आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हैस Kidnap: एकुलत्या एक म्हशीचे अपहरण करून लावला मालकाला फोन, दिली अशी धमकी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैन - माणूस कधी आणि काय करेल हे काहीच सांगता येत नाही. असेही काही प्रसंग घडतात जे ऐकूण या जगात न ऐकल्यासारखे काहीच राहिले नाही अशी भावना निर्माण होते. अशाच प्रकारची एक घटना राजस्थानच्या उज्जैन जिल्ह्यात घडली आहे. यात चोरांनी एका गरीबाची म्हैस तर चोरली. का कुणास ठाऊक त्या चोरट्यांनी मालकाला फोन लावला आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. यात गंमत म्हणजे, चोर सुद्धा किती बिनडोक आहे याची प्रचिती त्याच्या धमक्यांवरून येते.


80 हजारांची म्हैस चोरली, पण विकली नाही! मागितली तेवढीच खंडणी
> राजस्थानच्या उज्जैन जिल्ह्यातील आक्याकोली गावात 13 ऑगस्ट रोजी एक म्हैस चोरीला गेली. यानंतर त्या चोरट्याने म्हशीच्या मालकाला फोन लावून 80 हजार रुपयांची खंडणी मागितली. चोराने 14 ऑगस्ट रोजी मालक सेवारामला त्याच्या व्हॉट्सअॅपवर म्हशीचा फोटो पाठवला. त्यासोबत लिहिले, 'बघ तुझी म्हैस माझ्याकडे आहे. तुला ही परत हवी असेल तर 80 हजार रुपये घेऊन कीटिया परिसरात ये. तेथेच तुला म्हैस मिळेल.'
> सेवारामने सांगितल्याप्रमाणे, त्याने आपल्या म्हशीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. यानंतर चोरट्यांनी पाठवलेला फोटो आणि धमकीचा मेसेज सुद्धा पोलिसांना दाखवला. परंतु, पोलिसांनी त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. आरोपींनी शनिवारी सेवारामला एक कॉल केला. तसेच खंडणी मिळाली नाही. तर तुझी म्हैस बाजारात विकू अशी धमकी दिली. ही म्हैस मुर्रा प्रजातीची आहे. बाजारात या म्हशीची किंमत 80 हजार रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...