Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

साप्ताहिक राशिभविष्य : 13 जानेवारीपर्यंत 12 पैकी 5 राशींच्या लोकांना मिळू शकते भाग्याची साथ

रिलिजन डेस्क | Update - Jan 07, 2019, 12:02 PM IST

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दोन वेळेस राशी बदलणार चंद्र, मेष राशीच्या लोकांना होऊ शकतो धन लाभ, वृश्चिक राशीसाठी सामान्

 • saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

  जानेवारी 2019 चा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातील चंद्र मकर राशीमध्ये राहील आणि त्यानंतर 9 जानेवारीला कुंभमध्ये आणि पुन्हा 11 तारखेला मीन राशीमध्ये जाईल. या आठवड्यात चंद्राच्या स्थितीमुळे काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याउलट काही लोक यशस्वी होतील. येथे जाणून घ्या, 12 राशींसाठी 7 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंतचा काळ कसा राहील.


  मेष
  नवव्या चंद्रामुळे काळ लाभदायक राहील. चिंता कमी होतील व वस्त्र-आभूषणांतून लाभ होईल. नव्या फायदेशीर योजनांची प्राप्ती. मुले सर्व प्रकारे अनुकूल राहतील व कर्जातून मुक्त हाेण्याचे प्रयत्न वेगवान हाेतील. भावांचे सहकार्य मिळेल. शुक्र व शनिवारी मात्र सतर्क राहावे लागेल.

  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात प्रवास यशस्वी. नाेकरीत कामे वाढतील.
  शिक्षण : वरिष्ठ व शिक्षक सहकार्य करतील व अभ्यासाकडे कल राहील.
  आराेग्य : विजेची उपकरणे, आग व वाहनादी चालवताना सावध राहा.
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीकडून उपेक्षा हाेऊ शकते. वैवाहिक जीवनात प्रेम कमी.
  व्रत : श्री शिव-पार्वतीचे दर्शन घेऊन दिवा लावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

 • saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

  वृषभ 
  शुक्र-गुरूची सप्तम व पूर्ण दृष्टी लाभदायक ठरेल. आठव्या चंद्रामुळे मात्र काही खराब सुरुवात हाेऊ शकते; परंतु मंगळवारनंतर वेळ अनुकूल राहून नवीन संबंधातून लाभ होईल; परंतु क्रोधही वाढेल. वाहनसुखाची प्राप्ती. शुक्र व शनिवार सर्वात चांगले दिवस ठरतील. तसेच धनलाभ हाेईल. 


  नाेकरी व व्यवसाय : नाेकरीत नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. 
  शिक्षण : शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्यांना यश मिळेल. 
  आराेग्य : नसा आखडतील. तसेच पाइल्स, गुडघे व उजवी दाढ दुखेल. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीकडून अचानकपणे दु:खद गाेष्टी शक्य. 
  व्रत : श्री संकटमोचन हनुमानाष्टक पठण करा 

 • saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

  मिथुन 
  सूर्य, बुध, शनी, मंगळ व चंद्राची दृष्टी असून, हा योग यश आणि आनंद मिळवून देणारा ठरेल. आठवड्याच्या मध्यात आठव्या चंद्रामुळे पैशांसंबंधीच्या अडचणी येऊ शकतात. त्या गुरुवारपासून संपतील. मित्रांचे सहकार्य मिळेल व सुखद वार्ता कळतील. शुक्रवार व शनिवार शुभ फलदायक ठरतील. 


  नाेकरी व व्यवसाय : शिक्षक, ट्यूटर आदींसाठी सर्व प्रकारे चांगला काळ. 
  शिक्षण : शिक्षणांतर्गत नवनवे ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळेल. 
  आराेग्य : अपचन व पाेटदुखीचा त्रास हाेऊ शकताे. 
  प्रेम : प्रेमात यश मिळेल व वैवाहिक जीवन सुखमय राहील. 
  व्रत : श्रीराधा-कृष्णाला लाेण्याचा नैवेद्य दाखवा. 

 • saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

  कर्क 
  गुरूच्या नवव्या दृष्टीमुळे राशी प्रभावी आहे. त्यामुळे सन्मान व धनप्राप्ती होऊन गतकाळातील समस्यांपासूून मुक्ती मिळवण्याची संधी मिळेल. गुरुवारी व शुक्रवारी बांधकाम आदीवर खर्च हाेण्याची, कुुटुंबाशी वैचारिक मतभेदांची व शनिवारचा दिवस सुखद राहण्याची शक्यता आहे. 


  नाेकरी व व्यवसाय : नवीन व्यापार, उद्योग सुरू करण्याची संधी मिळेल. 
  शिक्षण : लक्ष्य गाठण्यात यशस्वी व्हाल व मित्रांचे सहकार्य मिळेल. 
  आराेग्य: डाेकेदुखी, डाेळ्यांचा व आळसाचा त्रास हाेऊ शकताे. 
  प्रेम : कुटुंबात सामंजस्य राहील व वैवाहिक जीवनात सुख मिळेल. 
  व्रत : शिव मंदिरात किंवा गुरूंना वस्त्रदान करा. 

 • saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

  सिंह 
  पाचवा चंद्र व राशीचे गोचर पराक्रमात असल्याने स्वत:च्या कामांतून सर्वांना आनंदी ठेवण्यात यश मिळेल. यशासाेबत पदाेन्नती मिळण्याच्या प्रयत्नांत यशस्वी व्हाल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. शुक्रवारी शुभवार्ता मिळण्याची चिन्हे आहेत. शनिवारी सावधगिरी बाळगावी लागेल. चोरीची भीती असेल. 


  नाेकरी व व्यवसाय : नाेकरीत कामे वाढतील. व्यवसायात लाभाची शक्यता. 
  शिक्षण : अभ्यासासाठी वेळ कमी पडेल. मन विचलित हाेऊ शकते. 
  आराेग्य : खांदे व पाठदुखीचा त्रास हाेण्यासह ठोकर लागण्याची शक्यता. 
  प्रेम : निकटवर्तीयांशी नाराजीची शक्यता; परंतु मनभेद हाेणार नाही. 
  व्रत : श्री शंकराला बिल्वपत्रे व जल अर्पण करा. 

 • saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

  कन्या 
  शनी व मंगळाच्या दृष्टीसह चाैथा चंद्र. त्यामुळे मंगळवारनंतर सर्व बाजूंनी शुभवार्तांसह यश मिळेल. वादाची व कायदेशीर प्रकरणे साेडवण्यातही यशस्वी व्हाल. तसेच नातेवाइकांकडून चांगले वृत्त कळेल. शुक्रवार व शनिवार हे आठवड्यातील सर्वात चांगले दिवस सिद्ध हाेतील. 


  नाेकरी व व्यवसाय : नाेकरीत पदाेन्नती व पगारवाढ हाेईल. नवा व्यवसाय नकाे. 
  शिक्षण : अभ्यासासाठी याेग्य वेळ मिळून चांगले परिणाम समाेर येतील. 
  आराेग्य : ताेंड येणे, जिभेला जखम हाेऊन दातदुखीचा त्रास हाेऊ शकताे. 
  प्रेम : कुटुंब अनुकूल राहील. प्रेमात पुढे जाण्यापूर्वी विचार करणे गरजेचे. 
  व्रत : श्रीगणेशाला दूर्वा, कुंकू व जल अर्पण करा.

 • saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

  तूळ 
  मंगळाची पूर्ण आठवी दृष्टी व तृतीय चंद्राने आठवडा सुरू हाेईल. त्यामुळे कोणतीही समस्या येण्याची शक्यता नाही. वादांपासूनही दूर राहाल. मंगळ व बुधवार साेडून इतर काळ पैशांच्या आवकबाबत चांगला राहील. मुले व कुटुंबाकडून सुख मिळेल. शुभवार्ता व नवीन कपडे मिळतील. 


  नाेकरी व व्यवसाय : गुंतवणुकीतून लाभ मिळेल. नाेकरीत पदाेन्नतीचे याेग. 
  शिक्षण: चांगले परिणाम समाेर येतील व विद्यास्थळ पूर्णत: अनुकूल राहील. 
  आराेग्य : रक्तदाब व मधुमेह झालेल्यांचा त्रास जास्त वाढू शकताे. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीपासून वियोग व वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकताे. 
  व्रत : श्री हनुमंताला प्रसाद अर्पण करा. 

 • saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

  वृश्चिक 
  दुसरा चंद्र व शुक्र-गुुरूचे गोचर असल्याने या काळात पैशांची आवक तर हाेईल; परंतु कसली तरी अज्ञात चिंता सतावू शकते. तसेच गुरुवारी व शुक्रवारी त्रास वाढू शकताे. शनिवारी सकाळपासून वेळेत सुधारणेची आशा दिसेल व वादग्रस्त प्रकरणांत यश मिळण्याची शक्यता आहे. 


  नाेकरी व व्यवसाय : गुंतवणुकीपासून दूर राहा. अनाेळखींवर विश्वास नकाे. 
  शिक्षण : शिस्तीबाबत सावध राहा व कुणालाही कटू बाेलू नका. 
  आराेग्य : दात व हाडदुखीचा त्रास हाेण्याची शक्यता आहे. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीचे बाेलणे मन दुखावणारे ठरू शकते. 
  व्रत : श्रीगणेशाला गहू किंवा इतर धान्य अर्पण करा. 

 • saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

  धनू 
  सूर्य, शनी, बुध व चंद्राचे गोचर राहील. हा योग साहसी कामगिरी करवून घेईल व त्यात यशही मिळेल. नवा दृष्टिकाेन राहून वेळ उत्साहपूर्ण राहील. माेठ्या समस्यांचा सामना करण्यात यश. सरकारी यंत्रणेपासून हाेणारा अनावश्यक त्रास संपेल. शनिवारी सकाळपासून सावध राहावे लागेल. 


  नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात लाभ कमी. नाेकरीत तणाव वाढेल. 
  शिक्षण : चांगली माहिती मिळेल व शिक्षकही अनुकूल राहतील. 
  आराेग्य : उजवा हात दुखू शकताे व मानदुखीचा त्रास हाेण्याची शक्यता. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसी अनुकूल राहील. वैवाहिक प्रस्ताव प्राप्त हाेतील. 
  व्रत : श्रीलक्ष्मी-नारायणाचे दर्शन घेऊन दिवा लावा.

 • saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

  मकर 
  राहूची दृष्टी, केतूचे गोचर व बाराव्या चंद्रासाेबत आठवडा सुरू हाेईल. त्यामुळे प्रारंभी चिंता वाढण्याची शक्यता आहे. तथापि, सोमवार संध्याकाळपासून वेळ पूर्णपणे अनुकूल राहील. प्रसन्नता वाढेल व यश मिळेल. मंगळ व बुधवारी धनलाभ. गुरुवारचा दिवस प्रवासात जाईल. 


  नाेकरी व व्यवसाय : उत्पन्नाचे स्रोत वाढतील व नाेकरीत यश मिळेल. 
  शिक्षण : सहकाऱ्यांसाेबत वेळ जाईल व अभ्यास चांगल्या प्रकारे सुरू राहील. 
  आराेग्य : मन आनंदी राहील व जुन्या रोगांत सुधारणा होईल. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीसाेबत भटकंतीला जाल व वैवाहिक सुख मिळेल. 
  व्रत : भगवान शंकराला कच्चे दूध-दही अर्पण करा. 

 • saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

  कुंभ 
  राशिस्वामी शनीची पूर्ण दृष्टी व अकराव्या चंद्राचे गोचर. त्यामुळे आज संध्याकाळपासून गाेंधळाच्या स्थितीची अनुभूती येईल. सक्षमता राहील; परंतु अडचणीही जास्त राहतील. धार्मिक कामांत मन लागेल व प्रभाव कायम राहील. सोम व मंगळवार साेडून इतर वेळी पैशांची आवक चांगली. 


  नाेकरी व व्यवसाय : गुंतवणूक व उधार देण्या-घेण्यासह जोखीम नकाे. 
  शिक्षण : साधनांचा अभाव जाणवू शकताे. तसेच शिक्षकांचे असहकार्य. 
  आराेग्य : अंगदुखीचा त्रास हाेऊ शकताे. तथापि, स्फूर्तिवान राहाल. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसी पूर्णत: अनुकूल व वैवाहिक जीवन उत्तम राहील. 
  व्रत : श्री हनुमंतासमाेर तेलाचा दिवा लावा. 

 • saptahik rashifal Weekly Horoscope 7 to 13 january 2019 in Marathi

  मीन 
  मंगळाचे गोचर व गुरूची दृष्टी राहील. तसेच दहाव्या चंद्रामुळे विविध चिंता सतावतील व कामांत मन लागणार नाही. क्राेधाचे प्रमाणही जास्त असेल; परंतु मंगळवारपासून वेळेत सुधारणा हाेऊन स्थिती नियंत्रणात येईल. राजकीय तज्ञांसाठी हा काळ यशाचा राहील. 


  नाेकरी व व्यवसाय : कार्यस्थळी गाेंधळाची स्थिती शक्य. पैसे देऊ नका. 
  शिक्षण : करिअरसाठीचे अनेक प्रस्ताव गाेंधळात टाकू शकतात. 
  आराेग्य : पायाचे पंजे दुखू शकतात व पाेटाचा त्रास जाणवेल. 
  प्रेम : प्रियकर-प्रेयसीसाेबत वेळ जाईल व वैवाहिक जीवनात कटुता संपेल. 
  व्रत : श्री दुर्गामातेला गाेड भाताचा नैवेद्य दाखवा. 

Trending