आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीटर रीडिंग घेण्याच्या बहाण्याने घरात घुसायचा सीरिअल किलर, 5 महिलांची सायकलच्या साखळीने गळा आवळून केली हत्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता(पश्चिम बंगाल)- येथून पोलिसांनी घरात एकट्या असलेल्या महिलांवर हल्ला करणाऱ्या सीरिअल किलरला अटक केली आहे. रविवारी आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी 5 महिलांच्या हत्येप्रकरणी त्याची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आरोपी कामरुज्जमान सरकार(42)ने मागील 5 महिन्यात या हत्या केल्या आहेत. आधी तो सायकलच्या साखळीने महिलांचा गळा आवळत असे आणि नंतर त्यांच्या डोक्यात रॉडने वार करून त्यांची हत्या करत असे.


पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, सरकारने जानेवारीपासून मे दरम्यान पूर्व बर्दवान आणि हुगली जिल्ह्यातील महिलांवर हल्ले केले आहेत. दिवसभार तो भंगाराचे सामान घेत असे, त्यानंतर चांगले कपडे घालून मीटर रीडिंग घेण्याच्या बहाण्याने तो घरात घुसत असे. हत्या करण्यासाठी तो दुपारच्यावेळी एकट्या असलेल्या महिलांवर हल्ला करायचा.


सायकलच्या साखळीने गळा आवळायचा
एस.पी. भास्कर मुखोपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपीने 21 मे रोजी पुतुल माझी नावाच्या महिलेची हत्या केली. येथून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक लाल रंगाच्या गाडीवरून लाल हेल्मेट घातलेला संशयित दिसत आहे. त्या फुटेजच्या आधारावर आरोपी सरकारला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे आणखी चार महिलांच्या हत्येची चौकशी केली जात आहे. सर्व महिलांची हत्या सायकलच्या साखळीने गळा आवळून करण्यात आली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...