आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षाच्या सुरुवातील 5 ग्रहांमुळे घडू शकतात चांगले बदल

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
 • कॉपी लिंक

30 डिसेंबर ते 5 जानेवारी या काळात धनु राशीमध्ये सूर्य, शनी, बुध, बृहस्पती आणि केतू ग्रह राहतील. या 5 ग्रहांमुळे अनेक लोकांच्या कामामध्ये बदल घडू शकतात. ग्रहांची ही स्थिती अचानक मोठे बदलही घडवणारी राहील. या ग्रहांमुळे काही लोकांचे स्थान परिवर्तन होऊ शकते. या व्यतिरिक्त चंद्र कुंभ राशीपासून मेष राशीपर्यंत जाईल. ग्रह-तार्यांची ही स्थिती 6 राशीच्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण राहील. या ग्रहांच्या प्रभावाने अनेक लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये लाभ होऊ शकतो.

येथ जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

 • मेष

गुरुची दृष्टी आणि दशमेतील चंद्रामुळे तणाव संपेल आणि तुम्हाला नवीन काम उत्साहाने करण्यासाठी प्रेरणा मिळेल. कार्यशैलीत सुधारणा हाेईल आणि आर्थिक लाभ हाेईल. नवीन संपर्क फलदायी ठरेल. छाेट्याश्या सहलीचा  देखीलयाेग आहे.  तुम्हाला परदेशात जाण्याची संधी आहे. वाद- विवादाची प्रकरणे मिटतील.

 • वृषभ

मंगळाची दृष्टी आणि नवमेतील चंद्र यामुळे तुमचा पराक्रम श्रेष्ठ राहील आणि कार्याच्या प्रती समर्पण राहील.  तुमची कामे वेळेवर पार पडतील. अडकलेल्या धनाची प्राप्ती हाेईल आणि कर्जाची प्रकरणे साेडवण्यासाठी  तुमचा रस्ता खुुला हाेईल. विराेधकांवर विजय मिळवण्यात यश येईल तसेच तुम्हाला आणि  नवीन कामेही मिळतील.

 • मिथुन

राहुचे गाेचर आणि अष्टमातील चंद्राच्या साथीने आठवड्याचा प्रारंभ हाेईल. मंगळवारी सकाळपासून काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे वाटेल. मानसिक त्रास कमी हाेईल तसेच आर्थिकदृष्ट्या भक्कम व्हाल. काैटुंबिक सदस्य अनुकूल राहतील. एखादे मंगलकार्य पार पडेल आणि तुमचा प्रभाव वाढेल.

 • कर्क

शुक्र व चंद्राची नजर राशीवर आहे. तुमचे भाग्य अनुकूल राहील व श्रेष्ठ कामगिरी कराल. कामात वेग राहील आणि चंद्र लाभ वाढवण्याच्या स्थितीमध्ये आहे. भागिदार आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल तसेच लक्ष्याची प्राप्ती सहजरित्या हाेईल. शनिवारी तुम्हाला चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे.

 • सिंह

गुरूची दृष्टी  तुमच्यावर असल्याने जास्त कामे हाेण्याची शक्यता आहे. कामात घाई केल्यास नुकसान हाेण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांचे वागणे त तुम्हाला त्रासदायक  ठरू शकते. उत्पन्नाच्या प्रकरणांत स्थिरता राहील. मुलांकडून सुख मिळेल. आठवड्यात उत्पन्नात वाढ हाेईल आणि कुटुंबियांची सा‌थ मिळेल.

 • कन्या

राशीवर शनीची दृष्टी आहे. बुधवारी आणि गुरुवारी त्रास हाेऊ शकताे. शुक्रवारपासून अनुकूल स्थिती निर्माण हाेईल.  तुमच्या याेजना यशस्वी हाेतील आणि मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी हाेतील.  तुम्हाला धार्मिक कार्यक्रमात सहभागी हाेण्याची संधी मिळेल. आठवडाभरात सुखाची प्राप्ती हाेईल.

 • तूळ

आठवड्याच्या प्रारंभी  तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. उत्पन्न कमी हाेण्याची तसेच वाद हाेण्याची शक्यता आहे. बुधवारपासून दिलासा मिळायला सुरुवात हाेईल. चंद्र अनुकूल  आहे. मित्रांकडून मदत मिळेल. उत्पन्नात वाढ आणि समस्यांवर उपाय सापडेल. मंगल कार्यात सहभागी हाेण्याची संधी मिळेल.

 • वृश्चिक

तृतीयेत चंद्र राहील. तुमचा वेळ आनंद देणारा तसेच धन धान्याने संपन्न करणारी आहे.जमिनीशी निगडीत प्रकरणांतून लाभ मिळेल आणि वादांच्या प्रकरणात विजय मिळवाल. वडिलांकडून सहकार्य मिळेल तसेच तुमचा प्रभाव वाढेल. प्रवासाचा याेग आहे तसेच न्यायालयीन कामकाजात यश मिळेल

 • धनू

पाच ग्रहांची युती आणि द्वितीयेचा चंद्र असल्याने तुम्हाला स्थायी संपत्ती प्रकरणात त्रास हाेण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून सुधारणा हाेण्यास सुरुवात हाेईल. वादविवाद मिटतील. सप्ताहात लाभ वाढण्याचे संकेत आहेत. पाहुण्यांचे आगमन हाेईल. तुमच्या जवळच्या लाेकांवर विश्वास दाखवा.

 • मकर

आठवड्याची सुरुवात चांगली हाेईल. आत्मविश्वास वाढेल आणि विविध स्त्राेतांतून उत्पन्न प्राप्तीची शक्यता आहे. अडकलेली कामेही मार्गी लागण्याची शक्यताआहे. आठवड्यात काही प्रमाणात ताण वाढेल. महत्वाच्या सरकारी कामात विलंब लागू शकताे.

 • कुंभ

मंगळवारपासून सर्व कामासाठी वेळ चांगली राहील. चांगल्या कामाला सुरुवात हाेईल. मंगळवारी शनीची दृष्टी आहे. कुटुंबात मंगल कार्ये होतील. तुम्हाला  काहीतरी आनंदाची बातमी मिळेल. कायमस्वरुपी मालमत्तेचे फायदे मिळतील. शनिवार व रविवार आनंददायी होईल.

 • मीन

पराक्रम दाखवण्याची वेळ आहे. चंद्राच्या गाेचरमुळे चांगले यश मिळेल. विराेध संपुष्टात येईल व उत्पानात वाढ हाेण्याचे संकेत आहेत. कामात मन लागेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आधुनिक सुख- सुविधा मिळतील. आठवड्यात एखादी आनंदाची बातमी मिळेल.