आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Welcome Back : Rishi Kapoor Returned Home After 11 Months, 11 Days, Writing On Twitter, 'Thank You All'

वेलकम बॅक : 11 महिने, 11 दिवसांनंतर घरी परतले ऋषी कपूर, ट्विटरवर आनंद व्यक्त करत लिहिले, 'सर्वांचे आभार' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नीतू कपूर न्यूयॉर्कहुन मुंबईला परतले आहेत. मंगळवारी सकाळी त्यांची फ्लाइट मुंबई एअरपोर्टवर लॅन्ड झाली. तिथून बाहेर निघताना कपलने मीडियाच्या फोटोग्राफर्सला पोजदेखील दिल्या आणि हसून सर्वांना अभिवादन केले. यासोबतच ऋषी कपूर यांनी ट्विटरद्वारे आपण परतल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले, "घरी परतलो. 11 महिने 11 दिवस. सर्वांचे आभार." 

बॉलिवूडनेही केले त्यांचे वेलकम... 
- चित्रपट दिग्दर्शक कुणाल कोहलीने त्यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत लिहिले, "घर आया मेरा परदेसी, प्यार बुझी मेरी अंखियन की. तुमचे स्वागत आहे सर. तुमच्या परतण्यामुळे खूप आनंदी आहे. तुम्हाला खूप सारे प्रेम." 
- फोटोग्राफर आणि प्रोड्यूसर अतुल कास्बेकरने लिहिले, "तुमचे स्वागत आहे." 
- याचप्रकारे अभिनेता, सिंगर फरहान अख्तर, अदनान सामी, डिस्ट्रीब्यूटर राज बन्सल आणि रायटर-डायरेक्टर ज्योती कपूर दास यांनीदेखील ऋषी कपूर यांचे स्वागत करण्यासाठी ट्वीट केले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...