Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | weird auto car accident seriously injures three labours, Yawal jalgaon news

अॅपे रिक्षा-कारच्या विचित्र अपघातात तीन जण जखमी, फैजपूर-यावल रस्त्यावर घडली दुर्घटना

प्रतिनिधी | Update - Apr 03, 2019, 04:12 PM IST

सर्वच जखमींवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत

  • weird auto car accident seriously injures three labours, Yawal jalgaon news

    यावल - येथील फैजपूर रस्त्यावर प्रवाशांनी भरलेली अॅपे पिक्षा आणि कामरध्ये विचित्र अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अॅपे रिक्शाला एक भरधाव कार कट मारून निघाली. रिक्षा सांभाळण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला आणि रिक्षा पलटली. यापैकी एका जखमीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे, त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयातून थेट जळगावला हलवण्यात आले आहे.

    नांदूरखेडा येथे राहणारे काही मजूर कामासाठी शहादा येथे ॲपे रिक्षाद्वारे जात होते. यावल फैजपूर रस्त्यावर सांगवी गावाजवळ ही रिक्षा असताना एक भरधाव कार आली. याच दरम्यान तोल सुटला आणि प्रवाशांनी भरलेली अॅपे रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. यात लक्ष्मण सोनू भिल (61), देवराम गुलाब भिल (35) आणि विजय दरबार इमणे (35) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना सर्वांनाच सुरुवातीला उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉ. वैशाली निकुंभ, डॉ. स्वाती कवडीवाले, सरला परदेशी, आरती कोल्हे, पिंटू बागुल आदींनी उपचार केले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना जळगाव सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

Trending