आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • West Bengal :Trinmul Congress Leader Assault Bengal Woman Teacher Latest News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जमीन बळकावल्याच्या विरोधात पीडित शिक्षिका करत होती विरोध; तृणमूल नेत्याने बहिणीसह फरपटत नेत केली बेदम मारहाण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तृणमूल नेता अमल सरकारच्या नेतृत्वात पाच जणांनी पीडितेला केली मारहाण
  • पीडितेकडून पोलिसांत तक्रार दाखल, मात्र अद्याप कोणालाही अटक नाही

दक्षिण दिनजापूर (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस नेत्याच्या नेतृत्वात जमावाने दोन महिलांना रस्त्यावर फरपटत नेत त्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. महिला शिक्षिकेने रस्ते निर्माणासाठी आपली जमीन बळकावण्यास विरोध दर्शवल्याचे सांगितले जात आहे.  यावर संपप्त झालेल्या तृणमूल समर्थकांनी तिला बांधून सुमारे 30 फूट रस्त्यावर फरपटत नेले. यावेळी शिक्षिकेच्या मोठ्या बहिणीने विरोध केला असता फरपटत नेत मारहाण करण्यात आली. 

तक्रार दाखल मात्र अद्याप कोणालाच अटक नाही

स्मृतिखाना दास असे या महिलेचे नाव आहे. ती जवळील एका शाळेत शिक्षिका आहे. ती आपल्या आईसह फाटा नगर येथे राहते. आपल्या मुलींना वाचवण्याच्या प्रयत्नात तिची आई सुद्धा जखमी झाली आहे. पीडितेने रविवारी पाच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. मात्र याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.  रस्ते बांधणीसाठी जास्त जमीन घेतल्याने नुकसान होत होते - महिलांचा आरोप 


स्थानिक तृणमूल नेते अमल सरकार यांच्या नेतृत्वात तिला मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. रविवारी तृणमूलचे जिल्हा प्रमुख अर्पिता घोष यांनी पंचायत नेता अमल सरकारला निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. दोन्ही महिलांनुसार, त्यांच्या घरासमोर बांधण्यात येणारा रस्ता 12 फूट रुंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे ते जमीन देण्यास तयार झाले होते. परंतु यानंतर पंचायतने रस्त्याची रुंदी 24 फूट करण्याचा निर्णय केला. यामुळे त्यांना आपल्या जमिनीचे मोठे नुकसान होत असल्यामुळे त्यांनी याचा विरोध केला.