10 कोटींची 900 टन दारु देत फेडले 10 बँकेचे कर्ज, 8 कोटी रुपयांची होती थकबाकी
एका कंपनीला बँकेचे कर्ज फेडता आले नाही तर त्याने थेट बँकेला 900 टन दारु देऊन हे कर्ज फेडले. हा प्रकार घडला चीनमध्ये.
-
एका कंपनीला बँकेचे कर्ज फेडता आले नाही तर त्याने थेट बँकेला 900 टन दारु देऊन हे कर्ज फेडले. हा प्रकार घडला साऊथ वेस्ट चायनाच्या सिचुआन प्रांतात. येथील एका दारुच्या कंपनीवर बँकेचे 80 लाख युआन ( 8 कोटी) कर्ज होते. कंपनीवर जेव्हा हे कर्ज फेडण्यासाठी दबाव येऊ लागला तेव्हा त्यांना स्टॉकमध्ये ठेवलेली जवळपास 900 दारुच बँकेच्या हवाली केली आणि कर्ज फेडले.
दोन वर्षे चालली सुनावणी
बँकेला 2016 च्या अखेरीस लक्षात आले की, एका दारुच्या कंपनीवर असलेले कर्ज वाढत चालले आहे आणि कंपनी ते फेडत नाही. बँकेने त्या कंपनीच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला. जवळपास दोन वर्षे सुनावणी चालली. त्यानंतर कोर्टाने कंपनीला दोषी ठरवत लवकरात लवकर कर्ज फेडण्याचे आदेश दिले. कर्ज फेडले नाही तर न्यायालयाने कंपनीशी संलग्न असलेल्या 4 दारुच्या कंपन्यांचा लिलाव करण्याचे आदेश दिले. कंपनीवर 8 कोटींचे कर्ज होते आणि व्याज वाढतच चालले होते.
9.95 कोटींची दारु दिली बँकेच्या ताब्यात
बँकेच्या आदेशानंतरही कोणीही दारुची कंपनी खरेदी करायला तयार झाले नाही. त्यामुळे बँकेने पुन्हा कंपनीवर दबाव आणणे सुरू केले. अखेर कंपनीने बँकेला सांगितले की, त्यांच्या स्टॉकमध्ये जवळपास 900 टन दारु आहे. ती बँक ताब्यात घेऊ शकते. बराच काळ विचार केल्यानंतर बँकेने होकार दिला. या दारुचे मुल्य जवळपास 9.94 मिलियन युआन ( जवळपास 9 कोटी 95 लाख रुपये) आहे.
-
बँकेपर्यंत पोहोचली दारु
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार ही 900 टन दारु ट्रान्सपोर्ट मार्फत बँकेपर्यंतदेखिल पोहोचवण्यात आली. त्यानंतर बँकेने कंपनीचे संपूर्ण कर्ज राइट-ऑफ केले
-
चीनमध्ये वाढतेय मद्यपानाचे प्रमाण
रिपोर्ट्सनुसार चीनमध्ये मद्यपानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बायजियू दारु चीनबरोबरच जगभरात प्रसिद्ध आहे. चीनच्या अर्थव्यवस्तेत जसजशा सुधारणा होत आहेत, त्या प्रमाणात दारुची विक्रीही वाढत आहे. डब्ल्यूएचओ आणि लेसेंटच्या रिपोर्टनुसार चीनमध्ये प्रतिव्यक्ती दारुचे प्रमाण वार्षिक 4.9 लीटरहून 6.7 लीटरवर पोहोचले आहे.
More From International News
- मसूदला दहशतवादी घोषित करण्यास चीनचा पुन्हा नकार; चीनकडून खोडाअनेक देशांच्या दहशतवादी यादीत अझहरचे नाव
- Terror Attack: मास्टरमाइंड मसूद अझहरला वाचवण्याचा चीनचा प्रयत्न, जागतिक दहशतवादी घोषित करण्यास अजूनही नकार
- प्रदूषणाने चीनमध्ये आयुर्मान 2.9 वर्षांनी घटले ,वार्षिक 11 लाख मृत्यू; अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी संस्थेचा दावा