Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

सर्व 12 राशींसाठी कसा राहील 14 एप्रिलपर्यंतचा काळ, कोणाला होणार धनलाभ 

रिलिजन डेस्क | Update - Apr 09, 2019, 12:01 AM IST

11 एप्रिलला बुध बदलणार राशी आणि गुरु ग्रह आपली चाल, मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक राहील हा आठवडा, कन्या राशीच्या लोकांच

 • weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

  या आठवड्यात बुध ग्रह राशी परिवर्तन करत आहे. बुध 11 एप्रिलला कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करेल. गुरु ग्रह 11 एप्रिललाच धनु राशीमध्ये वक्री होईल. चंद्र आठवड्याच्या सुरुवातील मेष राशीमध्ये प्रवेश करेल. 8 तारखेला वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल, 10 तारखेला मिथुन आणि 12 तारखेला कर्क राशीमध्ये. या आठवड्यात म्हणजे 7 ते 14 एप्रिलपर्यंत चैत्र मासातील नवरात्र राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी कसे राहतील हे 7 दिवस...


  मेष
  आठवडाभराचा काळ आनंददायक राहील. उत्पन्न चांगले राहण्याबरोबरच सहकार्यही मिळेल. सर्वे कामे वेळेवर होतील. मित्रांच्या भेटी होतील आणि कायदेशीर प्रकरणांतही यश मिळेल. गुरुवारी-शुक्रवारी कामगिरी चांगली राहील. भावांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. शनिवारी मन उदास राहील. खर्च वाढल्याने चिंतेत थोडी भर पडेल.


  व्यवसाय: व्यापारात तेजी राहील. नोकरीत बढतीच्या संधी मिळतील.
  शिक्षण: निकाल चांगला लागेल. अभ्यासात पुढे राहाल.
  आरोग्य: दोन कानांत वेदना, डोकेदुखी, तणाव जास्त. मानदुखीचा त्रास.
  प्रेम: साथीदाराकडून सहकार्य आणि वैवाहिक संबंध दृढ होतील.
  व्रत : कालीमातेला लाल फूल अर्पण करा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसे राहतील हे 7 दिवस...

 • weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

  वृषभ 
  आज व उद्या त्रास जाणवेल. अनावश्यक खर्च होतील, वादविवाद होतील. इतरांकडून सहकार्य मिळणार नाही. मंगळवारपासून काळ तुमच्या बाजूने असेल. उत्पन्नात वाढ होईल. योजना यशस्वी होतील. गुरुवारी प्रवासाचा आणि मंगलकार्याचा योग. आठवड्याच्या अखेरीस कुटुंबाचे सहकार्य मिळेल. धनलाभाच्या संधी आहेत. 


  व्यवसाय : व्यापारात मंदी राहील. नोकरीत अडचणी येऊ शकतात. 
  शिक्षण : शिक्षणाच्या संसाधनांची कमतरता. शिक्षक अनुकूल नसतील. 
  आरोग्य : ताप, कान, डोळ्यांची समस्या. पायात, डाव्या खांद्यात वेदना. 
  प्रेम : वैवाहिक जीवनात तणाव आणि प्रेमात निराशा मिळण्याची शक्यता. 
  व्रत : कालीमातेला गहू अर्पण करा. 

 • weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

  मिथुन 
  या आठवड्यात उत्पन्न चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योगही आहेत. काम जास्त असेल, पण सहकार्यही मिळेल. मंगळवारी आणि बुधवारी दु:खद घटनांच्या बातम्या मिळतील आणि मन अस्वस्थ राहील. हा काळ सांभाळून राहण्याचा आहे. त्यानंतरच्या काळात मात्र कुठलीही अडचण जाणवणार नाही. 


  व्यवसाय : व्यापारात अस्थैर्य, नोकरीत अधिकारी नाराज होऊ शकतात. 
  शिक्षण : अध्ययन अभ्यासात पुढे राहाल. वर्गात स्तुती होईल. 
  आरोग्य : पाय, पाऊल, सांधेदुखी, पोटात वेदना, मूळव्याधीची समस्या. 
  प्रेम : साथीदाराची नाराजी दूर होईल. वैवाहिक प्रस्ताव मिळतील. 
  व्रत : कालीमातेला शिऱ्याचा नैवेद्य दाखवा. 

 • weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

  कर्क 
  आठवड्याच्या प्रारंभी कामे जास्त असतील. वडिलांकडून सहकार्य मिळेल. मंगळवारी आणि बुधवारी उत्पन्नात वाढ होईल आणि यश मिळेल. गुरुवारी प्रवासाचे योग आहेत. शुक्रवारी तणावाचे वातावरण असू शकते. खर्च वाढतील. वादविवाद वाढतील. शनिवारी काळ अनुकूल असेल. संध्याकाळपर्यंत यश मिळेल. 


  व्यवसाय : व्यापार सामान्य राहील. नोकरीत तणाव कमी होणार नाही. 
  शिक्षण : अभ्यासातील सातत्य कमी होईल. संसाधनांची चणचण भासेल. 
  आरोग्य : डोळे, कान, डोक्यात वेदना.सर्दी, पडसे होऊ शकते. 
  प्रेम : प्रेम प्रस्तावात अपयश येईल. जोडीदारासोबतचा वाद संपेल. 
  व्रत : कालीमातेला ज्वारी अर्पण करा. 

 • weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

  सिंह 
  या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल. तुमचा प्रभाव वाढेल आणि इतरांचे सहकार्यही मिळेल. उत्पन्न चांगले राहील. कायदेशीर प्रकरणांत यश मिळेल. विरोधकांवर तुमचा वचक राहील. गुरुवारी आणि शुक्रवारी काळ सर्वात चांगला राहील. शनिवारी काही चिंता सतावू शकतात. अपत्याशी वाद होण्याची शक्यता आहे. 


  व्यवसाय : व्यापार चांगला राहील. नोकरीत कामगिरी सर्वांत चांगली राहील. 
  शिक्षण : अभ्यासासाठी वातावरण मिळेल. पुढे जाण्याची इच्छा राहील. 
  आरोग्य : जखम होण्याची भीती. उंच ठिकाण, विजेपासून सावध राहा. 
  प्रेम : प्रेमात सुखद अनुभूती राहील.जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. 
  व्रत : कालीमातेला लाल वस्त्र अर्पण करा. 

 • weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

  कन्या 
  आज आणि उद्या अडचणींशी सामना करावा लागू शकतो. मंगळवारी सकाळपासून तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. कामांना गती मिळेल. उत्पन्नातही वाढ होईल. गुरुवारी आणि शुक्रवारी सहकार्य मिळेल. तुम्हाला वादविवादात विजय प्राप्त होईल आणि योग्य सल्ला मिळेल.शनिवारी अचानक धन लाभ होऊ शकतो. 


  व्यवसाय : व्यापारात निराशेचे वातावरण. नोकरीत समस्या जाणवतील. 
  शिक्षण : संसाधनांची कमतरता जाणवेल. तणाव जास्त राहील. 
  आरोग्य : कफ, सर्दी, त्वचेची अॅलर्जी. एखादा किडा चावू शकतो. 
  प्रेम : जोडीदाराशी मतभेद होतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य राहील. 
  व्रत : कालीमातेला पांढरे फूल अर्पण करा. 

 • weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

  तूळ 
  आज आणि उद्याचा दिवस चांगला जाईल. इतरांचे सहकार्य मिळेल आणि उत्पन्नही चांगले राहील. 
  अपत्यापासून सुख मिळेल. मगंळवारी आणि बुधवारी चिंतेत वाढ होईल. वादविवादापासून दूर राहा. खर्चही वाढतील. गुरुवारी आणि शुक्रवारी जुन्या मित्रांची भेट होईल, त्यांच्याकडून सहकार्य मिळेल. शनिवारी सुधारणा होईल. 


  व्यवसाय : व्यापार चांगला राहील. नोकरीत तणाव जास्त असेल. 
  शिक्षण : अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. सहकार्याची अपेक्षा व्यर्थ. 
  आरोग्य : मानेत वेदना आणि चेहऱ्यावर फोड येऊ शकतात. जखमेची भीती. में 
  प्रेम : जोडीदाराशी भेट होईल. वैवाहिक जीवनात सुख राहील. 
  व्रत : कालीमातेला मधाचा नैवेद्य अर्पण करा. 

 • weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

  वृश्चिक 
  या आठवड्यात उत्पन्नानुसार काळ चांगला राहील. पण अज्ञात भीती चिंतेत वाढ करेल. विरोधक तुमच्या मागे लागतील. मंगळवारी आणि बुधवारी प्रभावात वाढ होईल आणि कार्यशैलीत सुधारणा होईल. गुरुवारी आणि शुक्रवारी पुन्हा अडचणी येऊ शकतात. शनिवारी थोडासा दिलासा मिळेल. कुटुंबीयांचेही सहकार्य मिळेल. 


  व्यवसाय : व्यापारात किरकोळ सुधारणा होईल. नोकरीत दबाव राहील. 
  शिक्षण : आधीच्या मेहनतीमुळे चांगले परिणाम. अभ्यासात मन लागेल. 
  आरोग्य : दातात वेदना. ओठावर जखम. पाठ, कमरेत वेदना जाणवतील. 
  प्रेम : जोडीदाराचा वियोग. अविवाहित व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. 
  व्रत : कालीमातेला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. 

 • weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

  धनू 
  या आठवड्यात अपत्याकडून सहकार्य-सुख मिळेल. उत्पन्न चांगले राहील. नशीबही तुम्हाला साथ देईल. कामांत सुधारणा होतील. आध्यात्मिक कामांत आवड निर्माण होईल. प्रवासाचे योग आहेत. गुरुवार आणि शुक्रवार हे उत्तम दिवस राहतील. शनिवारी सांभाळून राहावे लागेल. शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात. 


  व्यवसाय : गुंतवणुकीत नुकसान शक्य. नोकरीत सांभाळून काम करा. 
  शिक्षण : विदेशात जाऊन शिकण्याची इच्छा पूर्ण होईल. अभ्यास चांगला. 
  आरोग्य : अॅलर्जी, पोट, डोळ्यात जळजळ होईल. डाव्या कानात वेदना. 
  प्रेम : जोडीदाराची नाराजी दूर होईल. जीवनसाथीकडून सुख मिळेल. 
  व्रत : कालीमातेला गूळ व चण्याचा नैवैद्य दाखवा. 

 • weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

  मकर 
  मन उदास राहील. लपवण्यासारख्या गोष्टी बाहेर येऊ शकतात. खर्च वाढेल. तणाव राहील. मंगळवारपासून आराम मिळेल. बुधवारी विरोधक शांत होतील. नंतरच्या दिवसांत तुम्हाला स्वत:ला सुरक्षित वाटेल. उत्पन्नात सुधारणा होईल. सहकार्य मिळेल. 


  व्यवसाय : व्यापार सामान्य राहील. नोकरीत अधिकारी संतुष्ट राहतील. 
  शिक्षण : गणित-विज्ञान विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली. इतरांना संघर्ष. 
  आरोग्य : कानात वेदना, कफाची समस्या. अपचन, मूळव्याधीची समस्या. 
  प्रेम : जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.वैवाहिक जोडीदाराकडून बक्षीस मिळेल. 
  व्रत : कालीमातेला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. 

 • weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

  कुंभ 
  मंगळवारी, बुधवारी सतर्क राहावे लागेल. कोणाची थट्टा करू नका. अपत्य व मुलांकडे लक्ष ठेवा. अपमानही होऊ शकतो, संयम राखा. त्याआधी आणि नंतरच्या काळात उत्पन्न चांगले राहील. कामात लक्ष लागेल. दक्षिण दिशेला प्रवासाचे योग आहेत. योजना यशस्वी होतील. 


  व्यवसाय : व्यापारात प्रगती, नोकरीत कनिष्ठांकडून अडचणी येतील. 
  शिक्षण : शिक्षक अनुकूल राहतील. पुढील तयारीवर भर राहील. 
  आरोग्य : ठेच लागणे किंवा पायात वेदना शक्य. लोखंडापासून जखम शक्य 
  प्रेम : प्रेम प्रस्ताव यशस्वी होतील. वैवाहिक संबंधांत अडचणी येतील. 
  व्रत : कालीमातेला गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करा. 

 • weekly horoscope 7 to 14 april 2019 in Marathi

  मीन 
  मनाप्रमाणे काम यशस्वी होईल. उत्पन्न चांगले राहील. भावांकडून सहकार्य मिळेल. नव्या कामाचे प्रस्ताव मिळतील. गुरुवार आणि शुक्रवार प्रतिकूल आहे. हे दोन दिवस सतर्क राहा. मोठे काम टाळा. शनिवार पुन्हा सुख देणारा असेल. लहान प्रवासाचा योग आहे. 
   

  व्यवसाय : व्यापारात प्रगती होईल. नोकरीत अडचणी दूर होतील. 
  शिक्षण : स्वत:कडे लक्ष देऊ शकाल. अभ्यासात मन लागेल. 
  आरोग्य : अपचन, कफाची समस्या. धारदार वस्तूने जखमेची शक्यता. 
  प्रेम : जोडीदाराचे वागणे अयोग्य राहील. वैवाहिक जीवनात समाधान. 
  व्रत : कालीमातेला शिरा-पुरीचा नैवेद्य अर्पण करा.

Trending