Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

साप्ताहिक राशिफळ : 3 ते 9 जूनपर्यंतचा काळ 9 राशींसाठी खास, आठवड्यातील 6 दिवस राहतील शुभ योग

रिलिजन डेस्क | Update - Jun 04, 2019, 12:05 AM IST

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसे राहतील हे सात दिवस

 • Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

  साप्ताहिक राशिफळ, 3 ते 9 जूनपर्यंतचा काळ मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी खास राहील. या आठवड्यात 3 आणि 6 जूनला सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त 4 जूनला द्विपुष्कर योगही जुळून येत आहे. या योगामध्ये करण्यात आलेल्या कामाचे दुप्पट फळ प्राप्त होते. यासोबतच 7,8 आणि 9 तारखेला रवियोग जुळून येत आहे. या शुभ योगामध्ये खरेदी आणि आर्थिक व्यवहार, गुंतवणुकीशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. या व्यतिरिक्त तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


  मेष
  द्वितीय चंद्र असल्याने आर्थिक स्थिती स्थिर राहील. परिस्थितीवर हळूहळू नियंत्रण येईल. अडचणी सुटण्यास प्रारंभ हाेईल. आर्थिक समस्यांचे निदान हाेईल. वाद- विवादात विजय मिळवून शत्रूंना मात द्याल. नवीन कार्ये सुरू होतील. मित्रांकडून फायदा होईल. आठवड्यात खर्चाचे प्रमाण वाढेल.


  व्यवसाय : नाेकरीत बढती मिळेल, कर- व्याज समस्या सुटतील.
  शिक्षण : अनावश्यक वेळ खर्च न हाेण्याची कला शिका.
  आरोग्य : कमरेची नस, पाय दु:खी. बाहेरचा बर्फ खाणे टाळा
  प्रेम : सुंदर जाेडीदाराचा याेग. जाेडीदाराचे सहकार्य मिळेल.
  व्रत : शिवाष्टकाचे पठण करा. शंकराचे दर्शन घ्या


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

 • Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

  मिथुन 
  द्वादश चंद्र असतानाही या राशीच्या व्यक्ती चांगली कामगिरी करतील, पण काैतुक करणारे नाही म्हणून निराश व्हाल. स्वत:ला समाधान वाटेल. आठवड्याच्या मध्यात चंद्र आर्थिक समस्या साेडवेल. काेणती तरी माेठी आॅफर मिळेल. शुक्र- शनीमुळे निंदा पदरी पडू शकेल. 


  व्यवसाय : प्रयत्न उच्च दर्जाचे हाेतील, पण इच्छित परिणाम नाही 
  शिक्षण : संशाेधन व आध्यात्मिक अभ्यासात स्वारस्य घ्याल. 
  आरोग्य : पाेट आणि छातीच्या जवळ त्रास हाेऊ शकताे. 
  प्रेम : वैवाहिक संबंध चांगले राहतील, पण प्रेमात बाधा येईल. 
  व्रत : राम-सीतेचा जप करा, गुरूंची सेवा करा 

 • Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

  वृषभ 
  चंद्र - सूर्य गाेचर राशीमध्ये येत आहे. कुठून तरी धनलाभाचा याेग आहे. मंगळवारनंंतर यश मिळण्यास सुरुवात हाेऊन जुन्या नुकसानीची भरपाई हाेईल. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. मुलांकडून सुख मिळेल. धार्मिक प्रवासाचा योग आहे. आठवड्याच्या शेवटी शुभवार्ता कळेल. 


  व्यवसाय : व्यापारात प्रगतीचा याेग. नाेकरीत बढती मिळेल. 
  शिक्षण : अभ्यासापेक्षा संशाेधनात रस घ्याल. नवीन प्रयाेग कराल. 
  आरोग्य : मुलांच्या आराेग्याबद्दल सतर्क राहा. कंबरदुखीची शक्यता 
  प्रेम : अनपेक्षित प्रेम प्रस्ताव येतील. विवाहाचे प्रस्ताव येतील. 
  व्रत : महाकालीला लिंबांची माळ अर्पण करा 

 • Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

  कर्क 
  सामान्य काळ असल्याने माेठी कामे हातात घेतली नाही तर चांगले. आठवड्याच्या मध्यात चंद्र द्वादश असल्याने कमी आर्थिक प्राप्ती हाेईल. पण नंतर पैशाची चिंता मिटेल. अनावश्यक वादापासून दूर राहा. काेणावर जास्त विश्वास ठेवू नका. बुधवारी शुभ वार्ता समजेल. 


  व्यवसाय : याेग्य वेळेची प्रतीक्षा करा. भूलथापांना बळी पडू नका. 
  शिक्षण : लक्ष विचलित हाेईल. आठवड्याच्या मध्यास नियंत्रण 
  आरोग्य : त्वचेची जळजळ, सर्दी व अॅलर्जीच्या तक्रारी जाणवतील. 
  प्रेम : प्रेमासाठी समर्पणाची भावना पण दुसरीकडून उपेक्षा हाेईल. 
  व्रत : श्रीराम जप करा. रामदरबाराचे दर्शन घ्या 

 • Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

  सिंह 
  स्वपराक्रमाने विराेधकांना नेस्तनाबूत कराल. धनप्राप्ती चांगली हाेईल आणि आत्मविश्वास वाढेल. स्वत:च्या व्यवहाराने दुसऱ्यांना मदत हाेईल. मित्रमंडळींमध्ये प्रभाव वाढेल. मनाेरंजक सहलीचा याेग आहे, पण संभाळून राहा. शत्रूंचा पराभव हाेईल. नवीन कार्ये घडतील. 
   

  व्यवसाय : नोकरीत लक्ष्यप्राप्ती व व्यवसायात यश मिळेल. 
  शिक्षण : हस्तक्षेप संपेल, इतरांच्या तुलनेत चांगले काम कराल. 
  आरोग्य : अनावश्यक चिंता हाेऊ शकेल. अंगदुखीची शक्यता 
  प्रेम : आई- वडिलांचे प्रेम व काैटुंबिक सहकार्याची इच्छा हाेईल. 
  व्रत : कृष्णाच्या नावाचा जप आणि ध्यान करा

 • Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

  कन्या 
  नवमातील चंद्र शुभसंकेत देणारा आहे. प्रसन्नता देणारी बातमी मिळेल. हे संपत्तीत वाढ हाेण्याचे संकेत आहेत. एखाद्या पदाची प्राप्ती हाेऊ शकते. लक्ष्यप्राप्ती हाेईल. अपेक्षित कार्ये हाेतील. दशमातील मंगळ आत्मविश्वास वाढवेल व विराेधकांचे प्रयत्न विफल ठरवेल. 


  व्यवसाय : व्यापारात प्रगती. नाेकरीसाठी बाहेर जावे लागेल. 
  शिक्षण : वरिष्ठांची साथ मिळेल. अनुकूल परिणाम दिसून येतील. 
  आरोग्य : पाेटाची तक्रार, सकाळी डाेकेदुखी, तापाची शक्यता. 
  प्रेम : विवाह समस्या सुटतील. जीवनाचे लक्ष्य मुख्य असेल. 
  व्रत : हनुमानाला गाेड पानाचा प्रसाद दाखवा

 • Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

  धनू 
  मंगळ आणि राहूच्या पूर्ण दृष्टीसह चंद्राची स्थिती चांगले याेग तयार करत आहे. वेळ चांगली असून अडचणी येणार नाहीत. मन प्रसन्न राहील. कुटुंबाबराेबर वेळ घालवाल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण हाेतील. कर्जासंबंधीच्या समस्या देखील दूर हाेतील. मित्रांबराेबर गप्पा हाेतील. 


  व्यवसाय : वनवीन साैदे हाेतील. बेराेजगारांना यश मिळेल. 
  शिक्षण : अनुदान मिळेल आणि अभ्यास चांगला हाेईल 
  आरोग्य : विचारात सकारात्मकता येईल. 
  प्रेम : जोडीदाराबराेबर राहण्याची संधी मिळेल. सामंजस्य राहील. 
  व्रत : हनुमानाला तूप, दिवा, प्रसाद अर्पण करा 

 • Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

  तूळ 
  चंद्र अष्टमात असल्याने सप्ताहाची सुरुवात चांगली राहणार नाही. बुधवारपासून कामाला वेग येईल, व्यग्रताही राहील. संपत्तीमुळे कुटुंबात तणाव हाेईल. मामाकडून सहकार्य मिळेल. यात्रेला जाण्याचा याेग. धार्मिक कार्यात रुची दाखवाल. वरिष्ठांचा सल्ला कामाला येईल. 


  व्यवसाय : कार्यस्थळी मनासारखे काम, राेजगार प्राप्ती 
  शिक्षण : आवश्यक ती मदत मिळेल. अभ्यासात सजग राहाल. 
  आरोग्य : आईच्या तब्येतीबद्दल सजग राहा. थकवा येईल. 
  प्रेम : अतिअपेक्षेने निराशा येईल, वैवाहिक जीवन सामान्य राहील. 
  व्रत : दुर्गादेवीला नमस्कार करा,दिवा लावा 

 • Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

  वृश्चिक 
  सप्तमातील चंद्र सप्ताहाच्या सुरुवातीला चांगला, परंतु अष्टमात आल्यावर अडचणी निर्माण करेल. गुरुवारनंतर परिस्थिती सुधारेल. काम अधिक वाढेल आणि कर्मचाऱ्यांची समस्या वाढू शकते. जुन्या संपत्तीचा वाद उकरून निघेल. शुक्रवारी माेठे कार्य हाेण्याची शक्यता. 


  व्यवसाय : व्यापारात कर्ज मिळू शकते. नाेकरीत प्रभाव वाढेल. 
  शिक्षण : अनावश्यक कामात वेळ जाईल. अभ्यासावरचे लक्ष उडेल 
  आरोग्य : रक्तदाब, अनिद्रा यांची समस्या हाेऊ शकते. 
  प्रेम : जाेडीदाराचे मनाेबल वाढवा. प्रेमात स्वत:चे एेका. 
  व्रत : कृष्णाची आराधना फलदायक ठरेल

 • Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

  कुंभ 
  वेळ आनंदात व्यतीत हाेईल. चतुर्थ स्थानातील चंद्र थाेडीशी अडचण निर्माण करेल, पण शनीमुळे दुसऱ्यांची मदत करू शकाल. आर्थिक आवक संताेषजनक राहील. धार्मिक कार्य पार पडतील. काैटुंबिक पाठबळ मिळेल. जमिनीतून लाभ मिळण्याची शक्यता. 
   

  व्यवसाय : व्यावसायिक लाभ मिळेल. नाेकरीसाठी उत्तम काळ 
  शिक्षण : प्रत्येक विषयावर पकड राहील. उत्तम परिणाम मिळतील 
  आरोग्य : गुप्तराेग आणि पाेटाच्या समस्या त्रास देण्याची शक्यता 
  प्रेम : क्रियाशील राहिल्याने प्रेम आणि श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्ती भेटतील. विवाह उत्तम राहील. 
  व्रत : सूर्याला अर्घ्य अर्पण करा

 • Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

  मीन 
  तृतीयात चंद्र आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली हाेईल. सप्ताहाच्या मध्यात चंद्र चतुर्थ राहील. हा कालावधी संयम आणि प्रतीक्षेचा आहे. आत्मनियंत्रण ठेवा, वाद टाळा. धनप्राप्तीत अडचणी येतील. 


  व्यवसाय : व्यवसायात नियमांचे पालन करा. नोकरीत वरिष्ठांना सहकार्य करा. 
  शिक्षण : अभ्यासाचा स्तर सुधारण्यासाठी मेहनत घ्या. 
  आरोग्य : रक्तदाबाची समस्या, वीज उपकरणांपासून सावध 
  प्रेम : प्रेम प्रकरणांपासून दूर राहा आणि जाेडीदाराकडे लक्ष द्या. 
  व्रत : हनुमान चालिसा स्तोत्र वाचा, मंदिरात जा.

 • Weekly Horoscope 3 to 9 june rashifal in marathi

  मकर 
  मंगळ वगळता अन्य काेणत्याही ग्रहाची राशीला साथ मिळत नाही. चंदामुळे संपूर्ण आठवठा चांगले उत्पन्न मिळेल. धार्मिक सहलीला जाण्याची संधी मिळेल. शनिवारी संध्याकाळी संघर्ष करावा लागेल. खर्च अधिक हाेईल. 


  व्यवसाय : व्यवहारात सावधान, नोकरीत याेग्य व्यवहार करा 
  शिक्षण : वरिष्ठांवर विश्वास ठेवा. अभ्यासात अडचण येईल 
  आरोग्य : पायाचे दुखणे, डाेळ्यात जळजळ हाेऊ शकते. 
  प्रेम : जोडीदाराबद्दल निष्ठा कमी हाेईल. वैवाहिक जाेडीदाराकडून सहकार्य मिळेल. 
  व्रत : गणपतीला कुंकू व प्रसाद अर्पण करा 

Trending