Weekly Horoscope / साप्ताहिक राशिफळ : 8 ते 14 जुलैपर्यंतचा काळ 6 राशीच्या लोकांसाठी नाही ठीक, इतर 6 राशींसाठी खास राहील हा आठवडा 

साप्ताहिक राशिफळ : 12 राशींसाठी काहीसा असा राहील हा काळ

दिव्य मराठी

Jul 09,2019 12:05:00 AM IST

8 ते 14 जुलै दरम्यान चंद्र मिथुन राशीपासून कन्या राशीपर्यंत जाईल. गोचर कुंडलीतील चंद्राच्या या स्थितीमुळे कर्क, सिंह, तूळ, मकर, वृषभ, मिथुन राशीचे लोक अडचणीत येऊ शकतात. या 6 राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ठीक नाही. या आठवड्यतील ग्रह-ताऱ्यांच्या अशुभ स्थितीमुळे या राशीच्या लोकांचे काम बिघडू शकते आणि धनहानी होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त कन्या, वृश्चिक, धनु, कुंभ, मीन आणि मेष राशीचे लोक ग्रह-ताऱ्यांच्या अशुभ प्रभावापासून दूर राहतील. या 6 राशीच्या लोकांसाठी 7 दिवस शुभ राहतील.


मेष
गुरू आठव्या स्थानी व राशी स्वामी मंगळाच्या नीचेचा आहे. आठवड्याच्या सुरुवातीस संघर्ष करावा लागू शकतो. सोमवारपासून अनपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. शब्दास वजनही प्राप्त होईल. व्यवस्थापन कौशल्याचा विकास होईल. कोर्टकज्ज्यांत यश मिळेल.


व्यवसाय : नवीन व्यवसाय शुभ ठरेल. नोकरीत यश मिळेल.
शिक्षण : योग्यता उत्तम राहील. साधनांचा सदुपयोग कराल.
आरोग्य : खोकला वा पोटदुखी उद्भवू शकते. स्वच्छ पाणी प्यावे.
प्रेम : जोडीदाराशी संबंध दुरावेल, वैवाहिक आयुष्यातही अस्थैर्य.
व्रत : कालीमातेचे दर्शन आणि पूजन करावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

वृषभ नशीब साथ देईल आणि वडिलांचे सहकार्य लाभेल.एखादे मोठे कार्य मार्गी लागल्याने मनाला समाधान लाभेल. जुन्या मित्रांच्या भेटगाठी होतील. कोर्ट प्रकरणात बाजू मजबूत आणि अडचणी दूर करण्यात यशस्वी व्हाल. प्रवासाला जाणे हे एखाद्या मोठ्या फायद्याचे संकेत देत आहे. व्यवसाय : बढतीसोबत नवीन संधी शक्य. तूर्त गुंतवणूक टाळा. शिक्षण : नवीन प्रकल्प लाभेल, तंत्रज्ञाना क्षेत्रातही यश शक्य. आरोग्य: गुडघे आणि पाठदुखी शक्य. बाकी प्रकृती ठीक राहील. प्रेम : संबंधात दुरावा शक्य, जोडीदाराला वेळ देता येईल. व्रत : श्री दुर्गाजीचे दर्शन करणे लाभदायक असेल.मिथुन तृतीय चंद्र उत्पन्न वाढवेल. आठवड्यात पैशांची चणचण येऊ शकते, मात्र ती लवकरच दूर होईल. काही बाबतीत निर्णय न घेता येण्याची स्थिती उद््भवू शकते. मात्र योग्य सल्ल्यानंतर पुढे जाल. कौटुंबिक बाबींत समाधान असेल. धार्मिक पर्यटनाचा योग येऊ शकतो. व्यवसाय : नोकरीत जबाबदारी व काम वाढेल. व्यापार सामान्य राहील. शिक्षण : परिणाम अनुकूल असेल, शैक्षणिक प्रवासाचा योग. आरोग्य: पोट व त्वचेसंबंधी त्रास शक्य. अॅलर्जीने त्रस्त होऊ शकता. प्रेम : जोडीदाराचे वागणे विचलित करेल, प्रेमात तणावही शक्य आहे. व्रत : श्रीशंकर आणि पार्वतीचे पूजन करावे.कर्क दुसरा चंद्र लाभदायी ठरू शकताे. या आठवड्यात अडचणी येणार नाहीत. उत्पन्नही चांगले राहील. नवीन कार्य करण्याचा मार्ग सापडेल. प्रतिष्ठाही मिळू शकेल. या आठवड्यात काही काैटुंबिक अडचणी जाणवू शकतील. त्यामुळे सावध राहूनच प्रत्येक पाऊल उचलावे. व्यवसाय: नाेकरीत काम जास्त राहिल. व्यवसायात तेजी असेल. शिक्षण: शिक्षणात अडचणी. सावध राहून विषयाचंी निवड करा. आरोग्य: सर्दी- खाेकला येऊ शकताे. थकवा- तणाव शक्य. प्रेम : व्यग्रतेमुळे जाेडीदारापासून दूर राहण्याची शक्यता व्रत : श्री राधा-कृष्णाची पूजा करावी.सिंह आठवड्याच्या सुरुवातीला गुरू- मंगळामुळे काही त्रास संभवताे. मात्र हळूहळू ताे दूर हाेईल. अंदाजपंचे काेणतेही काम करू नका. काेणाशीही व्यवहार खात्री करूनच करा. या आठवड्यात एखादी माेठी आनंदवार्ता मिळू शकते. तसेच प्रवासाला जाण्याची संधीही मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय: अधिकाऱ्यांची साथ मिळेल. गुंतवणुकीपासून दूर राहा. शिक्षण: अतिआत्मविश्वास व्यापारात नुकसान करू शकताे. आरोग्य: प्रकृती नरमगरम राहील. पेट, वाताचे आजार हाेऊ शकतात. प्रेम : जाेडीदारासाेबत तणाव शक्य. प्रेमसंबंधात गंभीर राहा. व्रत : महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करा.कन्या सुखद- आश्चर्यकारक बातमी मिळू शकेल. सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण राहील व कामाप्रती उत्साह असेल. सुख- सुविधांचा उपभाेग घेऊ शकाल. कार्याचा विस्तार हाेईल. अडकलेल्या कामांना गती मिळेल. संपत्तीत वाढ हाेऊ शकेल. वाहन वापरताना काळजी घेणे आवश्यक. व्यवसाय: व्यापार, नाेकरीत याेजनेनुसार काम केल्यास यश. शिक्षण: गणित- विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. आरोग्य: आराेग्य ठीकठाक. पायांत वेदना हाेऊ शकतात. प्रेम : जाेडीदारापासून सुख मिळेल. प्रेमसंबंध दृढ हाेतील. व्रत : श्री नारायणाचे दर्शन, पूजन करावे.तूळ एखाद्या कार्यात सक्रिय राहाल. प्रवासात नुकसान हाेऊ शकते. इच्छा नसतानाही काही कामे करावी लागतील. अनावश्यक वादांत अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी याेजना हाती घेताना अडचणी येऊ शकतात. असे असले तरी या आठवड्यात आनंदवार्ता मिळू शकेल. व्यवसाय: नाेकरी, कामातील बदल त्रस्त करेल. व्यापारात लाभ. शिक्षण : शिक्षणात चांगल्या संधी. मनासारखे यश मिळेल. आरोग्य: आळस व थकवा जाणवेल. कानाचा त्रास शक्य. प्रेम : जाेडीदाराची साथ लाभेल. प्रेमसंबंधात तणाव येऊ शकताे. व्रत : हनुमानासमाेर तेलाचा दिवा लावावा.वृश्चिक तुमचा पराक्रम श्रेष्ठ ठरेल, परंतु अतिआत्मविश्वास हानीकारक ठरू शकताे. त्यामुळे विचार करुन किंवा सल्ला घेऊनच पाऊल उचलावे. भावांकडून मदत मिळेल व ठरलेले कार्य वेळेत पूर्ण हाेईल. प्रतिष्ठित लाेकांशी चर्चेची संधी मिळू शकेल. वाहनापासून मात्र त्रास सहन करावा लागू शकताे. व्यवसाय: नाेकरीत सहकारी नाराज हाेतील. व्यवसायात लाभ. शिक्षण : तंत्रशिक्षणात यश मिळेल. स्पर्धेत यश मिळू शकेल. आरोग्य: सर्दी, खाेकला आणि एलर्जीचा त्रास. मूत्रविकास शक्य प्रेम : जाेडीदाराचे प्रेम मिळेल. प्रेमसंबंधात तणाव हाेऊ शकताे. व्रत : श्री राधा-कृष्ण यांचे दर्शन करावे.धनू पाच ग्रहांचा प्रभाव असल्यामुळे सावध राहूनच पावले उचला. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच महत्त्वाची कामे करावीत. गुंतवणुकीपासून दूरच राहा. जाेखीम असलेल्या कामांपासून दूरच राहा. वाद- विवादांमुळे त्रास संभावताे. नातेवाइकांची मने सांभाळताना अडचणी येऊ शकतात. व्यवसाय: अधिकारी कामात अडचणी आणू शकतील. शिक्षण: मनासारख्या गाेष्टी हाेण्यात अडचणी येतील. आरोग्य: कामामुळे ताणतणाव, पाठीचा त्रास हाेणे शक्य. प्रेम: प्रेमात अपेक्षित यश मिळणार नाही. तणाव निर्माण हाेऊ शकताे. व्रत : महादेवाच्या पिंडीस जलाभिषेक करावा.मकर मुला-मुलींपासून सुख मिळेल. उत्पन्नाची साधने वाढतील. नवीन कार्याची सुरुवात, कार्यक्षेत्र विकास हाेईल. तुमच्या क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. त्यामुळे प्रसन्नता वाढेल. विराेधक त्रास देतील, मात्र नियंत्रण मिळवू शकाल. व्यवसाय: बदलीसाठी नव्या आॅफर येतील. व्यापार उत्तम. शिक्षण : स्पर्धेचे निकाल मनाजाेगे.अपेक्षित प्रवेश मिळतील. आरोग्य: थकल्यामुळे शरीर तसेच गुडघ्यात वेदना हाेतील. प्रेम : प्रेमाच्या प्रस्तावात यश, जाेडीदाराकडून भेटवस्तू मिळेल व्रत : श्रीराम- सीता यांचे दर्शन करावे.कुंभ आठवड्याच्या सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात, मात्र नंतर संपतील. तुमच्या निष्क्रियतेमुळे विराेधक डाेईजड हाेऊ शकतात, त्यामुळे सावध राहावे. सहकाऱ्यांच्याही तक्रारी येतील. तरीही सर्व प्रकरणे निस्तरण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय: नाेकरीत प्रयत्नांतून यश. व्यवसायाचा विस्ताराचा याेग. शिक्षण: गणित, विज्ञान व वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना यश. आरोग्य: पायाला इजा हाेण्याची भीती. ताप किंवा सर्द हाेऊ शकते. प्रेम : प्रेमाचे प्रस्ताव अयशस्वी हाेऊ शकतील. जाेडीदाराची साथ. व्रत : गाईला हिरवा चारा खाऊ घालावा.मीन गुरूच्या वक्रदृष्टीमुळे तुमचे लक्ष विपरीत कार्यांकडे जाऊ शकते. त्यापासून दूर राहा, चांगल्या कार्याकडे लक्ष द्या. स्पर्धकांशी तीव्र स्पर्धा हाेऊ शकते, मात्र यश तुमचेच असेल. आनंददायी निर्णय घ्याल तसेच हा आठवडा यशदायी राहिल. व्यवसाय: सहकाऱ्यांची साथ मिळेल, व्यवसायात वृद्धी हाेईल. शिक्षण: उच्च शिक्षणातील अडथळे दूर हाेतील. यश मिळेल. आरोग्य: जास्त काम केल्याने थकवा जाणवेल, ताप येऊ शकताे. प्रेम : जाेडीदाराची प्रकृती बिघडेल. संबंध सुधारतील. व्रत : दरराेज १० वेळा गायत्री मंत्राचा जप करा.
X