आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 जानेवारीपर्यंत जॉब आणि बिझनेसमध्ये 7 राशीच्या लोकांना मिळू शकते नशिबाची साथ

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

6 ते 12 जानेवारी या काळात चंद्र मेषपासून कर्क राशीपर्यंत जाईल. या दिवसांमध्ये चंद्रावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे महालक्ष्मी योग जुळून येईल. याचा फायदा अनेक लोकांना होईल. या शुभ योगाच्या प्रभावाने 7 राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीत नशिबाची साथ मिळण्याची शक्यता. यासोबतच प्रगतीची संधी मिळू शकते. या आठवड्यात ग्रह-ताऱ्यांच्या खास स्थितीचा फायदा 7 राशीच्या लोकांना मिळेल तसेच इतर 5 राशीच्या लोकांसाठी काळ संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

 • मेष

चंद्राचे गाेचर तुमच्या कामात वाढ करण्याची शक्यता आहे तसेच उत्पन्नात सुधारणा हाेईल. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल तसेच रखडलेली कामे मार्गी लागण्यासाठी वेग येईल. शुक्रवारी आणि शनिवारी तुमचा माेलाचा वेळ वाया जाण्याबराेबरच आर्थिक हानीदेखील हाेण्याची शक्यता आहे. नकाे त्या कामात श्रम खर्च हाेईल.

व्रत : शुक्रवारी शाकंभरी मातेला दूध अर्पण करा.

 • वृषभ

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहणार नाही. कामामध्ये अडचणी निर्माण हाेतील तसेच तुमचे कामात मन लागणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपासून चांगले वाटू लागेल. सर्व कामे वेळेनुसार हाेतील. उत्पन्नात चांगली वाढ हाेईल. बुधवारी सकाळी वादविवाद हाेेण्याची शक्यता आहे. गुरुवारच्या दिवशी सर्व व्यवहार संभाळून करा.

 • मिथुन

सुर्य, बुध, गुरू, शनी, केतू आणि मंगळाची तुमच्यावर दृष्टी आहे. चंद्राचे गाेचर द्वादश असल्याने बुधवारपासून तुम्हाला कामात काही प्रमाणामध्ये दिलासा मिळेल. अज्ञात व्यक्तीचे भय राहील. उत्पन्न कमी हाेण्याचा त्रास सतावेल. कुटुंबाशी वैचारिक मतभेद हाेऊ शकतात. नवीन कामाबद्दल उदासीनता वाटेल.

व्रत : शुक्रवारी शाकंभरी मातेला तिळ तेल दिवा लावा.

 • कर्क

दशमेतील चंद्राचे गाेचर तुम्हाला कार्यामध्ये यश मिळवून देईल आणि अडचणी समाप्त हाेतील. उत्पन्नही चांगले राहील. बुधवार आणि गुरुवार तुमच्यासाठी समस्यांचा दिवस ठरू शकताे. वादविवाद आणि कर्जाबाबतच्या समस्या निर्माण हाेऊ शकतात. शुक्रवारी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

व्रत : शुक्रवारी शाकंभरी मातेला केळ अर्पण करा.

 • सिंह

गुरुच्या दृष्टीमुळे दिलासा मिळाला आहे. चंद्राचे गाेचर अनुकूल असल्याने प्रतिष्ठा वाढण्याबराेबर प्रवासासाठी जावे लागण्याची शक्यता आहे. उत्पन्न चांगले राहील व कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. शुक्रवारी सतर्क राहा, जखम हाेऊ शकते. शुक्रवारी आणि शनिवारी पैशाची कमी तसेच वादविवाद हाेण्याची शक्यता आहे.

 • कन्या

तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. उत्पन्न चांगले राहील. सर्व कामे वेळेवर पूर्ण हाेतील. भावांचे सहकार्य मिळेल. शनीची दृष्टी असल्याने न्यायालयात आलेल्या अडचणी समाप्त हाेतील. राजकारण्यांना पदाचा लाभ हाेण्याची शक्यता आहे. कर्जाच्या समस्येतून मुक्ती मिळेल आणि मुलांकडून सुख मिळेल.

व्रत : शुक्रवारी शाकंभरी मातेला हळद अर्पण करा.

 • तूळ

चंंद्राची दृष्टी राशीवर आहे. धनलाभासह तुम्ही अधिक कार्य कराल. तुमचे मन प्रसन्न राहील. मंगळवारी संध्याकाळपासून तुमच्या अडचणींमध्ये वाढ हाेण्याची शक्यता आहे. बुधवारी नकारात्मकता जास्त हाेऊ शकते. गुरुवारपासून स्थिती नियंत्रणात येईल. माेठ्या कामात आणखी अग्रेसर राहाल.

व्रत : शुक्रवारी शाकंभरी मातेची कापूर आरती करा

 • वृश्चिक

तुमच्या अडचणींचा अंत हाेण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. उत्पन्नात सुधारणा तसेच अडकलेली काम सुटण्याच्या कामाला वेग येईल. भविष्याबद्दल आशावादी राहाल व सहकार्य मिळण्यास सुरुवात हाेईल. भाग्याचेही सहकार्य मिळेल. नाराज झालेल्यांचे मन वळवण्यात यशस्वी व्हाल.

व्रत : शुक्रवारी शाकंभरी मातेला खीर अर्पण करा.

 • धनू

सूर्य, बुध गुरू, शनी-केतूची युती, पंचमेतील चंद्राचा गाेचर आहे. मतभेद दूर हाेतील आणि उत्पन्नात सुधारणा हाेईल. मदत मिळेल आणि गुरुवारी संध्याकाळपासून अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी आणि शनिवारी मन खिन्न राहील आणि उत्पन्न कमी हाेण्याबराेबरच तुमचा अनावश्यक खर्च हाेण्याची शक्यता आहे.

व्रत : शुक्रवारी शाकंभरी मातेले कुंकू, रक्तपुष्प वाहा.

 • मकर

चतुर्थ स्थानातील चंद्र कमी उत्पन्न व अडचणी निर्माण करू शकताे. साेमवारी सकाळपासून कामाला वेग येईल व तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. वादग्रस्त प्रकरणात विजय मिळेल. आठवड्यामध्ये चंद्राच्या दृष्टीमुळे माेठा लाभ हाेण्याची शक्यता आहे.

व्रत : शुक्रवारी शाकंभरी मातेची गुग्गुळ आरती करा.

 • कुंभ

शुक्राचे गाेचर आणि चतुर्थेतील चंद्राच्या गाेचरमुळे भय आणि चिंता राहू शकते. जवळचेच लाेक तुम्हाला धाेका देऊ शकतात. बुधवारपासून उत्पन्नात सुधारणा हाेईल तसेच सहकार्य मिळेल. भविष्याबद्दल साशंक राहाल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुमची बाजू कमजाेर पडू शकते.

व्रत : शुक्रवारी शाकंभरी मातेला खीरपुरी अर्पण करा.

 • मीन

तुमच्या पराक्रमात वाढ हाेईल. भावाकडून सहकार्य मिळेल. कायमस्वरूपी मालमत्ता खरेदी करण्याची योजना बनू शकते. प्रतिष्ठा वाढेल आणि उत्पन्न चांगले राहील. गुरुवारी समस्यांचा सामना करावा लागू शकताे. शुक्रवार पुन्हा चांगला जाईल.

व्रत : शुक्रवारी शाकंभरी समाेर चमेली तेल दिवा लावा.

बातम्या आणखी आहेत...