आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणयाआधी जोडीदाराचा छळ करण्यात यांना मिळतो आनंद, भारतातही आहे ही सीक्रेट कम्युनिटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' या बहुचर्चित चित्रपटातही लोक कशाप्रकारे सेक्सदरम्यान पार्टनलला वेदना देऊन आनंदी होतात हे दाखवले आहे. बीडीएसएमला सॅडिझमशी जोडले जाते. पण त्यात इतरही अनेक बाबींचा समावेश होतो. त्याअंतर्गत बॉन्डेज, डॉमिनन्स, सॅडिझ्म आणि मॅसोचिसम याचाही समावेश असतो. त्याच्या सुरुवातीच्या अक्षरांपासून बीडीएसएम तयार झाले आहे. त्याला सेक्सची निर्घृण पद्धत समजले जाते. त्यात पार्टनर आणि स्वतःलाही वेदना दिल्या जातात. केवळ विदेशांत हे प्रकार आहेत असे नाही, भारतात बेंगळुरू सारख्या शहरांत बीडीएसएम कम्युनिटी तयार झाली आहे.

 

असे चालते कम्युनिटीचे काम...
- बेंगळुरूच्या एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत सविस्तर रिपोर्ट दिला होता. त्यात बेंगळुरूमध्ये चालणाऱ्या बीडीएसएम कम्युनिटीचा अॅक्टीव्ह सदस्य राहुल (बदलेले नावम) याचा दाखला देत अनेक बाबी छापल्या होत्या. भारतात पारंपरिक समाज असल्याने बीडीएसएम कम्युनिटीचे काम लपून चालते.
- राहुलच्या मते ग्रुपमध्ये बहुतांश बाबी या टेक्निकशी संबंधित असतात. त्यासाठी वर्कशॉप, प्रेझेंटेशन, मीटींग आयोजित केल्या जातात. 
- त्यांच्या बहुतांश मिटींग्स पब किंवा बारमध्ये होतात. येथे 20-25 च्या गटाने लोक एकत्र येतात. 
- बीडीएसएम कम्युनिटीचे लोक फेसबूक, व्हाट्सअॅप, ट्विटर द्वारे एकमेकांशी जोडलेले असतात आणि त्याद्वारेच संपर्कात राहतात. 
- बीडीएसएमच्या कृतीमध्ये चाबूक, बेडी(हथकडी), साखळी, विविध प्रकारच्या दोऱ्या, पट्टे यांचा वापर केला जातो. भारतात अशा गोष्टींचे स्टोअर फार कमी असतात. त्यामुळे चीन, मलेशियामधून त्या ऑनलाईन मागवल्या जातात. 
- सर्व काही एकमेकांच्या संमतीने होत असल्याने काहीही बेकायदेशीर नसते असा या कम्युनिटीतील लोकांचा दावा आहे. तसेच ते सेफ्टीचीही काळजी घेतात. 
- मानसोपचार तज्ज्ञांच्या मते अनेक लोकांच्या मनात काही इच्छा दबलेल्या असतात. त्या सामाजिक आणि नैतिकतेच्या भितीपोटी कायम दबूनच राहतात. बीडीएसएम कम्युनिटीचे लोक त्या इच्छा पूर्ण करतात.

 

पुढील स्लाइड्वर पाहा, या कम्युनिटीशी संबंधित काही PHOTOS..  

 

बातम्या आणखी आहेत...