आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Is Against, Gujarat Also Supported! Congress Is In The Field; Rahul Gandhi, Priyanka Vadra Were Stopped In Meerut

पश्चिम बंंगाल विरोधात, गुजरात पाठीशी! काँग्रेसही मैदानात; राहुल गांधी, प्रियंका-वढेरा यांना मीरतमध्ये अडवले

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
विरोधात मोर्चा : ममतांचा सलग सातव्या दिवशी कोलकाता येथे नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चा, 'एनसीआरची पहिली पायरी एनपीआर' - Divya Marathi
विरोधात मोर्चा : ममतांचा सलग सातव्या दिवशी कोलकाता येथे नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चा, 'एनसीआरची पहिली पायरी एनपीआर'

नवी दिल्ली / कोलकाता : नव्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मंगळवारी सलग १५ व्या दिवशीही देशभरात आंदोलने झाली. दिल्ली, उत्तर प्रदेशपासून दक्षिणेत केरळ व पश्चिम बंगालपर्यंत विविध संघटनांबरोबरच विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांनी या कायद्याच्या विरोधात मोर्चे काढले. निदर्शनेही केली.

पश्चिम बंगाल हा आता कायद्याला विरोध करणारा व पाठिंबा देणाऱ्यांचा जणू किल्ला बनला आहे. मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे सलग सातव्या दिवशी मोर्चा काढला होता. त्यांनी नो एनआरसी, नो सीएए अशी घोषणा दिली. एनपीआर ही एनआरसीची पहिली पायरी असल्याचा आरोपही ममतांनी केला. राजधानी दिल्लीतही कायद्याच्या विरोधात निदर्शने झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीत बेकायदा इंटरनेट सेवा ठप्प करण्यासंबंधीच्या जनहित याचिकेला फेटाळून लावले. उत्तर प्रदेशात आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात पोलिस लाठीमारात जखमी विद्यार्थी मोहंमद तारिकला अलीगड मुस्लिम विद्यापीठाने असिस्टंट प्रोफेसर पदी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची रसायनशास्त्र विभागात अस्थायी नियुक्ती केली जाईल. फिरोजबाद जिल्ह्यातील तारिकचे आई-वडील मजूर आहेत. एएमयू परिसरात १५ डिसेंबर रोजी पोलिस लाठीमारात तारिकच्या दाेन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तामिळनाडूत आंदोलनात सहभागी जॅकब लिंडेंथलला देश सोडावा लागला. स्थलांतरित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्यावरून त्यास भारत सोडण्याचे आदेश दिले.

काँग्रेसही मैदानात : राहुल गांधी, प्रियंका-वढेरा यांना मीरतमध्ये अडवले

मीरत : नव्या नागरिकत्व कायद्याच्या विराेधातील आंदाेलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या भेटीस जाणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना मंगळवारी प्रतापपूरजवळ प्रवेश करण्यापासून राेखण्यात आले. आम्हाला प्रवेशास मनाई करणारे लेखी आदेश दाखवावे, असे आम्ही पाेलिसांना म्हणालाे. परंतु त्यांनी ते दाखवले नाहीत,असे पाेलिसांनी बजावल्याचे राहुल यांनी सांगितले. दुसरीकडे त्यांनी कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास ते जबाबदार राहतील. भेेट देण्यास आमचा विरोध नाही. असे सांगितल्यावर ते दाेघेही आल्या वाटेने परत गेले, असा दावा पाेलिसांनी केला.

आंदोलन : जामिया, जेएनयू, डीयूच्या विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर रॅली काढली, केरळमध्ये विरोध

दिल्लीत या कायद्याला विरोध करण्यासाठी जामिया, जेएनयू, डीयूसह इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी मंडी हाऊसपासून जंतर-मंतरपर्यंत मोर्चा काढला. विद्यार्थी हल्लाबोल , विद्यार्थी एकता जिंदाबादच्या घोषणा देत होते. केरळच्या तिरुवनंतपुरम, कोझीकोडेसह इतर शहरांतही विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. कोझीकोडमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन व तिरुवनंतपुरम विमानतळाच्या बाहेर कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवले.

रॅली : मंत्री मुरलीधरन म्हणाले- हिंसाचार होतो तेव्हा पोलिसांनी गोळीबार करणे स्वाभाविक

कोझीकोडेमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधनर यांनी निदर्शकांवरील पोलिसांचा गोळीबार योग्य असल्याचे म्हटले आहे. हे स्वाभाविक आहे. हिंसाचार होतो तेव्हा अशा गोष्टी घडतात. गुजरातचे सुरत, अहमदाबादसह सर्व ३३ जिल्ह्यांत भाजपने नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप कार्यकर्त्यांसह इतर लोकही सहभागी झाले. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अहमदाबादच्या रॅलीत सहभाग घेतला.