Home | International | Other Country | weird law in US, mother has no right to be a parent of child born after rap

येथे रेपनंतर जन्माला येणाऱ्या बाळावर नसतो आईचा अधिकार; भेट घेण्यासाठी घ्यावी लागते रेपिस्टची परवानगी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 12:02 AM IST

या देशात दरवर्षी 32 हजार महिलांना बलात्कारानंतर गर्भधारणा होते.

 • weird law in US, mother has no right to be a parent of child born after rap

  इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील वादग्रस्त कायदा पुन्हा चर्चेत आला आहे. येथे एका मुलीवर 12 वर्षांची असताना बलात्कार झाला होता. यातून तिला गर्भधारणा झाली आणि बाळालाही जन्म दिला. या घटनेच्या 10 वर्षांनंतर बलात्काऱ्याने त्या बाळावर आपला दावा केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. कोर्टाने तिला आपल्या बाळाची भेट रेपिस्टला करून देण्याचे निर्देश दिले. कारण, कायद्याने त्या मुलावर रेपिस्टचा अधिकार आहे. ब्रिटिश माध्यम बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या देशात दरवर्षी 32 हजार महिलांना बलात्कारानंतर गर्भधारणा होते. अमेरिकेतील 4 राज्यांमध्ये लागू असलेल्या वादग्रस्त कायद्यानुसार, रेपनंतर जन्माला आलेल्या मुला-मुलींवर आरोपीचा अधिकार असतो. पीडित आईला त्या बाळाची भेट घेण्यासाठी किंवा त्याला दत्तक घेण्यासाठी सुद्धा आपल्या बलात्काऱ्याची परवानगी घ्यावी लागते. एवढेच नव्हे, तर या दरम्यान बलात्कारी कधीही आपल्या बाळाची भेट घेण्यासाठी पीडितेसमोर येऊ शकतो.


  पालकत्वाचे सर्व अधिकार रेपिस्टला
  - फ्लोरिडा प्रांतात राहणारी अॅना लीन हिने बलात्कारानंतर एका मुलीला जन्म दिला. परंतु, कोर्टाने त्या बाळाच्या पालकत्वाचे अधिकार रेपिस्टला दिले. अमेरिकेतील विविध प्रांतात कायदे वेग-वेगळे आहेत. फ्लोरिडातील कायद्यानुसार, अॅनाची इच्छा नसेल तर ती रेपिस्टचे पालकत्वाचे अधिकार काढून घेऊ शकते. परंतु, त्यासाठी तिला मोठा कायदेशीर लढा द्यावा लागेल. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन खटल्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. तिच्यावर बलात्कार दुसऱ्या राज्यात झाला आणि गर्भधारणा झाल्यानंतर ती दुसऱ्या राज्यात गेली होती. या घटनेच्या 10 वर्षांनंतर रेपिस्टने आपल्या मुलीची भेट घेण्याची इच्छआा व्यक्त केली. त्याने कोर्टात याचिका दाखल केली आणि कोर्टाने पीडितेला तिच्या मुलीसह आरोपीची भेट घेण्याचे आदेश दिले.
  - कायद्यानुसार, त्या मुलीवर बलात्काऱ्याचा अधिकार आहे असे कोर्टाने म्हटले आहे. अमेरिकेत लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार प्रकरणी खास शिक्षेची तरतूद नाही. लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचार आणि त्यानंतर गर्भधारणा झाली तरीही केवळ बाल लैंगिक शोषणाचे आरोप लागतात. त्यानुसार, तेवढीच शिक्षा दिली जाते. अनेकवेळा आरोपी या कायद्याचा गैरफायदा घेऊन लवकरच तुरुंगातून बाहेर येतात. बरेच रेपिस्ट तुरुंगातून सुटल्यावर किंवा तुरुंगात असतानाही कोर्टात त्या मुला-मुलीवर अधिकार गाजवतात. अशात कायद्याने कोर्टाकडून पीडित आणि त्यांच्या मुला-मुलींना रेपिस्टची भेट घ्यावी लागते.


  ओबामांनी आणला होता कायदा, पण...
  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असताना बराक ओबामा यांनी 2015 मध्ये रेप पीडितांच्या मुलांच्या कस्टडीचा विशेष कायदा आणला होता. विविध राज्यांसाठी या निमित्ताने कोट्यवधींचे बजेट मंजूर केले. या कायद्यानुसार, रेप पीडित रेपिस्टला पालकत्वाचे अधिकार नकारत असेल तर तिचा कायदेशीर लढ्याचा खर्च आणि मायलेकांच्या राहणे, खाण्या-पिण्याचा खर्च यातून उचलला जात होता. 43 प्रांत आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये हा कायदा लागू करण्यात आला. परंतु, वेग-वेगळ्या राज्यांनी तो आपल्या पद्धतीने बदलून लागू केला. 20 राज्यांमध्ये एखाद्या रेपिस्टला पालकत्वाचा अधिकार नकारण्यासाठी तो दोषी सिद्ध होऊन त्याला शिक्षा होणे आवश्यक आहे. अशात जोपर्यंत बलात्काराचे दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत पीडितांना वारंवार आपल्या रेपिस्टचा चेहरा पाहावाच लागतो.

Trending