आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोव्हेंबरचा नवीन आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यात म्हणजे १९ ते 25 नोव्हेंबरपर्यंत काही लोकांना भाग्याची साथ मिळेल आणि काही लोकांना अलर्ट राहून काम करावे लागेल. अंक ज्योतिषमध्ये बर्थडेटनुसार स्वभाव आणि भविष्याविषयी जाणून घेणे शक्य आहे. पुढील सात दिवसांमध्ये तुम्हाला भाग्याची साथ मिळणार की नाही, हे न्यूमरॉलॉजीच्या माध्यमातून समजू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील 25 नोव्हेंबरपर्यंतचा काळ...
ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे
तुम्हाला या आठवड्यात कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु यशासोबतच मान-सन्मानही मिळेल. प्रेम-प्रसंगाशी संबंधित गोष्टींमध्ये सावध राहावे. छोटीशी चूकही पार्टनरला नाराज करू शकते.
ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे
धन संबंधित कामामध्ये उशीर करू नये. होईल तेवढ्या लवकर अपूर्ण काम पूर्ण करून घ्यावे. एखाद्या योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन काम करावे. घर-कुटुंबात वादाची स्थिती निर्माण होऊ शकते.
ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे
कामाच्या ठिकाणी भाग्याची साथ मिळेल. संपूर्ण उत्साहाने काम कराल. काही नवीन योजनांवर काम सुरु होईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी अन्यथा जखम होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.