Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

साप्ताहिक राशीफळ : जाणून घ्या, सप्टेंबरचा पहिला आठवडा कसा राहील तुमच्यासाठी

रिलिजन डेस्क | Update - Sep 04, 2018, 02:11 PM IST

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शनी आपली चाल बदलेल. चंद्र वृषभ राशीपासून सिंह राशीपर्यंत भ्रमण करेल.

 • Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

  सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शनी आपली चाल बदलेल. चंद्र वृषभ राशीपासून सिंह राशीपर्यंत भ्रमण करेल. 2 सप्टेंबरच्या रात्री बुधसुद्धा राशी परिवर्तन करून कर्क राशीतून सिंह राशीमध्ये आला आहे. या सर्व ग्रह परिवर्तनाचा प्रभाव या आठवड्यात दिसेल. काही राशींसाठी हे परिवर्तन शुभ राहील तर काहींसाठी अशुभ राहील.


  मेष
  शुक्र- गुरू व मंगळाची दृष्टी आहे. चंद्राचा गोचर उत्पन्न चांगले करेल. जोखीम घेण्यापासून सावध राहा. नव्या लोकांशी व्यवहार नुकसानकारक. अज्ञात भीती राहील. गुरुवारनंतर जास्त सतर्क राहा. जवळच्या लोकांशी वाद होऊ शकतो. योजना निष्फळ होतील व गुपित बाबी बाहेर येऊ शकतात.


  व्यवसाय व व्यापार : व्यापार सामान्य व नोकरीत समस्या सोडवाल.
  शिक्षण : अभ्यासात आवड राहील, मात्र व्यवस्था निर्माण करण्यात अपयश येईल.
  आरोग्य : डाव्या पायात जखम किंवा लचक होऊ शकते. दातदुखी व तोंड येऊ शकते.
  प्रेम : पती/पत्नीशी मतभेद होण्याची शक्यता. प्रेम प्रस्तावात अपयश येईल.
  व्रत : श्रीकृष्णाला दह्याचा नैवेद्य दाखवा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसा राहील हा आठवडा...

 • Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

  वृषभ
  उच्च स्थानातील चंद्राचा गोचर आहे. नशिबाची साथ व भावांचे सहकार्यही प्राप्त होईल. अडकलेला पैसा प्राप्त होईल व नवी कामेही प्राप्त होतील. संपर्काचा लाभ मिळू शकतो. नाराज लोक पुढे चालून संपर्क करतील. पैशाची प्राप्ती चांगली राहील व प्रवास सुखद होईल. 


  व्यवसाय व व्यापार : व्यापार उत्तम राहील व नोकरीत यश.  
  शिक्षण : व्यर्थ वेळ संपेल. योग्य ठिकाणी पराक्रम दाखवू शकणार नाहीत.  
  आरोग्य : मान व डोकेदुखी. झोप जास्त.डावा पाय, गुडघ्यात वेदना.  
  प्रेम : प्रेम व्यक्त करण्यात उशीर झाल्याने नुकसान. पती/पत्नीचे सहकार्य.  
  व्रत : श्रीकृष्णाला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा.

 • Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

  मिथुन
  शनी-गुरूची दृष्टी, द्वादश चंद्र आहे. सुरुवातीस उत्पन्नावर परिणाम होईल. वादही होऊ शकतो. सतर्क राहिल्यास बचाव होईल. मंगळवारी सायंकाळी स्थिती आपल्या बाजूने होईल. कामात तेजी येईल व लाभवृद्धीही होईल. चांगल्या लोकांची भेट होईल. दुसऱ्यांना मदत करण्याची संधी प्राप्त होईल.  


  व्यवसाय व व्यापार :  व्यापारातील त्रास समाप्त होईल. नोकरीत लक्ष्य गाठाल.  
  शिक्षण : कामगिरी चांगली राहील व अभ्यास व्यवस्थित. 
  आरोग्य : पोट व कमरेत त्रास. कीटक चावल्याने ताप. डोळ्यात समस्या.  
  प्रेम : प्रेयसी/ प्रियकराकडून आदर मिळेल व वैवाहिक जीवनात समाधान राहील.  
  व्रत : श्रीकृष्णाला कच्च्या गोड दुधाचा नैवेद्य दाखवा.  

 • Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

  कर्क
  शत्रू बुध आज राशी सोडेल. मदत मिळेल व कामातील गतीसोबत उत्पन्नही मिळेल.संततीसुख मिळेल. वादात वाढ होईल. शुक्र व शनिवारी सर्वात चांगले दिवस राहतील. अचानक लाभ वाढू शकतो. अडकलेला पैसा मिळेल व कायदेशीर प्रकरणात यश मिळेल.  


  व्यवसाय व व्यापार : व्यापार संमिश्र राहील. नोकरीत यश.  
  शिक्षण : अभ्यासासोबत अन्य प्रयोग करण्याची इच्छा होईल.  
  आरोग्य : त्वचा व अॅलर्जीसंबंधी समस्या. गळ्यात खरखर.  
  प्रेम : प्रेयसी/ प्रियकराची वागणूक अनुचित. पती/पत्नीशी मधुर संबंध. 
  व्रत : श्रीकृष्णाला दही-भाताचा नैवेद्य दाखवा.

 • Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

  सिंह
  सूर्य आधीपासून आहे. आज बुधाचा राशीत प्रवेश होईल. मंगळाची दृष्टी राशीवर पडेल. प्रभावातही वाढ होईल व खर्चही वाढेल. उत्पन्नही चांगले राहील. नशीब साथ देत आहे. यासोबत काम जास्त राहील. शुक्रवार व शनिवार अपेक्षेपेक्षा कमकुवत राहण्याची शक्यता आहे. इतरांमुळे घरात वाद होऊ शकतो.  


  व्यवसाय व नोकरी : व्यापार चांगला राहील व नोकरीत वर्चस्व वाढेल.  
  शिक्षण : अभ्यासात आवड वाढेल व धार्मिक श्लोक पाठ करण्याची इच्छा होईल.  
  आरोग्य : अपचन, डोळ्यात जळजळ, अशक्तपणा, ताप व पायात वेदना.  
  प्रेम : प्रेयसी/ प्रियकराशी समन्वय व वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.  
  व्रत : श्रीकृष्णाला हिरवे वस्त्र अर्पण करा.  

 • Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

  कन्या
  शुक्र राशीतून निघाला आहे. शनीची दृष्टी व चंद्राचा गोचर चांगला आठवडा जाण्यास कारणीभूत ठरेल. सहकार्य मिळेल. उत्पन्न चांगले राहील व कामे जास्त राहतील. शुक्र व शनिवारी अचानक धनलाभचा योग आहे. कुटुंबाची साथ मिळेल व फिरायला जाण्याची संधी मिळू शकते.  


  व्यवसाय व व्यापार : व्यापारात फसवणूक. अधिकाऱ्यांना माहिती द्या.  
  शिक्षण : काही निर्णय चुकीचे होऊ शकतात. अभ्यासात मन भरकटेल. 
  आरोग्य : सांधे व कंबरदुखी. डोळे जड पडतील. 
  प्रेम : प्रेयसी/ प्रियकरात तणाव व वैवाहिक संबंधात सुधारणा होईल.  
  व्रत: श्रीकृष्णाला रबडीचा नैवेद्य दाखवा.

 • Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

  तूळ
  राशीत शुक्राचा प्रवेश झाला आहे. गुरू आधीपासून आहे. स्थावर संपत्तीमध्ये वाढ करण्याची इच्छा होईल. ऐश्वर्य, संपत्तीवर खर्च होईल. चंद्र पैशाची आवक सुरुवातीपासून बाधित करेल. चांगले उत्पन्न मंगळवारी सायंकाळपासून सुरू होईल. गुरू व शुक्र सर्वात चांगले दिवस. शनिवारी सायंकाळी आनंदवार्ता मिळेल.


  व्यवसाय व नोकरी : व्यापारातील त्रास समाप्त होईल व नोकरीत नव्या संधी.  
  शिक्षण : अभ्यासात मन लागेल व तंत्रज्ञांना यश मिळेल.  
  आरोग्य : थकवा व आळस वाढेल. आठवड्यात कफही जास्त राहील.  
  प्रेम : विरुद्ध लिंगाप्रति आकर्षण. पती/पत्नीपासून आनंद मिळेल.  
  व्रत : श्रीकृष्णाला तुळशी माळ अर्पण करा.

 • Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

  वृश्चिक
  चंद्राची पूर्ण दृष्टी आहे. मंगळवारपर्यंत सर्व कामे योग्य पद्धतीने होतील. धनलाभ होईल व सहकार्यही मिळेल. यानंतर गुरुवारी सायंकाळपर्यंत त्रास राहील. इतरांवर विश्वास ठेवल्यास नुकसान होईल. विरोधकांबाबत सतर्क राहा. शुक्र व शनिवारी आपल्या बाजूने राहील.


  व्यवसाय व व्यापार : व्यापारात दिशा मिळेल व नोकरीत सहकार्य.  
  शिक्षण : कामगिरी चांगली राहील व अभ्यासाप्रति आवड राहील.  
  आरोग्य : आठवड्यात मानदुखी होईल. दृष्टी क्षीण झाल्याने तणाव.  
  प्रेम : प्रेयसी/प्रियकराशी संबंध घनिष्ठ, प्रेमात यश. वैवाहिक सुख मिळेल. 
  व्रत : श्रीकृष्णाला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवा.

 • Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

  धनू
  आठवड्यात शनीचे गोचर आहे. आई-वडिलांकडून सुख मिळेल व पैशाची आवक चांगली राहील. कामे वेळेवर होतील व नवे कामही प्राप्त होतील. बुध व गुरुवारी सगळीकडून यश प्राप्त होईल. शुक्र व शनिवारी स्वत:ला सांभाळा. सतर्क राहावे लागेल व रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.  


  व्यवसाय व व्यापार : व्यापार स्थिर राहील व नोकरीत प्रवाशाचा योग आहे.  
  शिक्षण : आठवड्यात अभ्यासात पुढे राहाल व मित्रांची मदत मिळेल.  
  आरोग्य : या आठवड्यात जखम होऊ शकते. खोल पाण्याजवळ जाऊ नका.  
  प्रेम : प्रेयसी/ प्रियकराशी मतभेद समाप्त. पती/पत्नीचे सहकार्य मिळेल.  
  व्रत : श्रीकृष्णाला मधाचा नैवेद्य दाखवा.  

 • Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

  मकर
  राशीत पंचम चंद्र आहे. उच्चीचा मंगळ-केतूचा गोचर आहे. संततीसुख व धनलाभाची शक्यता आहे. राजकारण्यांना यश मिळेल व वर्चस्वात वाढ होण्याचे योग आहेत. स्थावर संपत्तीतून लाभ मिळेल. नव्या ठिकाणी जाण्याची इच्छा होईल. संपर्काचा लाभ होईल. 


  व्यवसाय व व्यापार :  व्यवसाय वाढीचे योग व नोकरीत बदली शक्य.  
  शिक्षण : शिक्षक अनुकूल राहतील व अभ्यासात मन लागेल. मदत प्राप्त होईल.  
  आरोग्य : शुगर वाढू शकते. जखमेची भीती. वीज वापरात सतर्क राहा.  
  प्रेम : प्रेयसी/ प्रियकराची निराशा. पती/ पत्नीपासून लांब राहावे लागू शकते.
  व्रत : श्रीकृष्णाला पाच फळाचा नैवेद्य  

 • Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

  कुंभ
  शनी-गुरूची दृष्टी व चतुर्थात चंद्र आहे. उत्पन्नात कमतरता येईल व कामाच्या ठिकाणी त्रास सुरू होईल. मन निराश राहील व सहकार्यात कमतरता राहील. मंगळवारपासून सुधारणा राहील. बुध व गुरुवारी यश मिळेल व रखडलेल्या कामात गती येण्यासोबत धनलाभही मिळेल. नव्या कामाप्रति उदासीनता राहील.  


  व्यवसाय व नोकरी : नोकरीत मन लागणार नाही व व्यवसायात उदासीनता.  
  शिक्षण : अभ्यासात सुधारणेसाठी प्रयत्न करावे लागतील. स्तर घसरेल.  
  आरोग्य : नसा आखडल्या जातील व जखम होऊ शकते. अवजारांचा योग्य वापर करा.  
  प्रेम : प्रेयसी/प्रियकरापासून अंतर ठेवावे वाटेल. वैवाहिक संबंधात तणाव येऊ शकतो.  
  व्रत : श्रीकृष्णाला केशरयुक्त दुधाने स्नान घाला. 

 • Weekly Horoscope 3 To 9 September 2018 in marathi

  मीन
  शुक्राची दृष्टी समाप्त होईल. तृतीय चंद्र आहे. भावांचे सहकार्य मिळेल व संततीही अनुकूल राहील. कामात यश मिळण्यासोबत लाभही प्राप्त होईल. मंगळ व बुधवारी खर्च जास्त होऊ शकतो. अनावश्यक प्रवास होऊ शकतो. नकारात्मक विचार वरचढ राहील.


  व्यवसाय व व्यापार : व्यापारी समस्या सुटतील व नोकरीत बदल.  
  शिक्षण : अभ्यासात चांगली व्यवस्था राहील व अभ्यासात मन लागेल.  
  आरोग्य : अपचन व वमनची तक्रार. वातसंबंधी समस्या शक्य.  
  प्रेम : प्रेमप्रस्तावाचा स्वीकार होईल व वैवाहिक संबंध बळकट होतील.
  व्रत : श्रीकृष्णाला पंजिरीचा नैवेद्य दाखवा.

Trending