आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी 115 किलो होते वजन, पण बोलणे एवढे जिव्हारी लागले की 6 महिन्यांत कमी केले 45 किलो, ही 1 गोष्ट दररोज न चुकता केली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क - काही मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते, ती असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. असेच एक उदाहरण 31 वर्षीय राहुल राशूने ठेवले आहे. राहुल लहानपणापासूनच लठ्ठपणाने ग्रस्त होता. 2014 मध्ये त्याने वजन कमी करण्याचा निश्चय केला. एकेकाळी त्याचे वजन 115 किलो झाले होते. यानंतर 6 महिन्यांतच त्याने 45 किलो वजन कमी केले. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने अशा सर्व बाबी सांगितल्या, ज्यांच्यामुळे वजन कमी करणे शक्य झाले. आज आम्ही सांगत आहोत इंजिनिअर राहुलने अखेर 6 महिन्यांत 45 किलो वजन कमी कसे केले. जिथे जाईल तेथे राहुलला जाड्या म्हणून लोकं टोमणे मारत होते, ही गोष्ट त्याच्या मनाला खूप लागली.

 

कशी ठेवली डाएट

 

ब्रेकफास्ट : स्किम्ड मिल्क (विना मलाईचे) आणि 1 कप ओट्स खायचे. 
लंच : उकडलेल्या भाज्या घ्यायचे. यात ब्रोकली, फूलकोबी, भेंडी आणि कधी-कधी मसूरची डाळ खायचे.
डिनर : रात्रीही दिवसाप्रमाणेच उकडलेल्या भाज्या खाणे सुरू केले.

 

वर्कआउटमध्ये काय केले...
- 10 किमीच्या स्पीडने दररोज एक तास धावणे सुरू केले.
- स्वत:चे जुने फोटोज आणि व्हिडिओवरून मेहनतची प्रेरणा घेत राहिले.
- दररोज स्वत:चे वजन चेक करायचे. ज्यावरून आपण योग्य मार्गावर आहोत की नाही, हे कळायचे.
- इतर लोकं वजनावर हसायचे. अनोळखीही चिडवायचे. यामुळेच वजन कमी करण्याची जिद्द मनात आणली.

 

काय आहेत राहुल यांच्या टिप्स...
- वजन कमी करण्यासाठी सुरुवातीलाच योग्य पाऊल उचलले. तुम्ही जेवढा उशीर कराल, तेवढेच वजन कमी करणे कठीण होऊन बसते.
- रेग्युलर डाएट सोडून शिजवलेल्या खाण्यावर शिफ्ट होण्याचा माझा निर्णय खूप कडक होता, परंतु सतत ही डाएट फॉलो केल्याने माझे वजन कमी झाले. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...