आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ जास्त वजन उचलण्याने स्नायू बळकट होत नाहीत! 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्नायू बळकट करण्यासाठी हेवी वेटलिफ्टिंग करणे आवश्यक असते, असा समज जिमला जाणाऱ्यांमध्ये दिसून येतो. पण यात फार तथ्य नाही. स्नायू बळकट करणे हे वजन उचलण्यावर अवलंबून नसते. उलट व्यायामादरम्यान शरीरावर पडणारा ताण, वारंवार मारण्यात येणारे सेट्स, शरीर रचना तसेच आहार यावर ते अवलंबून असते. 


प्रसिद्ध आहारतज्ज्ञ जेएच जोडिन्सांगी (इंडियन स्पायनल इंज्युरीज सेंटर, नवी दिल्ली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नायू बळकट करण्यासाठी आहारात ५० ते ६० टक्के कर्बोदके, १० ते १५ टक्के प्रथिने आणि २५ ते ३० टक्के चरबी असली पाहिजे. स्नायूंच्या क्रिया योग्य रीतीने चालण्यासाठी प्रथिनांची गरज असते. प्रथिनांसोबतच खनिजे, जीवनसत्त्वांनाही महत्त्व असते. संतुलित आहारासोबत शरीरात ऊर्जा आणि सक्रियतेसाठी ८ तासांची झोप आवश्यक असते. बहुतांश लोक आपल्या क्षमतेनुसार, कमी किंवा जास्त वजन उचलतात. त्यातही नियमितपणा नसते. तुम्ही फार गांभीर्याने वेटलिफ्टिंग करत नसाल आणि जास्त वजन उचलत असाल तर तुम्ही विनाकारण शरीर थकवत असून चरबी जाळत आहात. यामुळे तुमचे शरीर आतून अशक्त होऊ शकते. स्नायू बळकट करण्यासाठी फक्त जास्त वजन उचलणे गरजेचे नाही, कमी वजनानेही स्नायू बळकट करता येतात. 


व्यायाम, आहार आणि आराम या तिन्हीचे संतुलित प्रमाण असेल तरच शरीर सुदृढ बनते. यापैकी एकाचेही प्रमाण कमी झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. 

बातम्या आणखी आहेत...