आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Police Arrested A Wife For Calling His Husband Shri Ram Sinha's Name Aloud : Fact Check

फॅक्ट चेक/ बंगाल पोलिसांनी पतीला नावाने आवाज देण्याऱ्या महिलेला केली अटक? पतीचे नाव श्रीराम असल्याचा केला दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फैक्ट चेक डेस्क - दैनिक भास्कर प्लस अॅपच्या एका वाचकाने आम्हाला एका बातमीचा स्क्रीनशॉट पाठवला आणि त्याचे सत्य सांगण्यास सांगितले. बातमीचे शीर्षक आहे,'बाजारात पत्नीने पती श्रीराम सिन्हाला आवाज देताच पोलिसांनी पत्नीला घेतले ताब्यात.'

या बातमीसोबत एक फोटो देण्यात आला आहे. यामध्ये काही महिला पोलिस कर्मचारी एका महिलेले ओढत नेताना दिसत आहे. 

सोशल मीडियावरही युझर्स स्क्रीनशॉट शेअर करत लिहित आहेत की, 'कोलकातात उपासना नावाच्या महिलेने आपला पती श्रीराम यांना आवाज दिला असता ममतांच्या पोलिसांनी तिला अटक केली आहे. खरंच - विनाशकारी विपरीत बुद्धि'


काय झाले व्हायरल 
व्हायरल पोस्टमधये दावा करण्यात येत आहे की, बंगाल पोलिसांनी उपासना नावाच्या एक महिलेला फक्त आपल्या पतीला आवाज दिल्यामुळे अटक केली आहे. तिच्या पतीचे नाव श्रीराम सिन्हा होते. 

बातमीच्या शीर्षकच्या खाली 'फॉक्सी' लिहिलेले दिसत आहे. हे एका वेबसाइटचे नाव असून यावरच ही बातमी प्रकाशित करण्यात आली आहे. 

 

 

 

यामुळे बातमी आहे फेक

> 12 मे 2019 रोजी द फॉक्सी वेबसाइटवर ही बातमी प्रकाशित करण्यात आली होती. 

> द फॉक्सी एक व्यंग्य न्यूज पोर्टल आहे. यावर कोणत्याही समसामायिक मुद्द्याला काल्पनिक गोष्टीशी जोडून व्यंग्य लेख लिहिले जातात. 


> बातमीसाठी वापरण्यात आलेला फोटो गुगल रिव्हर्स इमेज टूलच्या मदतीने सर्च केली असता वेगळेच प्रकरण समोर आले. हा फोटो मुलांच्या तस्करीचा विरोध करणाऱ्या कार्यकर्ती आणि पोलिसांत झडप झाल्याचा आहे. 


> हिंदुस्तान टाइम्सने 1 मार्च 2017 रोजी एक बातमी प्रकाशित केली होती. यामध्ये व्हायरल बातमीच्या फोटोचा वापर करण्यात आला होता.