आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाळ्यात अडकला विचित्र मासा, बॉडीवर होती टॅटूसारखी आकृती, जगभरात व्हारल झाला होता फोटो, नंतर समोर आले असे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिंडानाओ - फिलिपाइन्समध्ये गेल्यावर्षी एक असा मासा आढळला होता, ज्याच्या बॉडीवर टॅटूसारख्या आकृती होत्या. एका मच्छिमाराच्या जाळ्यात अडकलेला हा मासा पाहून लोकांना आश्चर्य वाटले. जगभरात या माशाचा फोटो व्हायरल झाला होता. या निळ्या माशाच्या बॉडीवर टॅटू आणि नंबर सारख्या आकृती होत्या. त्यानंतर लोक या माशाला टॅटू मासा म्हणू लागले होते. पण लोकांना तेव्हा यामागचे कारण समजले नाही. नंतर काही दिवसांनी या माशाच्या बॉडीवरील सिम्बॉल्समुळे याबाबत खुलासा झाला होता. ज्या व्यक्तीने मासा पकडला त्यानेच हा खुलासा केला होता. 


जाळ्यात अडकला टॅटूचा मासा 
- मे 2017 मध्ये फिलिपाइन्सच्या मिंडानाओमधील जोसिमो तानो (41) याने हा मार्लिन प्रजातीचा मासा पडला होता. 6.5 फूट लांबीचा हा मासा 24 किलोचा होता. इतर माशांपेक्षा वेगळा. त्याच्या शरिरावर खवल्यांबरोबरच काही नंबर आणि विचित्र आकृत्या होत्या. 
- लोक मासा पाहून आश्चर्यचकित झाले. याचा संबंध जादू टोणा किंवा तंत्र मंत्रशी जोडू लागले. तर कोणी हा एलियनचा प्रकार असल्याचे म्हणाले. पण खरे कारण कोणालाही माहिती नव्हते. 
- पण काही दिवसांनी हे गूढ उकलले. मासा पकडणाऱ्या जोसिमो तानोने स्वतः याबाबत सांगितले होते. 


मच्छिमाराने सांगितले सत्य 
तानोने हा मासा पकडल्यानंतर त्याच्या प्रिंटेड टीशर्टमध्ये लपेटून ठेवला होता. त्याने टीशर्ट काढला तेव्हा माशाच्या शरिरावर ती प्रिंट उमटली गेली होती. 

बातम्या आणखी आहेत...