Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

साप्ताहिक राशिभविष्य : सर्व 12 राशींसाठी कसा राहील हा आठवडा, कोणाचे वाढणार उत्पन्न

रिलिजन डेस्क | Update - Dec 03, 2018, 12:06 PM IST

साप्ताहिक राशिभविष्य : वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत मिळणार संधी, कर्क राशीच्या लोकांना प्रेमात चांगली वागणूक आणि कन्या र

 • saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

  डिसेंबर महिन्यातील पहिला आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यात म्हणजे 3 ते 9 डिसेंबरचा काळ कसा राहील याविषयी ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून समजू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या सात दिवसांमध्ये चंद्र तीन वेळेस राशी परिवर्तन करणार. या तीन राशी तूळ, वृश्चिक आणि धनु आहेत. येथे चंद्राच्या स्थितीनुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे राहातील हे सात दिवस.


  मेष
  अाठव्या गुरूने जीवन अव्यवस्थित. शुक्राच्या दृष्टीमुळे विचित्र शारीरिक समस्यांचा सामना करावा लागताेय. मात्र, त्या गंभीर नाहीत. पैशांची आवकही अस्थिर व कामांत अडथळे. मदतीची अपेक्षा व्यर्थ. स्वबळावर यशप्राप्ती. अाठवड्याच्या अखेरीस पैशांचा अभाव जाणवू शकताे.


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात जास्त चढ-उतार. नाेकरीत असहकार्य.
  शिक्षण : अभ्यासाबाबत विचलित राहाल व मन भरकटेल.
  अाराेग्य : शरीराचे विविध अवयव दुखतील. तसेच क्रोध वाढेल.
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीकडून अपेक्षा व्यर्थ. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
  व्रत : शिवलिंगाला जलाने अभिषेक करा व दिवा लावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसे राहतील हे सात दिवस...

 • saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

  वृषभ 
  कामांसाेबत लाभही जास्त हाेईल. योजना पूर्ण होतील व विरोधकांना निराश करण्यात यश. धार्मिक कार्यांत सहभागी हाेण्याची संधी मिळेल. गुरुवारी काही समस्या येऊ शकते. त्यानंतरचा काळ चांगला जाईल. विशेष काम झाल्याने अानंद वाटेल. अाठवड्याच्या शेवटी सहकार्य मिळेल. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय उत्तम व नाेकरीत नव्या संधी मिळतील. 
  शिक्षण : अभ्यास व्यवस्थित चालेल व सहकार्यही मिळेल. 
  अाराेग्य : ताप, सर्दी-खाेकल्याचा प्रकाेप हाेऊ शकताे. अंगदुखीचा त्रास. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी असलेला वाद संपेल. जाेडीदाराकडून सहकार्य. 
  व्रत : अाई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. 

 • saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

  मिथुन 
  पैशांची आवक मनासारखी नसेल. तसेच कामे व्यवस्थितरीत्या करू शकणार नाहीत. कार्यस्थळी फटकारले जाऊ शकते. मुलांची चिंता सतावेल व त्यांचे सहकार्यही मिळेल. शारीरिक श्रम जास्त करावे लागू शकतात. कुटुंबात परस्परांत अाेढाताण वाढेल. टेन्शन जास्त. मनात विविध विचार येतील. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात वेगाने कामे करा. नाेकरीत सतर्क राहा. 
  शिक्षण : शिक्षणात मनासारखी स्थिती नसेल व साधनांचा अभाव जाणवेल. 
  अाराेग्य : पाेट, खांदेदुखीच्या त्रासाची शक्यता. पायास ठाेकर लागू शकते. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीबद्दल मन उचाट. जाेडीदारापासून दुराव्याची शक्यता. 
  व्रत : श्री दुर्गामातेसमाेर तुपाचा दिवा लावा. 

 • saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

  कर्क 
  राहूचे गोचर राहील व गुरुची दृष्टीही अाहे. त्यामुळे या काळात सतर्क राहून कामे करा. दोघांत काहीशी स्पर्धा अाहे; परंतु पूर्ण प्रभाव राहील. ते अत्यधिक विचलित करण्याचा प्रयत्न करतील. क्रोध व असंयमाने घेतलेल्या निर्णयाने माेठे नुकसान शक्य. परिणामी, हा काळ शांततेने पार पाडा. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात दिलासा नाही. नाेकरीत अडथळे येतील. 
  शिक्षण : शिक्षणात अडचणी येतील. शिक्षकांसमाेर सुनावणी हाेणार नाही. 
  अाराेग्य : डाव्या डाेळ्यासह डाेके दुखू शकते. खांदे व हातातही त्रास हाेईल. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीची वागणूक चांगली नसेल. वैवाहिक जीवनात साधेपणा. 
  व्रत : श्री पंचमुखी हनुमानासमाेर दिवा लावा. 

 • saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

  सिंह 
  मंगळाच्या दृष्टीमुळे पैशांची आवक सामान्य राहील. नवी कामे करण्यास मिळू शकतात. नवे संबंध लाभदायक ठरतील. मन अानंदी राहून रखडलेली कामे हाेतील. गुरुवारनंतर काळ विपरीत होऊ शकताे. पैशांचा अभाव. कार्यस्थळी इतरांवर टीकेच्या प्रयत्नात स्वत:चेच नुकसान होईल. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायातील प्रयत्न अपयशी. नाेकरीत लक्ष्यप्राप्ती. 
  शिक्षण : अभ्यासात पुढे राहाल व शिक्षक सहकार्य करतील. 
  अाराेग्य : कान व दातदुखीचा त्रास हाेऊ शकताे. विजेपासून सतर्क राहा. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीकडून सहकार्य. वैवाहिक जीवन सुखमय राहील. 
  व्रत : श्री लक्ष्मीमातेला पांढरी फुले अर्पण करा. 

 • saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

  कन्या 
  शनी-मंगळाची दृष्टी व चंद्राच्या गोचरने अाठवड्याचा प्रारंभ. स्थायी धन-मालमत्ता प्रकरणांत यश. पैशांची आवकही चांगली. कामे करण्यात यशस्वी व्हाल. मित्रांचे सहकार्य. नवी कामे मिळू शकतात. पात्रता वाढेल. वादग्रस्त प्रकरणांत बाजू मजबूत व कुटुंबही अनुकूल राहील. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय व्यवस्थित व नाेकरीत प्रगती हाेईल. 
  शिक्षण : अभ्यासात गणित व तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना यश मिळेल. 
  अाराेग्य : मन भरकटेल. तसेच पायाचे पंजे दुखू शकतात. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीप्रति मन उचाट हाेईल. वैवाहिक जीवन सक्रियता शक्य. 
  व्रत : सूर्याला दूधमिश्रित जलाने अर्घ्य द्या. 

 • saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

  तूळ 
  अाठवड्याच्या प्रारंभी अडचणी व आर्थिक समस्यांची शक्यता. सर्व बाजूंनी असहकार्य. मंगळवारी सकाळपासून दिलासा. पैशांची आवक वाढेल व रखडलेली कामे गतिमान होतील. कार्यस्थळी मदत मिळेल. कुटुंबाची साथ. ध्येयाकडे जाल व धार्मिक कार्यांची संधी. 


  नाेकरी व व्यवसाय: व्यवसाय संमिश्र राहील व नाेकरीत कनिष्ठांकडून मदत. 
  शिक्षण : वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्राच्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. 
  अाराेग्य : त्वचा, गळा खवखवण्याचा त्रास हाेऊ शकताे. दाढही दुखेल. 
  प्रेम : प्रेमात यश मिळेल. तसेच वैवाहिक सुख प्राप्त होईल. 
  व्रत : श्रीगणेशाला लाडंूचा नैवेद्य दाखवा. 

 • saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

  वृश्चिक 
  सूर्य, बुध व गुरूच्या दृष्टीमुळे चांगला योग तयार झाला अाहे. त्यामुळे प्रारंभ चांगला होऊन पात्रतेनुसार कामे मिळतील. यशही मिळेल. बुध व गुरुवारी चिंताजनक स्थितीची शक्यता. कामे याेग्य वेळी हाेणार नाहीत. शुक्रवारी कामांना पुन्हा गती मिळेल. शनिवारपासून स्थिती चांगली हाेईल. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय सर्व प्रकारे उत्तम. नाेकरीत चांगली स्थिती. 
  शिक्षण : सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळतील. 
  अाराेग्य : श्वास-दम्याच्या रुग्णांना सतर्क राहावे. कफ-सर्दीचा त्रास शक्य. 
  प्रेम : प्रेमाच्या प्रस्तावांत विलंबाने यश. वैवाहिक जीवन सुखमय राहील. 
  व्रत : शिवलिंगावर बिल्वपत्र अर्पण करा. 

 • saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

  धनू 
  काळ दिलासादायक राहील. तसेच बऱ्यापैकी सहकार्य मिळून समस्यांचे उत्तर शाेधण्यात यश. शारीरिक श्रम जास्त व पैसे मिळवण्यात अडथळे कायम. सुखद वार्ता कळतील. बांधकामसंबंधी कामांत खर्च हाेईल. पाहुणे येऊ शकतात. यासह अाठवड्याच्या अखेरीस अार्थिक चणचण जाणवू शकते. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय सामान्य. नाेकरीत जास्त कष्ट शक्य. 
  शिक्षण : अभ्यासाप्रति नावड वाटेल. तसेच सहकार्यही कमीच मिळेल. 
  अाराेग्य : पाेटदुखीसह पायाच्या पंजांचा त्रास उद‌्भवू शकताे. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी वाद होऊ शकताे व जाेडीदार अनुकूल राहील. 
  व्रत : श्री दुर्गा चालिसाचे पठण करा. 

 • saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

  मकर 
  केतूचे गोचर, राहूची दृष्टी व अनुकूल चंद्रामुळे पैशांची आवक चांगली राहील. ठरवलेली कामे वेळेवर हाेतील; परंतु चिंतादेखील सतावेल. शत्रू वरचढ हाेण्याचा प्रयत्न करतील. याेग्य मार्गदर्शन न मिळाल्याने शुक्र व शनिवारी नुकसानीची शक्यता. त्यामुळे सल्ला घेऊन कामे करा. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय चांगला चालेल. नाेकरीत बदलाच्या संधी. 
  शिक्षण : शिक्षणापासून दुरावा राहील. तसेच साधने उपलब्ध हाेणार नाहीत. 
  अाराेग्य : तणाव व डाेकेदुखीचा त्रास होईल. त्वचेसंबंधीच्या समस्या शक्य. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीची वर्तणूक अयाेग्य राहील. वैवाहिक जीवनात असमाधान. 
  व्रत : शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करा. 

 • saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

  कुंभ 
  राशीचा स्वामी शनीची दृष्टी व अाठवा चंद्र असल्याने पैशांची आवक कमी हाेऊन त्रास हाेईल. खर्च जास्त व शेजाऱ्यांशी वाद होईल. तसेच कामे वेळेवर हाेणार नाहीत. प्रवासात अडथळे शक्य. वाहन चालवताना सावध राहा. गुरुवारनंतर वेळेत सुधारणा अाणि मित्रांची भेट हाेईल. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय मध्यम. नाेकरीत एेकले जाणार नाही. 
  शिक्षण : अभ्यास चांगला चालेल व यशदेखील मिळेल. 
  अाराेग्य : मान, त्वचेच्या समस्येसह फोड-पुटकुळ्या आदीचा त्रास शक्य. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी तणाव. तसेच वैवाहिक जीवन सुखमय राहील. 
  व्रत : श्रीगणेशाला दूर्वा अर्पण करा. 

 • saptahik rashifal 3 to 9 Decembar in marathi

  मीन 
  गुुरू व चंद्राच्या दृष्टीमुळे पैशांची आवक चांगलीच राहील. कामेही खूप मिळतील; परंतु मन भरकटू शकते. मंगळ व बुधवारी पैशांचा अभाव जाणवून तणाव वाढेल. गुरुवारपासून वेळ पुन्हा अनुकूल. शुभवार्ता कळतील. तसेच जुने अाेळखीचे लाेक भेटतील. नवीन संधी मिळतील. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय उन्नत राहील. नाेकरीत सहकार्य मिळेल. 
  शिक्षण : वेळेचा सदुपयोग करू शकाल व अभ्यासही चांगला चालेल. 
  अाराेग्य :डाेळ्यांसह आतड्यांचा त्रास निर्माण हाेऊ शकताे. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीकडून सहकार्य मिळेल. जाेडीदार अनुकूल राहील. 
  व्रत : प्रभू श्रीरामांना पांढरी फुले अर्पण करा. 

Trending