Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

या 7 दिवसांमध्ये जुळून येणार 2 मोठे शुभ योग, सर्व राशींसाठी खास राहील हा आठवडा 

रिलिजन डेस्क, | Update - Aug 06, 2019, 12:20 AM IST

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील श्रावण मासातील पहिला आठवडा

 • Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

  5 ते 11 ऑगस्ट या काळात चंद्र कन्या राशीपासून धनु राशीपर्यंत जाईल. या काळात चंद्रावर मंगळाची दृष्टी पडत असल्यामुळे महालक्ष्मी योग जुळून येईल. यासोबतच काही दिवस चंद्र आणि बृहस्पती एकाच राशीमध्ये राहतील. यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग जुळून येत आहे. यामुळे या आठवड्यात 2 शुभ योगांचा प्रभाव सर्व राशींवर राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी आणि आणि बिझनेसमध्येही प्रगतीचे योग आहेत. याव्यतिरिक्त आठवड्याच्या शेवटी चंद्र धनु राशीमध्ये शनी आणि केतुसोबत असेल. यामुळे ग्रहण आणि विषयोग जुळून येत आहे. यामुळे आठवड्यातील शेवटचे दिवस काही राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतात.


  मेष
  आठवड्यात राशी स्वामी मंगळाची निम्न दशा समाप्त होईल. चंद्राची स्थिती तुमच्यासाठी अनुकूलता कायम ठेवू शकते. या आठवड्यात शुक्रवार आणि शनिवारी शेखी मारण्याच्या प्रयत्नात तुमच्याकडून एखादी गुप्त बाब प्रकट होऊ शकते. प्रवास आदी टाळण्याचा प्रयत्न करा.


  व्यवसाय : गुंतवणूक लालूच दाखवू शकते. त्यापासून सावध.
  शिक्षण : विषयांचा मुळापासून अभ्यासाची इच्छा. प्रयत्नात यश.
  आरोग्य : संततीच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे चिंतेत भर टाकू शकते.
  प्रेम : करिअरवर लक्ष असेल, वैवाहिक संबंधासाठी वेळ मिळू शकणार नाही.
  व्रत : शिव-पार्वती समान आई-बाबांचा आदर करा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

 • Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

  वृषभ 
  गुरूची दृष्टी आहे. चतुर्थातील चंद्रामुळे होणाऱ्या कामांत अडथळा येण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे नुकसान होणार नाही तरीही उशीर होण्याची शक्यता आहे. चंद्राची गती सुरुवातीस मंद राहील. मात्र, चंद्र बुधवारपासून प्रत्येक कामात गती देईल व आठवड्यात यश देणारा असेल. 


  व्यवसाय : नोकरीत सतर्क राहा. व्यापारात नवीन करार होतील. 
  शिक्षण : शिक्षकांकडून मदत शक्य.शैक्षणिक सहल. 
  आरोग्य : पोट व गळा दुखण्याची शक्यता. गळ्यात खवखव शक्य. 
  प्रेम : पती/पत्नीकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराशी संबंध घट्ट होतील. 
  व्रत : श्रीकृष्ण मंदिरात खडीसाखर दान करा. 

 • Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

  मिथुन 
  आत्मकेंद्रित राहाल. वैचारिक स्पष्टता राहील तसेच इतरांच्या बोलण्याने प्रभावित व्हाल. चंद्र आठवड्याच्या मध्यात साथ देणार नाही. यामुळे वेळ जास्त खर्च करू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीस व शेवटी उत्पन्नासाठी योग्य राहील. पाहुण्यांचे आगमन होईल. 


  व्यवसाय : शेती व जमिनीशी संबंधित कामांसाठी योग्य वेळ. 
  शिक्षण : अभ्यासात मन रमेल तसेच मित्रांचे सहकार्य मिळेल. 
  आरोग्य : मानसिक तणाव व डोकेदुखी. झोप पूर्ण होणार नाही. 
  प्रेम : पती/ पत्नीसोबत राहण्याची संधी मिळेल. जोडीदाराप्रति आदर राहील. 
  व्रत : महादेवासमोर सायं. दिवा लावा. 

 • Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

  कर्क 
  द्वितीयेतील चंद्र धन संचयात घट येऊ देणार नाही. कामाप्रति समर्पण राहील. जवळच्या लोकांची वागणूक विचलित करू शकेल. विरोधक आरोप लावण्याची संधी शोधतील. बुधवार-गुरुवार चांगले फळ देईल. शुक्रवारी दिवस सामान्य राहील. शनिवार-रविवारी कुटुंबासोबत राहाल. 


  व्यवसाय : बांधकामाच्या वस्तू विकणाऱ्यांसाठी आठवडा चांगला. 
  शिक्षण : अभ्यासाठी अनुकूल वातावरण . मित्रांसोबत राहाल. 
  आरोग्य : पोट, कंबर व गुडघ्यांिशिवाय कफाची समस्या. 
  प्रेम : पती/पत्नीसोबत मतभेद शक्य. वैवाहिक प्रस्ताव मिळतील. 
  व्रत : शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करा.

 • Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

  सिंह 
  चंद्राचा गोचर जुना त्रास समाप्त करेल तसेच नवीन मार्ग दिसेल. स्वकीयांसोबतचे अंतर समाप्त होईल तसेच सहकार्याची अपेक्षा पूर्ण होईल. योग्य मार्गदर्शन करणारे मिळतील. प्रतिष्ठित लोकांशी चर्चा होईल. आठवड्यात आनंददायक क्षण प्राप्त होण्याचे योग आहेत. 


  व्यवसाय : ज्येष्ठांकडून सहकार्य मिळेल, व्यापारात लाभ मिळेल. 
  शिक्षण : अभ्यासात मन लागेल. शिक्षकांपासून योग्य दिशा मिळेल. 
  आरोग्य : नसा आखडण्याची भीती. वाहनात काळजी घ्या. 
  प्रेम : प्रेमाचे प्रदर्शन करणे महागात पडेल. वैवाहिक सुख. 
  व्रत : गणपतीसमोर तुपाचा दिवा लावा. 

 • Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

  कन्या 
  वेळ समाधानकारक राहील. काम जास्त असेल, मात्र आनंदाने काम करण्याची क्षमताही राहील. चंद्र मंगळवारपासून राशीत गोचर करेल व अनुकूलतेत वाढ करेल. सहकार्य करणारे मिळतील व आनंदवार्ता मिळतील. धार्मिक स्थळावर जाण्याची संधी मिळेल. 


  व्यवसाय : नवीन नोकरीचा प्रस्ताव मिळेल. व्यापारात लाभ. 
  शिक्षण : अभ्यासातून मन भरकटेल. शैक्षणिक सहल शक्य. 
  आरोग्य : आईच्या प्रकृतीबाबत सतर्क राहा. पोटदुखी शक्य. 
  प्रेम : प्रेमसंबंधात तणाव शक्य. वैवाहिक सुखात घट राहील. 
  व्रत: शिवालयात खीरीचा नैवेद्य दाखवा.

 • Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

  तूळ 
  मंगळवारपासून दृष्टी राशी एकादश चंद्रामुळे प्रभावित राहील. आठवड्याची सुरुवात चांगली राहील,मात्र मध्यात काही अडथळे येऊ शकतात. इतरांवर विश्वास ठेवू नका. स्वप्रयत्नातून यश मिळेल. आठवड्यात स्थिती पुन्हा नियंत्रणात येईल. आर्थिक लाभात वाढ व आनंद मिळेल.

   
  व्यवसाय : शासकीय कामात अडथळा. नोकरीत काळजी घ्या. 
  शिक्षण : शिस्तभंग होऊ शकते. शिक्षक सुनावू शकतात. 
  आरोग्य : उंच ठिकाणी चढू नका. पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळा. 
  प्रेम : पती/पत्नी तुमच्याप्रति आदरभाव राहील. नवे मित्र तयार कराल. 
  व्रत : शिवाला सुगंधी फूल अर्पण करा. 

 • Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

  वृश्चिक 
  गुरूचा गोचर राशीत आहे. हा योग अकल्पनीय यश देईल. विरोधक पराभूत होतील व न्यायालयीन प्रकरणांत चांगली स्थिती निर्माण होईल. कार्यकुशलतेचा विकास होईल व यशाचा काळ राहील. व्यग्रताही जास्त राहील. राजकारण्यांना पद मिळण्याची शक्यता आहे. 


  व्यवसाय : व्यवसायासाठी बाहेर जावे लागेल. अधिकारी खुश. 
  शिक्षण : कष्टाचे फळ मिळेल व निकाल बाजूने लागेल. 
  आरोग्य : सर्दी, खरखर,डोकेदुखी व कंबरदुखी होऊ शकते. 
  प्रेम : आठवड्यात प्रेम प्रस्तावाला सकारात्मक उत्तर प्राप्त होण्याची शक्यता आहे. 
  व्रत : सोमवारी असहाय लोकांची मदत करा. 

 • Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

  धनू 
  उत्साहवर्धक व सुखकारक वेळ राहील. सगळीकडून अपेक्षा पूर्ण होतील व सृजनात्मक कामात आवड राहील. धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळेल व सन्मानही प्राप्त होईल. चंद्राची स्थिती पूर्ण आठवड्यात धनप्राप्ती कायम ठेवेेल. नव्या लोकांची भेट. 


  व्यवसाय : नवीन व्यापारी करार. नोकरीत उच्च प्रस्ताव मिळतील. 
  शिक्षण : संशोधन कामात आवड,विषयांचा खोलवर अभ्यास 
  आरोग्य : मूत्र विकार,अपचन शक्य. विजेपासून सावध. 
  प्रेम : प्रेमसंबंध अयशाच्या दिशेने जात आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. 
  व्रत : शिवाला चंदनमिश्रित जलाचे अर्घ्य द्या.

 • Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

  मकर 
  योग्य निर्णय घेण्यात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. स्वत:पेक्षा जास्त कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या आनंदाकडे लक्ष राहील. आज व उद्या वगळता चंद्र अनुकूल राहील. हा लाभदायक योग करत आहे. अडकलेला पैसा मिळेल. 


  व्यवसाय : नाेकरीत अपेक्षा पूर्ण होतील व व्यवसायासाठी प्रवासाचे योग आहेत. 
  शिक्षण : अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते. 
  आरोग्य : डाव्या पायाला दुखापतीची भीती, कंबरदुखी. 
  प्रेम : जाेडीदाराच्या बोलण्यावर लक्ष न दिल्यास वाद होऊ शकतो. 
  व्रत : विष्णूला तुळसी पत्र अर्पण करा.

 • Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

  कुंभ 
  पूर्ण चंद्राच्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात जोरदार होईल, मात्र मध्यात अनुकूलता प्राप्त होणार नाही. राशी स्वामी शनिची दृष्टी आहे. ही स्थिती काळजीपूर्वक वातावरण होऊ देणार नाही. कामात अनावश्यक अडथळे येण्याची शक्यता आहे. 


  व्यवसाय : अनपेक्षित कामे करावी लागतील. व्यवसाय विस्तार टाळा. 
  शिक्षण : स्वत:ला शिक्षकांच्या नजरेत चांगले सिद्ध करण्यात यश. 
  आरोग्य : आनंद राहील व कोणत्या प्रकारची भीती नसेल. 
  प्रेम : प्रेमसंबंधात प्रगल्भपणा येईल. या आठवड्यात नवीन मित्र मिळतील. 
  व्रत : ज्येष्ठांचा आदर करा व योग्य मदत करा.

 • Weekly Horoscope 5 to 11 august 2019 in Marathi

  मीन 
  चांगल्या कामासाठी प्रवृत्त व्हाल. वेळ अनुकूल राहील. बुधवारपासून सुख-शांततेचा अनुभव घ्याल तसेच प्रतिकूल लोक तुमच्या आसपास राहणार नाहीत. कर्जासंबंधी समस्यांचे समाधान मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. 


  व्यवसाय : नोकरीत शिस्तीचे पालन करा. 
  शिक्षण : पुस्तक व अन्य शैक्षणिक वस्तू सांभाळा. 
  आरोग्य : मूळव्याध असणाऱ्यांसाठी त्रासदायक. 
  प्रेम : पती/ पत्नीच्या बोलण्यावर लक्ष द्या व मनमानी केल्यास वाद उद्भवू शकतो. 
  व्रत : गरिबांना वस्त्र धान करा. 

Trending