आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय पुस्तकात मिल्खा सिंगऐवजी अभिनेता फरहान अख्तरचे छायाचित्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये शालेय पुस्तकात 'फ्लाइंग सीख' या नावाने प्रसिद्ध असलेले धावपटू मिल्खा सिंग यांच्याऐवजी २०१३ मध्ये आलेल्या 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटात त्यांची भूमिका करणारा अभिनेता फरहान अख्तर याचे छायाचित्र छापण्यात आले आहे. त्याला फरहान अख्तरने आक्षेप घेतला आहे. 

 

काय म्हणाला फरहान?

फरहानने ट्विट करून म्हटले आहे की,'पुस्तकात स्पष्टपणे चूक करण्यात आली आहे. मिल्खाजींच्या जागी चुकीचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकातील ही चूक सुधारण्यात यावी आणि लवकरात लवकर मिल्खाजींचे छायाचित्र प्रकाशित करावे.' फरहानने आपले ट्विट तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांना टॅग केले आहे. त्याला उत्तर देताना डेरेक ओ ब्रायन यांनी लिहिले,'आम्ही त्वरित ही चूक सुधारण्यासाठी पावले उचलत आहोत. ही माहिती दिल्याबद्दल आभार.' 

To the Minister of School Education, West Bengal.
There is a glaring error with the image used in one of the school text books to depict Milkha Singh-ji. Could you please request the publisher to recall and replace this book?
Sincerely. @derekobrienmp https://t.co/RV2D3gV5bd

— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) 19 August 2018

 

बातम्या आणखी आहेत...