पश्चिम बंगाल / पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींनी चहाच्या टपरीवर स्वतः बनवला चहा, इतरांना सुद्धा दिला; व्हिडिओ आला समोर

कधी-कधी लहान-सहान गोष्टी देखील जीवनात आनंद देतात - ममता बॅनर्जी

दिव्य मराठी वेब

Aug 22,2019 03:13:00 PM IST


दीघा - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दीघा जिल्ह्यातील दत्तपूर गावात एका हॉटेलवर स्थानिक लोकांसाठी चहा बनवला. इतकचे नाही तर या चहाचे त्यांनी वाटप देखील केले. ममता यांनी ट्वीटरवर व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये स्थानिक लोकांनी ममतांना घेरल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या चहा बनवत असल्याचे दिसत आहे.


लहान गोष्टी देखील जीवनात आनंद देतात
ममतांनी व्हिडिओसोबत लिहीले की, जीवनातील लहान-सहान कार्य देखील आपल्या आनंदीत करू शकते. इतरांसाठी चहा बनवणे ही त्यातील एक कार्य आहे. ममतांनी या व्हिडिओसोबत स्थानिक लोकांशी चर्चा करत असल्याचा दुसरा व्हिडिओ शेअर केला आहे.

X
COMMENT