Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

साप्ताहिक राशिभविष्य : 12 पैकी या 5 राशींसाठी भाग्यशाली राहील हा आठवडा  

रिलिजन डेस्क | Update - Feb 04, 2019, 02:58 PM IST

5 फेब्रुवारीपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात, या दिवशी मंगळ ग्रह बदलणार राशी, 7 फेब्रुवारीला बुध करणार राशी परिवर्तन, मेष

 • Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

  मंगळवार 5 फेब्रुवारीपासून माघ मासातील गुप्त नवरात्रास प्रारंभ होईल. ही नवरात्र 14 फेब्रुवारीपर्यंत राहील. गुप्त नवरात्रीमध्ये विशेषतः तंत्र साधना केली जाते. या आठवड्यात मंगळवार 5 फेब्रुवारीपासून मंगळ ग्रह मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करेल. यानंतर 7 तारखेला बुध ग्रह राशी परिवर्तन करेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी येणारे सात दिवस कसे राहतील.


  मेष
  दहावा चंद्र असल्याने कामांचे प्रमाण जास्त राहील; परंतु त्यात यशही मिळेल. तसेच भावांचे सहकार्य प्राप्त होईल. बुध व गुरुवारी पैशांची आवक सुधारेल व मुलांकडून सुख मिळेल. कार्यस्थळी यशस्वी व्हाल. मात्र, शुक्रवारी काही तरी नुकसान हाेऊ वा वस्तू हरवू शकते. शनिवारी चिंता व खर्चाचे प्रमाण जास्त राहील.


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात आराम. नाेकरीत अधिकारी समाधानी.
  शिक्षण : अभ्यासासाठी वेळ मिळेल व तयारी समाधानकारक असेल.
  आराेग्य : डाेकेदुखी, तणाव व डाेळे जळजळतील. सर्दी-ताप हाेणे शक्य.
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीची वागणे अयाेग्य असेल व जाेडीदाराकडून सुख मिळेल.
  व्रत : श्री दुर्गामातेला फळांचा नैवेद्य दाखवा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसे राहतील हे सात दिवस...

 • Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

  वृषभ 
  आज, उद्या व परवा दिवसाच्या मध्यापर्यंत नशिबाची साथ मिळेल; परंतु त्यानंतर कामांचे प्रमाण वाढेल. तथापि, पैशांची आवक चांगली राहील व सहकार्यातही वाढ हाेईल. शुक्र व शनिवारी अचानक पैसे येण्याचे योग बनतील किंवा अडकलेले पैसेही मिळू शकतात. तसेच मुलांकडून सुख मिळेल. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात चांगले काम. नाेकरीत पगारवाढ शक्य. 
  शिक्षण : परीक्षेच्या तयारीसाठी तत्पर राहाल व प्रयत्न यशस्वी हाेतील. 
  आराेग्य : कमी झाेप, डाेकेदुखी व तणावासाेबत चक्कर येऊ शकते. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीकडून सुख मिळेल व वैवाहिक प्रस्ताव येतील. 
  व्रत : श्री दुर्गादेवीसमाेर तुपाचा दिवा लावा. 

 • Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

  मिथुन 
  मंगळवारी दुपारपर्यंत सांभाळून राहावे लागेल. तसेच अनावश्यक खर्च हाेऊन चिंता सतावत राहील. एखादा आरोपही हाेऊ शकताे. त्यानंतर गुरुवारपर्यंत वेळ दिलासा देणारी असेल. चिंता दूर होतील व सहकार्य मिळेल. आठवड्याच्या अखेरीस अतिव्यग्रतेचा काळ असेल. कुटुंबीय तक्रारी करतील. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात सांभाळा. उधार देऊ नका. प्रवासयोग. 
  शिक्षण : अभ्यासाप्रती कमी आवड राहील व लक्ष विचलित हाेऊ शकते. 
  आराेग्य : ताप येऊ शकताे. तसेच अपचन व गुडघेदुखीचा त्रास हाेईल. 
  प्रेम : प्रेमाचा प्रस्ताव नाकारला जाईल. तसेच मतभेदही होऊ शकतात. 
  व्रत : श्री दुर्गादेवीला मधाचा नैवेद्य दाखवा. 

 • Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

  कर्क 
  पैशांची आवक सुधारेल. तसेच कामात मन लागेल व आनंदी राहाल. सोमवारी धनप्राप्तीचा योग आहे; परंतु मंगळवारी संध्याकाळी कुणाशी तरी वाद होऊ शकताे व बुधवारी मूल्यवान वस्तू हरवू शकते. गुरुवारी जुने मित्र भेटतील व आनंदी राहाल. शुक्रवारी सहकार्य मिळेल आणि प्रवासाचा योग आहे. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात मध्यम स्थिती व नाेकरीत त्रास होईल. 
  शिक्षण : शिक्षकांशी वैचारिक मतभेद होतील व अभ्यासात मन कमी लागेल. 
  आराेग्य : पायाचे घाेटे, दात दुखतील. जळजळ हाेऊन डाेळ्यांतून पाणी येईल. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीची भेट हाेईल व वैवाहिक जाेडीदाराची चिंता सतावेल. 
  व्रत : श्री दुर्गामातेला गाेड दह्याचा नैवेद्य दाखवा. 

 • Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

  सिंह 
  एखादी वाईट किंवा गंभीर घटना तर घडणार नाही ना, याची चिंता सतावेल. कल्पनाविश्वात रमाल. तसेच वाईट स्वप्ने पडून तणाव राहील. तथापि, पैशांची आवक चांगली राहून सहकार्यही मिळेल; परंतु तरीही भीती वाटेल. बुध व गुरुवारी स्वत:ला सांभाळाल. इतर दिवशी पुन्हा 'जैसे थे' स्थिती. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय चांगला व नाेकरीत पदाेन्नतीच्या संधी. 
  शिक्षण : कामगिरी सुधारेल. अभ्यासात मन लागेल व आत्मविश्वास वाढेल. 
  आराेग्य : तणाव व नैराश्य. नसा आखडतील व जास्त झाेप लागेल. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीची भेट हाेईल व जाेडीदाराचे सहकार्य मिळेल. 
  व्रत : श्री दुर्गामातेच्या ३२ नावांचा जप करा. 

 • Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

  कन्या 
  मुलांकडून सहकार्य मिळेल व पैशांची आवक सुधारून सुख प्राप्त होईल. नवीन जागी जाण्याची संधी मिळेल व कर्जमुक्तीचे उपाय गवसतील. बुध व गुरुवारी मात्र किरकाेळ समस्या वाढू शकतात. शुक्र व शनिवार हे दाेन्ही दिवस चांगले राहण्याची शक्यता असून, सर्व बाजूंनी शुभवार्ता कळतील. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात लाभाच्या व नाेकरीत पदाेन्नतीच्या संधी. 
  शिक्षण : परीक्षेची पूर्वतयारी सुधारेल. तसेच शिक्षक समाधानी राहतील. 
  आराेग्य : अॅलर्जी व तणाव राहून आत्मविश्वासाचा अभाव जाणवेल. 
  प्रेम : प्रेमात यशस्वी व्हाल. तसेच लग्नाचे प्रस्ताव प्राप्त हाेतील. 
  व्रत : श्री दुर्गामातेला नारळ अर्पण करा. 

 • Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

  तूळ
  पुढे जाण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतील. तसेच कामाची चिंता सतावेल व पैशांची आवकही कमी हाेऊ शकते. तथापि, मंगलकार्ये व उत्सवांत जाण्याची संधी मिळेल. बुध व गुरुवारी सहकार्य मिळेल व पैशांची आवकही होईल. इतर दिवशी अज्ञात भीती सतावेल; परंतु सतर्क राहून वाईट घटना टळतील. मुलांवर लक्ष ठेवा. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात यश व नाेकरीत अधिकारी समाधानी राहतील. 
  शिक्षण : शिक्षणात यश मिळेल व अभ्यास व्यवस्थित चालत राहील. 
  आराेग्य : मान व पाेटदुखीचा त्रास हाेईल. रक्तदाबाची समस्या जाणवेल. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी वाद होऊ शकताे. वैवाहिक जीवनात शांतता. 
  व्रत : श्री दुर्गामातेला दह्याचा नैवेद्य दाखवा. 

 • Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

  वृश्चिक 
  जबाबदाऱ्यांचे प्रमाण जास्त राहील. तथापि, सहकार्य मिळेल व आर्थिक स्थितीतही सुधारणा हाेईल. मात्र, बुध व गुरुवारी आवक कमी हाेऊन इतर समस्यांचा सामनाही करावा लागू शकताे. खासगीपणात व्यत्यय येईल व वाददेखील होऊ शकताे. शुक्रवारपासून मात्र वेळ अनुकूल हाेईल व शनिवारचा दिवस सुखमय जाईल. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात तेजी व नाेकरीत स्थिती मजबूत होईल. 
  शिक्षण : कामगिरी चांगली राहील; परंतु अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही. 
  आराेग्य : ताप, डाेकेदुखीचा त्रास जाणवेल. उजव्या पायास जखम शक्य. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीची नाराजी दूर होईल. वैवाहिक प्रस्ताव प्राप्त हाेतील. 
  व्रत : श्री दुर्गासहस्रनाम स्तोत्राचे पठण करा.

 • Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

  धनू 
  आठवड्याच्या प्रारंभी पैशांची आवक चांगली व स्थायी मालमत्तेतून लाभ. तसेच कुटुंबाचे सहकार्य मिळून वादग्रस्त प्रकरणांत यशाची प्राप्ती हाेईल. याशिवाय कायद्याच्या प्रकरणांत बाजू मजबूत होऊन बुध व गुरुवारी उत्तम कामगिरी कराल. कामांत उत्साह जाणवेल; परंतु शुक्र व शनिवार चिंतेचे राहतील. सांभाळून राहा. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात समस्या व अधिकारी त्रस्त करतील. 
  शिक्षण : अधिक कष्ट घेऊन अभ्यास कराल; परंतु काही अभाव जाणवेल. 
  आराेग्य : दातदुखी, नसा आखडणे व कंबरदुखीचा त्रास जाणवेल. 
  प्रेम : लग्नाचे प्रस्ताव प्राप्त होतील व वैवाहिक जीवन सुखमय राहील. 
  व्रत : श्री दुर्गामातेला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवा. 

 • Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

  मकर 
  खर्चाचे प्रमाण जास्त राहील; परंतु तशी व्यवस्थाही होईल. दिनचर्या अव्यवस्थित राहून आवश्यक कामांसाठी कर्जही घ्यावे लागू शकते. सहकार्य मिळेल; परंतु सावधही राहावे लागेल. अनाेळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका व वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. बांधकामावर खर्चाची शक्यता. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात अडचणी. प्रवास करावा लागू शकताे. 
  शिक्षण : अभ्यास व्यवस्थित चालेल व शिक्षकांकडून सहकार्य प्राप्त होईल. 
  आराेग्य : कंबर, पाठ व दाढ दुखेल. ताप व अपचनाचा त्रासही जाणवेल. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीतील तणाव दूर. वैवाहिक जीवनात अशांतता शक्य. 
  व्रत : श्री दुर्गामातेला लाल वस्त्र अर्पण करा. 

 • Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

  कुंभ 
  मंगळवार दुपारपर्यंत अडचणी येतील. तसेच अनावश्यक खर्च होऊन घरातही तणाव राहू शकताे. त्यानंतर गुरुवारपर्यंत वेळ चांगली. स्वत:वर नियंत्रण ठेवाल व पैशांची आवक सुधारेल. शुक्र व शनिवारी एखादी नवीन मालमत्ता खरेदीचा विचार हाेईल. याशिवाय लाभदायक व्यवहारांचीही प्राप्ती होईल. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात लाभ व नाेकरीत तणाव कायम राहील. 
  शिक्षण : वेळेनुसार कामे करू शकाल व संशाेधनाच्या कामात यश मिळेल. 
  आराेग्य : पाय, पंजे, कंबर, अपचन व मानदुखीचा त्रास हाेईल. 
  प्रेम : प्रेमात हाती निराश लागू शकते. जाेडीदाराकडून सहकार्य मिळेल. 
  व्रत : श्री दुर्गामातेला हलव्याचा नैवेद्य दाखवा. 

 • Weekly Horoscope 4 feb to 9 feb 2019 in Marathi

  मीन 
  आठवड्याची सुरुवात चांगली हाेईल व कामे वेगवान राहतील. तसेच अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. मंगळवारी संध्याकाळी मात्र वाद हाेऊ शकताे. बुध व गुरुवारी तणाव, पैशांची चणचण जाणवू शकते. मदतीची अपेक्षाही व्यर्थ जाऊ शकते. शुक्र व शनिवारी वेळ पुन्हा अनुकूल हाेत कामांत वाढ हाेईल. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय उत्तम चालेल व नाेकरीत लक्ष्यप्राप्ती होईल. 
  शिक्षण : नकारात्मकता दूर होऊन अभ्यासाची साधने उपलब्ध होतील. 
  आराेग्य : कीटक चावण्याची भीती. तसेच ताप व पाेटदुखीचा त्रास हाेईल. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीशी वाद संपेल. लग्न प्रस्ताव व जाेडीदाराकडून सुख. 
  व्रत : श्री दुर्गामातेला कच्च्या दुधाचा नैवेद्य दाखवा. 

Trending