आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सापाचा भास झाला अन् पतीने बॅटने मारून पत्नीचा पाय माेडला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे एका पतीने लाकडी दांड्याने वार करून पत्नीचे दोन्ही पाय मोडले. पण यामागे एक गैरसमजाचे कारणही आहे. वास्तविक पाहता, या महिलेने सापासारखा दिसणारा ड्रेस घातला होता. त्या ड्रेसवरच ती झोपी गेली.

 

दरम्यान, पती बेडरूममध्ये आला आणि त्याला बिछान्यावर दोन साप दिसले. त्याने विलंब न करता दरवाजाजवळ ठेवलेल्या बेसबॉलच्या बॅटने त्यावर वार केले. पत्नी किंचाळली. तिच्या ओरडण्याने त्याला आपली चूकही समजली.