आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉसला विचारून प्रेग्नंट झाली नाही म्हणून अबॉर्शनचे फर्मान, कंपनीच्या विचित्र नियमामुळे त्रस्त झाली महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिजियाजुआंग - चीनच्या एका बँकेला लोकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. कारण बँकेने आपल्या एका महिला कर्मचाऱ्याला अबॉर्शन किंवा दंड भरण्याचे फर्मान सोडले आहे. महिलेची चूक एवढीच होती की, ती प्रेग्नंट झाली. आणि यासाठी तिने आपल्या बॉसकडून परवानगी घेतली नव्हती. बँकेच्या नियमानुसार तेथे कोणतीही महिला कर्मचारी आपल्या बॉसला न विचारता प्रेग्नंट होऊ शकत नाही. असे केल्यावर एकतर तिला गर्भपात करावा लागतो किंवा दंड भरावा लागतो. असे एक नव्हे, तर अनेक महिलांसोबत घडलेले आहे.

 

वर्षाच्या प्रारंभीच भरावा लागतो फॉर्म
- चिनी माध्यमांनुसार, हा विचित्र नियम शिजियाजुआंग प्रांतातील एका बँकेचा आहे. यानुसार महिला कर्मचारी बॉसकडून परमिशन मिळाल्यानंतरच प्रेग्नंट होऊ शकते. बँकेने आपल्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना परवानगी घेतल्यानंतरच गर्भधारणेचे सांगितलेले आहे.
- बँकेच्या पॉलिसीनुसार, जर एखाद्या महिला कर्मचाऱ्याला प्रेग्नंट व्हायचे असेल, तर तिला जानेवारीतच फॉर्म भरून सांगावे लागते आणि बॉसने होकार भरल्यानंतरच तिला प्रेग्नंट होता येते.
- जर एखाद्या महिलेने हा नियम मोडला आणि परवानगीशिवाय प्रेग्नेंट झाली तर तिला अबॉर्शन किंवा दंड यापैकी एकाची निवड करावी लागते.

- बँकेच्या या अजब 'प्रेग्नन्सी पॉलिसी'ची आता जगभरात चर्चा सुरू आहे. गत महिन्यातच एका महिला कर्मचाऱ्याने शिजियाजुआंग एम्प्लाई सर्व्हिस सेंटरला याप्रकरणी मदत मागितली होती.

 

महिलेच्या तक्रारीवरून झाली कारवाई
- महिलेने सेंटरमध्ये तक्रार करत सांगितले की, ती विनापरवानगी प्रेग्नंट झाली होती, यांनतर आता बँकेने तिला अबॉर्शन किंवा दंड यापैकी एकाची निवड करण्यासाठी सांगितले होते. यापूर्वीही अनेक महिलांसोबत असेच झाल्याचे तिने यावेळी सांगितले.

- तथापि, विनापरवानगी प्रेग्नंट होणाऱ्या कर्मचाऱ्यांना बँक कोणत्या प्रकारची शिक्षा देते, हे अद्याप कळू शकलेले नाही. चिनी माध्यमांनुसार, अशा कर्मचाऱ्यांची सॅलरी कापली जाते, अथवा त्यांचे डिमोशन केले जाते.
- चीनच्या कुटुंब नियोजन कायद्यानुसार, महिलांचे प्रजननाचे अधिकार कायद्यांतर्गत संरक्षित आहेत. तेथे दांपत्याला फक्त दोनच मुले जन्माला घालण्याची परवानगी आहे. तथापि, कोणत्याही कायद्यानुसार, प्रेग्नंट राहिल्यावर महिलेचा पगार कापला जाऊ शकत नाही.
- महिलेची तक्रार मिळाल्यावर शिजियाजुआंग एम्प्लाई सर्व्हिस सेंटरने बँकेसोबत बोलणी करून आपल्या विचित्र प्रेग्नेंसी पॉलिसीला तत्काळ संपुष्टात आणण्यासाठी सांगितले आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...