आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Cm Mamata Banerjee Tmc Symbol Painted On Bjp Symbol After Jai Shree Ram Controversy

ममतांनी भाजप कार्यालयावर कमळाच्या जागी कोरले TMC चे चिन्ह; गेट वेल सून कार्ड पाठवणार BJP

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - लोकसभा निवडणुकीत भाजपकडून फटका बसल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा राग अजुनही शांत झालेला नाही. भाजप नेते आणि ममतांमध्ये वाद सुरू असताना दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या कार्यालयांवर हल्ल्यांचे आरोप करत आहेत. असेच एक प्रकरण उत्तर 24 परगना येथे समोर आले आहे. येथे ममता बॅनर्जींनी 30 मे आपल्या पक्षाच्या कार्यालयावर भाजपने ताबा मिळवल्याचा आरोप केला. तसेच संबंधित कार्यालयावर जाऊन भाजपच्या कमळाचे चिन्ह मिटवले. तसेच त्या ठिकाणी त्यांनी तृणमूल पक्षाचे चिन्ह कोरले आहे. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी लवकरच ममतांना 'गेट वेल सून'चे कार्ड पाठवणार असल्याचे म्हटले आहे.


भाजपच्या कार्यालयावरील चिन्ह मिटवल्यानंतर ममतांनी आरोप केला की हे कार्यालय पूर्वी तृणमूल काँग्रेसचे होते. 30 मे रोजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यावर ताबा मिळवला आणि तृणमूलची सर्व चिन्हे मिटवून कमळ बनवले. या कार्यालयावरील कमळाचे चिन्ह मिटवून आपण त्यामध्ये दुरुस्ती केली असे त्या म्हणाल्या. भाजपचे खासदार आणि संगीतकार बाबुल सुप्रियो सोमवारी म्हणाले, "ममता एक अनुभवी नेत्या आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्या विचित्र वागत आहेत. त्यांना आपल्या पदाचे भान ठेवून त्यानुसार वागायला हवे. ममतांना काही दिवस विश्रांती घेण्याची गरज आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे वाढते अस्तित्व पाहता त्यांचा तीळपापड झाला आहे. आम्ही असनसोल लोकसभा मतदार संघातर्फे ममतांना गेट वेल सूनचे कार्ड पाठवणार आहोत." भाजपचे आणखी एक नेते दिलीप घोष यांनी ममतांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली आहे.