आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Weird Behavior Of Students As They Enters In School Like A Snake

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थी शाळेत येतात सरपटत, वर्गात बसले की घुमू लागतात; विचित्र हालचालींमुळे पालक, शिक्षक चिंतेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- महाराष्ट्र-गुजरात सीमेवर डांग जिल्ह्यातील आंबापाडा गावात असलेल्या शाळेत सहावी व आठवीतील तीन विद्यार्थी शाळेत आले की विचित्र हालचाली करू लागतात. सरपटत वर्गात प्रवेश करतात. पंधर दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे अन्य विद्यार्थ्यांत भीती पसरली असून पालकांसह शिक्षकही चिंतेत आहेत. 

 

महाराष्ट्र सीमेपासून १० किमी अंतरावर गुजरात जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेतील आश्विन, सुमित आणि राहूल असे तीन विद्यार्थी शाळेत आले की दोन तास विचित्र हालचाली करतात. त्यांना शरीरिक थकवादेखील जाणवत नाही. त्यांना कुणी समजावण्याचा प्रयत्न केला तर ते मारहाण करू लागतात. मुख्याध्यापक रिंकेश ठंडले यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. परंतु अजून काहीही उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे शाळेतील १५० विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. भीतीने अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नाहीत. 

 

पिडीत विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी तयार नाहीत. समाधानासाठी शाळेत मांत्रिक बोलावून पूजा करण्यात आली. तरी मुलांमध्ये काहीही फरक पडला नाही. - मोतीराम शुक्कर,

पोलीस पाटील, आंबापाडा जिल्हा डांग 

 

प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा विकास अधिकारी व आरोग्य अधिकारी घटनास्थळी जाऊन योग्य उपाययोजना करतील. संबंधित पप्रकार जिल्हा प्रशासनाला कळवला नाही म्हणून दोषीवर कारवाई करण्यात येईल. -बी.के. सिंग, जिल्हाधिकारी, डांग 
 
म्हणे देव शिरलाय... 
शरीरात देव शिरला आहे, असे हे तिघे सांगतात. घाबरू नका, असे आवाहनही करतात. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
 
तिघेही हुशार 
आश्विन, सुमीत व राहुल हुशार आहेत. सकाळी अकरा वाजता शाळा भरली की ते घुमू लागतात. शाळेच्या बाहेर आल्यावर पुन्हा त्यांची वागणूक सामान्य असते.