आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भले माझे हात बांधून ठेवा, पण ब्रेक्झिटमध्ये विलंब होऊ देणार नाही : जॉन्सन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन : मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा तातडीने निवडणूक घेण्याचा प्रस्ताव संसदेने पुन्हा फेटाळून त्यांना झटका दिला आहे. संसदेचे कामकाज १४ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आले. मुदतपूर्व निवडणुकांचा जॉन्सन यांचा प्रस्ताव संसद सदस्यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा फेटाळला आहे. जॉन्सन यांच्या प्रस्तावाच्या बाजूने २९३ सदस्यांनी मत दिले. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी ४३४ सदस्यांच्या समर्थनाची आवश्यकता होती. ब्रिटन कुठल्याही समझोत्याशिवाय युरोपियन संघाबाहेर पडल्यास देशाला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.'भले माझे हात बांधा, परंतु बेक्झिटला विलंब होऊ देणार नाही,' अशी भूमिका जाॅन्सन यांनी सभागृहात मांडली. भले माझ्या हाताला बांधून टाकले तरी चालेल. परंतु विलंब मुळीच करू नका.

आपल्याच पक्षातून विरोध : करार होवो अथवा झाला नाही तरी ३१ ऑक्टोबरपर्यंत ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडेल, असे जॉन्सन यांनी पूर्वीच स्पष्ट केले. ही मुदत पुढे ढकलण्याचे प्रयत्न होत असून त्यांना स्वपक्षातून विरोध होत आहे.

मुदत वाढवण्यासाठी कायदा : बंडखोर व विरोधी खासदारांना ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्यापूर्वी करार व्हावा. त्यासाठी आणखी मुदत असावी. म्हणूनच मुदतवाढ करण्यासाठी विरोधकांची मागणी आहे. सोमवारी विरोधकांनी एका नव्या कायद्याला मंजुरी दिली होती.

प्रसंगी मृत्यू स्वीकारेन : जॉन्सन नवीन कायद्यानुसार पंतप्रधान ईयूकडे ३१ ऑक्टोबरची मुदत वाढवण्यासाठी विनंती करतील, असा नवा कायदा मंजूर झाला आहे. बोरिस यांनी त्यास विरोध केला आहे. ब्रेक्झिटमधील विलंबापेक्षा मृत्यू स्वीकारेन, असे त्यांनी म्हटले आहे.

बोरिस जॉन्सन यांच्याकडे आता राहिले तीन पर्याय
- मुदत झुगारणे : जॉन्सन नवीन कायद्याला नाकारू शकतात. त्यावर त्यांना कोर्टात आव्हान मिळू शकते. तुरुंगवासही होऊ शकतो.
- एफटीपीएमध्ये बदल : फिक्स्ड टर्म पार्लमेंट अॅक्टमध्ये दुरुस्ती करून निवडणूक घेऊ शकतात. परंतु बहुमत मिळणे कठीण आहे.
- ईयूकडे अपील : जॉन्सन यांनी ईयूला पत्र पाठवून ३१ ऑक्टोबरची मुदत वाढवण्याची विनंती करावी. हा एक पर्याय आहे. विरोधकांना मुदत वाढवल्याचा विश्वास वाटावा. त्यानंतर ईयूने दुसरे पत्र पाठवावे.

संसद स्थगित करण्याच्या परंपरेचे पालन केले जाते..
ब्रिटनच्या संसद स्थगितीच्या वैधानिक परंपरेचे अतिशय काटेकोरपणे पालन केले जाते. त्यात ब्लॅक रॉड (पीठासीन अधिकारी) सारा क्लार्क हाऊस ऑफ कॉमन्सचे अधिकारी जॉन बर्को यांच्यासोबत संसदेच्या वेलमध्ये पोहोचल्या. येथे महाराणीचे प्रतिनिधी अर्थात हाऊस ऑफ कॉमन्सच्या नेत्याकडून महाराणींचा संदेश ऐकवण्यात आला. त्यात संसद स्थगित करण्यात आल्याची माहिती जाहीर करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...