आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात 12 पैकी 5 राशीच्या वाढू शकतात अडचणी, सावध राहून करावे काम 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यात म्हणजे 24 ते 30 मार्चपर्यंत चंद्र 3 वेळेस राशी परिवर्तन करेल. चंद्र 24 मार्चला रात्री धनु राशीतून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल, 27 मार्च धनु राशीमध्ये, 29 मार्चला मकर राशीत प्रवेश करेल. 30 मार्चला गुरु ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीमध्ये प्रवेश करेल. बुध ग्रह 28 तारखेला कुंभ राशीमध्ये मार्गी होईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या ग्रहांच्या या स्थितीमुळे 12 राशींसाठी हा आठवडा कसा राहील.

मेष 
चंद्राच्या पूर्ण दृष्टीमुळे आर्थिक प्रकरणांत काेणतेही अडथळे येणार नाहीत; परंतु मंगळ व बुधवारी काहीशी दु:खदायक स्थिती निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे मध्यस्थी करणे टाळा व स्वप्रयत्नांनीच कामे करा. गुरुवारी कार्यविस्तारात यश व प्रतिष्ठित लोकांच्या भेटींची शक्यता. धनलाभही हाेईल. 


नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात कर्ज मिळेल व नाेकरीत कार्यशैलीवर प्रभाव. 
शिक्षण : याेग्य निर्णय घेण्यात यश मिळेल. अभ्यासाप्रतिची नावड संपेल. 
आराेग्य :पाेटाच्या समस्या व उजव्या बाजूला कंबर व पायदुखी शक्य. 
प्रेम : हट‌्टीपणामुळे संबंधांत दुरावा येऊ शकताे. आप्तस्वकीयांतही तणाव राहील. 
व्रत : पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...