आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात टी-शर्ट घालून नाही चालवू शकत कार, जाणून घ्या जगभरात गाडी चालवण्यासाठीचे नियम...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- जगभरात गाडी चालवण्याचे वेगवेगळे नियम आहेत. जसे आपल्या देशात उजव्या बाजुला बसून गाडी चालवली जाते तर काही देशात डाव्या बाजुला बसून गाडी चालवतात. पण तुम्हाला माहित नसेल की, इतर देशांत गाडी चालवण्याचे विचीत्र नियम आहेत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या देशात कोणत्या नियमांचे पालन करून गाडी चालवावी लागते.


प्रत्येक देशाची सरकार आपल्या देशातल्या नागरीकांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनवत असते. या नियमांचे पालन केले नाही तर अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. अशातच काही देशात गाडी चालवण्याच्या नियमात शर्ट घालण्याबाबत काही अटी असतील तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना.

 

फिनलँडमध्ये, कॅब ड्रायव्हर्सना गाडीमध्ये मुजीक वाजविण्यासाठी पैसे भरावे लागतात. यासाठी ड्रायव्हरला 40 डॉलर दर वर्षाला सरकारला पे करावे लागतात. यामुळे अनेक ड्रायव्हर ग्राहकांना बसवल्यानंतर गाणे बंद करतात.


तर थायलंडमधले नियम ऐकुण कोणताही पुरुष विचार करत बसेल. ड्रयव्हींग करताना शर्ट घालने अनिवार्य आहे पण कोणही टी-शर्ट घालून गाडी चालवू शकत नाही. टी-शर्ट घालून गाडी चालवण्यावर तेथे बॅन आहे.


इतकरच नाही तर, डेनमार्क आणि स्वीडनमध्ये दिवसा गाडी चालवण्यासाठी एक वेगळाच नियम आहे. येथे गाडी चालवताना गाडीची हेड लाईट चालु ठेवावीच लागते, जर कोणी हेडलाइट बंद केला तर त्याला दंड भरावा लागतो.


स्विट्ज़रलंडमध्ये रविवारी सकाळी गाड्यांना धुण्याला मनाई आहे, तर शनिवारी रात्री उशीरा गाडीत गाणे लावुन धिंगाणा करण्यावर मनाई आहे.


स्पेनमध्येही गाडी चालवण्यासाठी वेगळा नियम आहे. गाडीचालवताना तुम्ही चष्मा घातला तर तुम्हाला गाडीत चष्मच्याचा एक्स्ट्रा पेअर सोबत ठेवावे लागेल. असे न करणाऱ्यांवर कारवाई केली जाते.


तर रूसमध्येही अशाच प्रकारचा नियम आहे. येथे घाण गाडी चालवण्यावर बंदी आहे, म्हणजेच तुम्हाला गाडी बाहेर काढण्यापूर्वी गाडीला साफ करावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...