आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वजन असल्यामुळेही येतात गर्भधारणेत अडथळे 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भधारणेच्या कालावधीत वजनाला खूप महत्त्व आहे. शरीराचे वाढलेल्या वजनाचा उल्लेख आला तर त्याचा संबंध स्थूलतेशी जोडला जातो. स्थूलतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. परंतु अधिक वजन असल्याने किंवा कमी वजन असल्यानेही गर्भधारणेत अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. 


- प्रसूतीदरम्यान समस्या : कमी वजन असलेल्या महिलांमध्ये प्रीटर्म बर्थचा अधिक धोका असतो. मुलांचे वजन सर्वसामान्यापेक्षा अधिक कमी असते. ज्यामुळे मुलांनाही अनेक समस्या येऊ शकतात. यात एनिमिया यासारख्या गंभीर आजार जडू शकतात.

 
- वंध्यत्वाचा धोका : कमी वजनाचा अर्थ आहे की शरीरात कमी प्रमाणात फॅटचे प्रमाणे असणे. ओव्यूलेशन आणि मासिक पाळी होण्यासाठी शरीरात फॅट २२ टक्के असावे. शरीरात फॅट कमी असतील आणि मासिकपाळी नियमित होत असूनही गर्भधारणा होईलच याचीही शाश्वती नसते. 


- ओव्ह्यूलेशनचा परिणाम : शरीराचे वजन वाढल्याने हार्मोन्स वाढतात. यात ओव्यूलेशनवर परिणाम होऊन गर्भधारणेची शक्यता कमी होते. 


- गर्भपाताचा धोका : वजन वाढल्यास गर्भपाताचाही धोका असतो. तसेच आईवीएफ उपचारात अडचणी येऊ शकतात. 


या बाबी लक्षात ठेवा
- २२ तेे ३४ या वयात महिलांनी गर्भधारणेला प्राथमिकता द्यावी. कारण या कालावधीत गर्भधारणा उत्तम समजली जाते. 


- १८ तेे २५ या वयात आपल्या आरोग्य निर्देशांकाकडे लक्ष ठेवून असावे. निर्देशाक अधिक कमी अथवा जास्त झाल्यास त्याचेही परिणाम दिसून येतात. 


- नियमित व्यायाम करा, सकस आहार घ्या, वेळेवर जेवण करा, वजन अधिक असेल तर स्निग्ध पदार्थ वर्ज्य करा जसे- दही, तूप, लोणी, साखर. शक्यतो फळे व हिरवा भाजीपाला खाण्यावर भर द्या. 

बातम्या आणखी आहेत...