2019, 12:15 AM IST

साप्ताहिक राशिफळ : मेष राशीच्या लोकंना वाहनामुळे होऊ शकतो त्रास, कर्क राशीच्या लोकांच्या चिंता होऊ शकतात नष्ट, कुंभ राशीच्या लोकांनी राहावे शांत अन्यथा होऊ शकते नुकसान 

 • weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

  आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र मकर राशीमध्ये राहील. रविवार 28 एप्रिलआ संध्याकाळी चंद्र कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या आठवड्यात उच्चच्या सूर्याच्या प्रभावामुळे प्रचंड उष्णता कायम राहील. उच्चचा शुक्र असल्यामुळे वेगवान वारे लोकांचे संरक्षण करेल. दक्षिणेत मोठ्या राजकीय हालचाली होतील. व्यापार चांगला राहील. चांदी, केसर, तांदूळ, साखर, तेलाच्या दरात वाढ होऊ शकते. ग्रह-स्थितीनुसार जाणून घ्या, 12 राशींसाठी कसा राहील 28 एप्रिल ते 4 मे पर्यंतचा हा काळ.


  मेष
  या आठवड्यात उच्चचा सूर्य गोचर व दशमाचा चंद्र असल्यामुळे अनावश्यक गर्व उत्पन्न होऊ शकतो. वाणीत कटुता येऊ शकते. दुसऱ्यांना महत्त्व द्या, सर्वांना सोबत घेऊन चाला. संबंधितांची मदत करावी लागू शकते. वाहन समस्या निर्माण करू शकते. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. या आठवड्यात प्रवास सुखकर होईल.

  व्यवसाय : व्यवसायानिमित्त प्रवास लाभदायक, नोंकरीत पदोन्नती शक्य.
  शिक्षण : कष्टावर भर द्या. स्पर्धकांचे निकाल त्रास देणारे ठरतील.
  आरोग्य : रक्तदाबासंबंधी समस्या शक्य. शरीरास थोडी विश्रांती हवी.
  प्रेम : अनपेक्षित प्रस्ताव त्रास देऊ शकतात. गांभिर्यातून सुखद परिणाम.
  व्रत : हनुमानासमोर दीवा लावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

 • weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

  वृषभ 
  मंगळाचा गोचर व नवव्या चंद्रामुळे सध्याची वेळ चांगली आहे. उत्तम समन्वय राहील, तसेच नशिबाची साथ मिळेल. अनेक कामे एकाचवेळी करण्यात सक्षम राहाल. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी प्रकरणांत तुमची बाजू बळकट असेल. प्रयत्नाअंती नाराज लोकांची नाराजी समाप्त होईल. या आठवड्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. 


  व्यवसाय : बेरोजगारी संबंधी समस्या संपतील. व्यापारात नवे सौदे मिळतील. 
  शिक्षण : अापले क्षेत्र सोडू नका. प्रवेशासंबंधी समस्येतून मार्ग निघेल. 
  आरोग्य : टाच व सांधेदुखी तसेच त्वचेसंबंधी समस्या होऊ शकते. 
  प्रेम : जोडीदाराची साथ, संततीसुख मिळेल. प्रेमात विरह योग आहे. 
  व्रत : महादेवाला सुगंधी फुल अर्पण करा. 

 • weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

  सिंह 
  या आठवड्यात सर्वांवर विश्वास ठेवू नका. निकटवर्तींयांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. विरोधक संभ्रम निर्माण करू शकतात. योग्य मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ, अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. आठवड्यात पैसा व मान मरातब प्राप्त होईल. मन प्रसन्न राहील. 
   

  व्यवसाय : व्यापारात घट येऊ शकते व नोकरीत तणाव जास्त राहील. 
  शिक्षण : गणित, विज्ञान, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांचा निकाल चांगला. 
  आरोग्य : आळस व झोपेसंबंधी समस्या होऊ शकते. शरीर जड पडेल. 
  प्रेम : जोडीदारासोबत तणाव शक्य. योग्य प्रकारे शंकांचे निरसण करा. 
  व्रत : गरीब व्यक्तीला अन्नदान करा.

 • weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

  मीन 
  उच्चातील शुक्राचे राशीत गोचर आहे. काळ तुमच्या बाजूने आहे. कोणतेही काम करण्यास सक्षम असाल, जे काही कराल त्यात फायदा होईल. धार्मिक कामांत सहभागी व्हाल. त्यात सन्मान मिळेल. योजनांची अंमलबजावणी यशस्वी होईल. सहकारी-मित्रांशी मतभेद शक्य. 


  व्यवसाय : अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक गुंतवणूक फायदेशारी ठरेल. 
  शिक्षण : विद्यार्थ्यांची कामगिरी आठवड्यात चांगली राहील. 
  आरोग्य : रागामुळे पित्ताची वाढ, पोटात वेदनेची समस्या शक्य. 
  प्रेम : वैवाहिक जीवनात निराशा जाणवेल. जोडीदाराशी तणाव शक्य. 
  व्रत : श्री लक्ष्मी-नारायणाचे दर्शन घ्या. 

 • weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

  कुंभ 
  संपत्तीशी संबंधित वादांचे निराकरण तुमच्या बाजूने होण्याची शक्यत आहे. अनपेक्षित पाहुणे आल्याने त्रास होऊ शकतो. अपमानही होऊ शकतो. शांत राहा. विरोधकांवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळेल. आठवडाअखेर विजय तुमचाच . 


  व्यवसाय:  योजना बदलाव्या लागू शकतात. त्यामुळे तुमचे सर्व पर्याय खुले ठेवा. 
  शिक्षण:  विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. 
  आरोग्य: जुन्या रोगांपासून सुटका होईल. आनंद वाटेल. 
  प्रेम :  वैवाहिक संबंधांत सुधारणा, पण प्रेम संबंधांत गैरसमजांची शक्यता. 
  व्रत : भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घ्या.

 • weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

  वृश्चिक 
  तुम्हाला भाग्याची साथ कायम राहील. आठवड्याच्या मध्यात वाहन चालवताना सावधानता बाळगा. एखादे विशेष काम झाल्यामुळे आनंदी राहाल. तुमच्या प्रियजनांशी भेटी होतील. धार्मिक आयोजनात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. धनाची आवक सुरूच राहील. 


  व्यवसाय : कनिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. या आठवड्यात कामाचे प्रमाण जास्त राहील. 
  शिक्षण : अनुकूल निकालासह शैक्षणिक प्रवासाचा योग आहे. 
  आरोग्य : आरोग्य उत्तम राहील. चिंता-शंका मिटतील. स्फूर्ती राहील. 
  प्रेम : प्रेम प्रकरणातील अडचणी दूर होतील. जीवनसाथीकडून सहकार्य. 
  व्रत : दहा वेळा गायत्री मंत्राचा जप करा. 

 • weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

  मिथुन 
  या आठवड्यात आश्चर्यकारक यश, शुभ संदेश प्राप्त करणारा आठवडा राहील. पात्रतेला ओळख मिळेल तसेच उत्साह कायम राहील. योजना आकारास आल्यामुळे आनंद मिळेल. राजकारणी व्यक्तींना यश मिळू शकते. या आठवड्यात आई-वडिलांचे सहकार्य व आर्थिक प्राप्तीत अडथळे येणार नाहीत. 


  व्यवसाय : विशेष व्यावसायिक यशासोबत नोकरीतही प्रगती साधाल. 
  शिक्षण : अतिआत्मविश्वास, आळसामुळे निकालावर परिणाम शक्य. 
  आरोग्य : पोट व कानात वेदना शक्य. पडसे होण्याची शक्यता आहे. 
  प्रेम : जोडीदारासोबत फिरण्यात, करमणुकीत वेळ घालवाल. 
  व्रत : श्री राधाकृष्णचे स्मरण करून कार्य करत राहा.

 • weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

  मकर 
  संपत्तीत वाढ करण्याचे विचार मनात येतील. त्यात लवकरच यश मिळेल. धनाची आवक सुरूच राहील. नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. पराक्रम चांगला राहील. अपत्यांपासून सुख-सहकार्य मिळेल. कनिष्ठांना मदत करण्याची संधी या आठवड्यात तुम्हाला मिळू शकेल. 


  व्यवसाय : प्रतिस्पर्ध्यांशी वाद होऊ शकतो. कामांत अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. 
  शिक्षण : आत्मविश्वास राहील. अभ्यासात रस राहील. 
  आरोग्य : काही आरोग्यविषयक समस्या शक्य. पायांना सूज शक्य. 
  प्रेम : जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. पण प्रेम प्रकरणांत समस्या शक्य. 
  व्रत : श्री गणेशाचे दर्शन घ्या. आराधना करा. 

 • weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

  धनू 
  संघर्षाचा काळ आहे. विरोधकांपासून विशेष सावध राहा. विशेषत: आठवड्याच्या अखेरीस. कोणतीही गोष्ट लहान आहे असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. जोखमीची कामे टाळण्याचा प्रयत्न करा. नकारात्मकतेत अडकू नका. अडचणींना तोंड दिल्यानंतरच यश मिळू शकेल. 


  व्यवसाय : बदली होण्याचे योग आहेत. कामांचा अनावश्यक विस्तार करण्याचे टाळा. 
  शिक्षण : अडथळे संपतील. अनुकूल निकाल मिळतील. 
  आरोग्य: मानसिक थकवा येऊ शकतो. पोट-दातात वेदना होऊ शकतात. 
  प्रेम : जोडीदाराशी वियोग होऊ शकतो. वैचारिक मतभेदही होऊ शकतात. 
  व्रत : शिवलिंगावर दूध मिश्रित जल अर्पण करा. 

 • weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

  तूळ 
  स्वत:च्या प्रयत्नाने आणि कार्याने आपली प्रतिभा सिद्ध कराल. विरोधकांना मागे सरावे लागेल. बेकार पडलेल्या वस्तूंचा उपयोगही योग्य रीतीने करू शकाल. बाधित कामे पुन्हा सुरू करण्यास सक्षम राहाल. आत्मविश्वासात मोठी वाढ होईल आणि प्रत्येक क्षेत्रातील कामांना महत्त्व प्राप्त होईल. 


  व्यवसाय : अधिकारी- तुमच्या कनिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यापार चांगला राहील. 
  शिक्षण : स्पर्धा परीक्षांत यश मिळेल. उद्दिष्ट प्राप्तीत यश मिळेल. 
  आरोग्य : अनिद्रेची समस्या त्रास देऊ शकते. पोटात वेदना होण्याची शक्यता. 
  प्रेम : प्रेमात यश मिळेल, त्याचबरोबर भेटीही मिळती. 
  व्रत : श्रीरामाला चंदनाचा टिळा समर्पित करा. 

 • weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

  कर्क 
  या आठवड्यात सप्तम चंद्राचे भ्रमण तुमच्या राशीस अपेक्षेपेक्षा जास्त यश व चिंतेचा शेवट करणारे असेल. आठवडा साधेपणात व अध्यात्मिक वातावरणात व्यतित होईल. योग्य वेळी योग्य काम, बोलण्यात संयम असल्यास समोरच्याचे हृदय जिंकण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या मध्यात २ दिवस खूप व्यग्र राहाल. 


  व्यवसाय : बदली- पदोन्नतीची संधी, योजनांचा प्रभार मिळू शकतो. 
  शिक्षण : अभ्यासात मन कमी रमेल. प्रकल्पाप्रति निराश राहाल. 
  आरोग्य : अचानक गुडघादुखी शक्य. पोट व कमरेत वेदना होऊ शकतात. 
  प्रेम : विवाहाचे प्रस्ताव मिळतील. पती/ पत्नीसोबत वेळ घालवाल. 
  व्रत : श्री गणेशाचे दर्शन घेऊन पूजा करा. 

 • weekly horoscope 28 april to 4 may 2019 in marathi

  कन्या 
  या आठवड्यात प्रवासात अडथळे येऊ शकतात. स्वत:साठी तयार केलेल्या योजनांत बदल करावा लागू शकतो. चिंता न केल्यास, त्याचा फायदा होईल. याचा तुम्हाला आनंद मिळेल. आठवड्यात चंद्राची पूर्ण दृष्टी राशीवर राहील. उत्पन्नाच्या स्रोतांत वाढ करण्यात यशस्वी व्हाल. प्रमुख व्यक्तींची भेट घेण्याची संधी मिळेल. 


  व्यवसाय : व्यापारी योजना यशस्वी होतील व प्रवास लाभदायक ठरेल. 
  शिक्षण : कला- वाणिज्यचे विद्यार्थी यशस्वी होतील. आशादायक निकाल. 
  आरोग्य : पाय आणि पोटात वेदना होण्याची शक्यता. 
  प्रेम : वैवाहिक जीवन सुखकारक.अविवाहितांचे अनोळखीप्रति आकर्षण. 
  व्रत : श्रीराम नामाचा यथाशक्ती जप करा. 

Trending